पोस्ट्स

MB NEWS-परळी शहरातील वीज गुल ; आणखी पाउणतास वीजपुरवठा सुरळीत होण्यास लागणार

इमेज
  परळी शहरातील वीज  गुल ; आणखी पाउणतास वीजपुरवठा सुरळीत होण्यास लागणार परळी वै….  गेल्या एक ते दीड तासापासुन शहरात  वीज गायब झाली आहे. वीजपुरवठा सुरळीत चालू करण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना सुरू असल्याचे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.शहरातील वीज पुरवठा सुरळीत होण्यास आणखी पाउणतास लागणार आहे.             खंडीत वीज पुरवठयाने नागरिकांची चांगलीच तगमग झाली आहे.३३ केव्हढी मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. हा बिघाड  दुरुस्त केल्यानंतर परळी शहरातील लाईट येणार आहे.

MB NEWS-एमआयडीसी मध्ये लवकरच नवीन उद्योग आणणार ; थर्मल पवार प्लांटमध्ये सोलारचे प्लांट सुरू करू -ना.धनंजय मुंडे

इमेज
 * एमआयडीसी मध्ये लवकरच नवीन उद्योग आणणार ; थर्मल पवार प्लांटमध्ये सोलारचे प्लांट सुरू करू -ना.धनंजय मुंडे परळी वैजनाथ, प्रतिनिधी....            अनेक वर्षांपासून पाहिलेले पंचतारांकित एमआयडीसीचे काम आम्ही सत्तेत येतात पूर्णत्वाकडे घेऊन जात आहोत, नोटिफिकेशन निघाले, 35 हेक्टर जागेची प्रत्यक्ष मोजणी पूर्ण झाली, आता या जागेत नवनवीन गुंतवणूकदार आणून इथे उद्योगांना चालना देऊ, या भागात नवीन रोजगार निर्मिती करू; यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे ना. धनंजय मुंडे  म्हणाले. थर्मल पवार प्लांट मधील काही संच कोळसा व अन्य अडचणींमुळे बंद करण्यात आले आहेत, मात्र आपण ऊर्जा विभागाशी याबाबत चर्चा केली असून, तितक्याच क्षमतेचे सोलार प्लांट उभारण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचेही ना. मुंडे म्हणाले.                 परळी मतदारसंघातील रखडलेल्या प्रत्येक विकासकामांना येत्या काळात गती देऊन दिलेला पूर्ण शब्द करू, परळी शहर व तालुका समृद्ध करून इथल्या प्रत्येक सामान्य व्यक्तीचे उत्त्पन्न वाढविणे हे आपले उद्दिष्ट आहे व त्यापा...

MB NEWS-तीन महिन्यानंतर परळीत एकही खड्डा किंवा धूळ दिसणार नाही - धनंजय मुंडेंनी दिला शब्द

इमेज
  तीन महिन्यानंतर परळीत एकही खड्डा किंवा धूळ दिसणार नाही - धनंजय मुंडेंनी दिला शब्द परळी वैजनाथ, प्रतिनिधी....            सध्या परळीत ड्रेनेज लाईनचे काम सुरू असून, त्यामुळे परळी शहरात खड्डे झाले आहेत. विरोधक मात्र या पडलेल्या खड्ड्याच्या मुद्यावरून गलिच्छ राजकारण करत आहेत. परंतु विकासकामे जमीनीवरच होत असतात हवेत तर करता येत नाहीत.त्यामुळे ही बाब समजुन घेतली पाहिजे.नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर अश्या प्रकारचे राजकारण करणे हे त्यांना शोभणारे नाही. ज्या ज्या वेळेस निवडणुकांच्या तोंडावर विरोधकांनी असे गलिच्छ राजकारण केले, त्या त्या वेळेस हे विरोधक तोंडावर पडले आहेत असा टोला धनंजय मुंडे यांनी भाजपाला लगावला आहे. येणाऱ्या 3 महिन्यात या परळी शहरात सर्व रस्त्याचे काम पूर्ण करणार असून शहरात एकही खड्डा किंवा कुठेच धूळ दिसणार नाही. असा शब्द देतो, असं आश्वासन धनंजय मुंडेंनी या प्रसंगी परळीकरांना दिलंय.             परळी शहर बायपास व परळी-धर्मापुरी रस्त्याच्या च्या कामाला सुरुवात झाली असून आज शनिवारी (दि. 03) बीड जिल्ह्याचे पालकम...

MB NEWS-परळी मतदारसंघातील दळवळणासह इतरही विकासाची कामे जलदगतीने पूर्ण करू - ना. धनंजय मुंडे*

इमेज
 * परळी मतदारसंघातील दळवळणासह इतरही विकासाची कामे जलदगतीने पूर्ण करू - ना. धनंजय मुंडे* * ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते परळी बायपास व परळी ते धर्मापुरी रस्त्याचे भूमिपूजन संपन्न, दर्जेदार पद्धतीने वेळेत काम पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना* *आम्ही दिलेल्या प्रत्येक शब्दाला जागणारे लोक - ना. मुंडेंनी पुन्हा करून दिली आठवण!* परळी (दि. 03) ---- : परळी शहर बायपास, परळी ते धर्मापुरी रस्ता या दोन कामांना आज सुरुवात झाली, परळी अंबाजोगाई रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होईल, परळी ते तेलगाव रस्त्याचीही निविदा प्रक्रिया पूर्ण होत आहे; मतदारसंघात दळणवळणाच्या सोयीसह इतरही विकासकामे जलदगतीने पूर्ण करू असे प्रतिपादन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी केले आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या परळी शहर बायपास या रस्त्याच्या 4 पदरी डांबरीकरणाचे व परळी ते धर्मापुरी रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण कामाचे ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन संपन्न झाले, या कार्यक्रमात ते बोलत होते.  *विरोधकांना सल्ला...*  परळी शहरात भुयारी गटार योजनेचे काम सुरू असल्यामुळे काही ठिकाणी रस्ते ...

