MB NEWS-न.प.गटनेते वाल्मीक आण्णा कराड यांची तत्परता ; प्रियानगरभागातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुटला !* • _प्रियानगरमधिल नागरीकांनी मानले आभार_

 *न.प.गटनेते वाल्मीक आण्णा कराड यांची तत्परता ; प्रियानगरभागातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुटला !*



• _प्रियानगरमधिल नागरीकांनी मानले आभार_•


परळी वै: दि 13 अनुप कुसुमकर

      शहरातील प्रिया नगर भागात मागील 4 दशकापासून नागरी सुविधेचा अभाव होता .अनेक वेळा मागणी करूनही तांत्रिक अडचणी सांगून नगर परिषद या भागात नागरी सुविधा देत नव्हती. या सर्व पार्श्वभूमीवर या भागातील महिलांनी नगर परिषदेचे गट नेते वाल्मिकअण्णा कराड यांची भेट घेऊन समस्या मांडली. महिलांचे प्रश्न नगर परिषदेचे गट नेते वाल्मिक अण्णा कराड यांनी ऐकून तात्काळ फैसला करीत नगर परिषद कर्मचारी यांना आदेश करीत या भागात 1 तासात किमान पाणी पुरवठा सुरू करण्याचे आदेश दिले .प्रियानगर भागातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुटला असल्याने प्रियानगरमधिल नागरीकांनी आभार मानले आहेत.


         बीड जिल्ह्यात ज्या पद्धतीने पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे तक्रार येताच "फैसला ऑन दि स्पॉट " कार्य पहावयास मिळते तेच कार्य परळीतील नागरी समस्या सोडविण्यासाठी नगपरिषदेचे गट नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या कृतीतून दिसून आले.पत्रकार अनुप कुसुमकर यांच्या नेतृत्वात प्रिया नगर भागातील महिला जगमित्र कार्यालयात समस्या घेऊन गेलेल्या असतांना वाल्मिक कराड यांनी तात्काळ नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागास कार्यालयात पाचारण करीत 1 तासात पाणी पुरवठा जोडणी करून सुरळीत करण्याचे आदेश दिले. तसेच या भागातील सर्व नागरी समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले.

            एकूणच पालकमंत्री ना.धंनजय मुंडे यांच्या " फैसला ऑन दि स्पॉट " या कृतीची झलक राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या परळी नगर परिषद मधील गट नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या माध्यमातून पहावयास मिळाली.नागरी सुविधा व पाणी पुरवठा सुरू करण्याचे आदेश तातडीने दिल्याने या भागातील नागरिकांनी पालकमंत्री ना.धनंजय मुंडे व गट नेते वाल्मिक अण्णा कराड यांचे आभार व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार