MB NEWS-राज्य सरकारने तात्काळ कोर्टात शपथपत्र दाखल करून निवडणुका पुढे ढकलाव्या*

* राज्य सरकारने तात्काळ कोर्टात शपथपत्र दाखल करून निवडणुका पुढे ढकलाव्या* * लोणावळ्यातील ओबीसींच्या सर्वपक्षीय बैठकीत पंकजाताई मुंडे यांची मागणी* *इम्पिरिकल डाटा तयार करण्याचे काम राज्य सरकारचेच* मुंबई । दिनांक २७। जोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षणाचे संरक्षण मिळत नाही, तोपर्यंत पाच जुलैच्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका पुढे ढकलाव्यात, त्यासाठी सरकारने कोर्टात तात्काळ शपथपत्र दाखल करावे अशी मागणी भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी लोणावळा येथे ओबीसी व्हीजेएनटी मंथन चिंतन शिबिर येथे बोलतांना केली. मराठा समाजाचा प्रश्न शैक्षणिक आरक्षणाचा असून हा समाज राजकीयदृष्ट्या पुढारलेला आहे.ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे.त्यामुळे,दोन्ही समाजात कोणीही गैरसमजाची भिंत उभी करून वाद निर्माण करू नये अशी माझी हात जोडून सर्वांना विनंती आहे,असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी पुढे बोलतांना पंकजाताई मुंडे म्हणाला की,या ठिकाणी आल्यावर मला अनेक पत्रकार म्हणाले काल तुम्ही आंदोलन केले आज चिंतन करत आहात.काल संपुर्ण महाराष्ट्राने ओबीसींचे चक्काजाम आंद...