MB NEWS-प्रभाग 13 मध्ये कोविड लसीकरनात नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद,500 पेक्षा जास्त नागरिकांनी घेतली लस..!* *श्वासाच्या शेवटच्या क्षणा पर्यंत जनसेवा करणार..!प्रा पवन मुंडे*

इमेज
 * प्रभाग 13 मध्ये कोविड लसीकरनात नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद,500 पेक्षा जास्त नागरिकांनी घेतली लस..!* *श्वासाच्या शेवटच्या क्षणा पर्यंत जनसेवा करणार -प्रा पवन मुंडे* परळी प्रतिनिधी : आज दिनांक 3 जुलै रोजी परळी आरोग्यविभाग व भाजपाच्या वतीने मा ना पंकजाताई मुंडे व डॉ खा प्रीतमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग 13 मधील प्रभागाचे भाजपाचे नगरसेवक प्रा पवन मुंडे यांच्या संकल्पनेतून पवनसुत हनुमान मंदिरसह दोन ठिकानी कोविड लसीकरण करण्यात आले,या प्रसंगी या उपक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला, या वेळी 500 पेक्षा जास्त नागरिकांनी या वेळी कोविड लसीकरण करून घेतले.       या वेळी झालेल्या लसीकरण उदघाटन कार्यक्रम प्रसंगी नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादा बद्दल नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी आपल्या मनोगतात जनतेचे आभार तर माणलेच पण लोकांचे प्रेम व प्रतिसाद पाहून प्रा मुंडे च्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले या प्रसंगी आपल्या मनोगतात श्वासाच्या शेवटच्या क्षणा पर्यंत आपण जनसेवेचा वारसा सोडणार नाही असे प्रतिपादन त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे प्...

MB NEWS-परळी येथे पारंपरिक पद्धतीने प .पू. वामनानंद महाराजांची पुण्यतिथी ; कोरोना संकट दूर होण्यासाठी प्रार्थना

इमेज
 🌑 * परळी येथे पारंपरिक पद्धतीने प .पू. वामनानंद महाराजांची पुण्यतिथी ; कोरोना संकट दूर होण्यासाठी प्रार्थना परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....       चिन्मयमुर्ती संस्थान उमरखेड चे मठाधिपती ब्र .ली. प .पू. वामनानंद गुरु पुरूषोत्तमानंद महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे परळीत ३ जुलै रोजी कोविडविषयक नियमांचे पालन करून आयोजन करण्यात आले होते.पारंपारिक पद्धतीने विधीवत पूजा करून शिष्यवृंदांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला.यावेळी समस्त भक्तगणांनी कोरोना संकट दूर होण्यासाठी प्रार्थना केली.           विठ्ठल मंदिर मंदिर , देशपांडे गल्ली, गणेश पार परळी वैजनाथ  येथे आज  ज्येष्ठ वद्य नवमी दि . ०३ I ०७I २०२१ रोजी  प्रतिवर्षाप्रमाणे ब्र .ली. प .पू. वामनानंद गुरु पुरूषोत्तमानंद महाराजांच्या *पुण्यतिथी* उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सकाळी ९ वा . श्री गुरु वामनानंद महाराजांच्या प्रतिमा पूजनविधी विश्वंभर देशमुख यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आले. उपस्थित भक्तगणांनी श्रीगुरू पंचपदी घेतली.. आरतीनंतर समस्त भक्तगणांनी कोरोना संकट दूर होण्यासाठी ...

MB NEWS-हभप बंडामहाराज कराडकर स्थानबद्ध

इमेज
हभप बंडामहाराज कराडकर स्थानबद्ध कराड , प्रतिनिधी : गेली चार दिवसांपासून पंढरपूर आषाढी पायी वारीला परवानगी द्यावी या मागणीसाठी व वारी करणारच असा आग्रह धरून बंडातात्या कराडकर व वारकर्‍यांनी आंदोलन सुरू केले होते. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी तात्यांनी आळंदी येथे पोहोचून पायी वारीला सुरुवात केली होती. परंतु पोलिसांनी शनिवारी सकाळी आळंदी जवळील तापेकरवाडी येथून बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना कराड तालुक्यातील करवडी येथील श्रीकृष्ण गोपालन केंद्रामध्ये आणून स्थानबद्ध केले.    दरम्यान याबाबत पत्रकारांशी बोलताना बंडातात्या कराडकर यांनी सांगितले की, पंढरपूर आषाढी पायीवारी व्हावी यासाठी आमचा आग्रह होता. याच मागणीसाठी चार दिवसांपासून आमचे शांतता व संयमाच्या मार्गाने आणि वारकरी संप्रदायाच्या चाकोरीत राहून आंदोलन सुरू होते. परंतु पोलिसांनी वारकर्‍यांचे हे आंदोलन आपल्या खाक्याप्रमाणे निपटून काढण्याचा दुर्दैवी प्रयत्न केला.त्यानंतर पोलिसांनी पांडुरंग तात्या घुले व मला स्थानबद्ध केले आहे. आषाढी वारी व कोरोनाचा विचार करता वारकऱ्यांचे आक्रमक आंदोलन न करता पोलिसांचा निर...