पोस्ट्स

MB NEWS-*ब्राह्मण सभेच्या श्री.विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा वेदोक्त मंत्रोच्चारात विधिवत शुभारंभ*(VIDEO) 🕳️ _परळी ब्राह्मण सभेच्या वतीने २७ ते ३०आॅगस्ट या कालावधीत चार दिवशिय सोहळा_

इमेज
  *ब्राह्मण सभेच्या श्री.विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा वेदोक्त मंत्रोच्चारात विधिवत शुभारंभ* 🕳️ _परळी ब्राह्मण सभेच्या वतीने २७ ते ३०आॅगस्ट या कालावधीत चार दिवशिय सोहळा_  परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....          शहरातील गणेशपार विभागातील गवंडीगल्लीत ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वैजनाथ द्वारा जिर्णोद्धार करण्यात आलेल्या श्री.विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू झाला आहे.आज दि.२७ रोजी सकाळच्या सत्रात धार्मिक विधींना प्रारंभ झाला आहे.वेदोक्त मंत्रोच्चारात विधिवत प्राणप्रतिष्ठापुर्व पुजा संपन्न होत आहेत. सकाळ व दुपार अशा दोन सत्रात चार दिवस हा सोहळा होणार आहे.समारोपदिनी दि.३० रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा होणार आहे.प.पु.यज्ञेश्वर सेलुकर महाराज, पालकमंत्री ना धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे,खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.          परळी ब्राह्मण सभेद्वारा श्री.विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धार व स्व.मनोहरपंत बडवे स्मृती सभागृह हे काम हाती घ...

MB NEWS-राष्ट्रसंतश्रेष्ठ श्री भगवानबाबा संतपरंपरेतील प्रबोधन, लोकशिक्षण आणि स्वाभिमान यांचा त्रिवेणी संगम - पंकजाताई मुंडे

इमेज
  राष्ट्रसंतश्रेष्ठ श्री भगवानबाबा संतपरंपरेतील प्रबोधन, लोकशिक्षण आणि स्वाभिमान यांचा त्रिवेणी संगम - पंकजाताई मुंडे संत भगवानबाबांच्या विचाराला समर्पक कार्य करण्यासाठी सदैव कार्यरत राहु - खा.डाॅ.प्रितमताई मुंडे   🕳️ जयंतीनिमित्त पंकजाताई व प्रितमताईंनी केलं परळीतील निवासस्थानी अभिवादन 🕳️    परळी वैजनाथ, प्रतिनिधी......            राष्ट्रसंतश्रेष्ठ श्री भगवानबाबा संतपरंपरेतील प्रबोधन, लोकशिक्षण आणि स्वाभिमान यांचा त्रिवेणी संगम असल्याचे प्रतिपादन भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केले.तर राष्ट्रसंतश्रेष्ठ भगवानबाबांच्या विचाराला समर्पक कार्य करण्यासाठी सदैव कार्यरत राहु असा विश्वास खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केला आहे.            राष्ट्रसंतश्रेष्ठ श्री भगवानबाबा यांच्या जयंतीनिमित्त भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांनी अभिवादन केले. पंकजाताई मुंडे यांनी ट्विटरवर "महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील प्रबोधन, लोकशिक्षण आणि स्वाभिमान यांचा त्रिवेणी संगम असलेले राष्ट्...

MB NEWS- *ब्राह्मण सभेच्या श्री.विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात मुर्ती प्राण प्रतिष्ठा व स्व.मनोहरपंत बडवे स्मृती सभागृहाचे लोकार्पण !*

इमेज
 ब्राह्मण सभेच्या श्री.विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात मुर्ती प्राण प्रतिष्ठा व स्व.मनोहरपंत बडवे स्मृती सभागृहाचे लोकार्पण ! 🕳️   _परळी ब्राह्मण सभेच्या वतीने २७ ते ३०आॅगस्ट या कालावधीत चार दिवशिय सोहळयाचे आयोजन_  🕳️  *प.पु.सेलुकर महाराज, पालकमंत्री ना धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे,खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांची राहणार प्रमुख उपस्थिती* परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....         शहरातील गणेशपार विभागातील गवंडीगल्लीत ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वैजनाथ द्वारा जिर्णोद्धार करण्यात आलेल्या श्री.विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात मुर्ती प्राणप्रतिष्ठा व स्व.मनोहरपंत बडवे स्मृती सभागृहाचे लोकार्पण होणार आहे.या अनुषंगाने परळी ब्राह्मण सभेच्या वतीने २७ ते ३० आॅगस्ट या कालावधीत चार दिवसीय सोहळयाचे आयोजन केले आहे.वेदोक्त पद्धतीने विधिवत मुर्ती प्राणप्रतिष्ठा व समारोपदिनी मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा होणार आहे.प.पु.यज्ञेश्वर सेलुकर महाराज, पालकमंत्री ना धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे,खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.   ...

MB NEWS- *दोन आरोपींकडून सिरसाळा पोलीसांनी केल्या २४ चोरी गेलेल्या मोटारसायकली जप्त*

इमेज
 *दोन आरोपींकडून सिरसाळा पोलीसांनी केल्या २४ चोरी गेलेल्या मोटार सायकली जप्त* परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....        गेल्या अनेक दिवसांपासून परळी व तालुक्यातील अनेक ठिकाणी अनेक मोटारसायकली चोरीला गेल्याच्या घटनांची नोंद होत होती.या घटनांचा तपास पोलिस करीत असतांना सिरसाळा पोलीसांनी दोन जणांना ताब्यात घेतले व तपासादरम्यान दोन आरोपींकडून तब्बल २४ चोरी गेलेल्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या आरोपींकडून आणखी माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.        परळी तालुक्यातील सिरसाळा पोलीसांत दाखल करण्यात आलेल्या एका मोटारसायकल चोरी प्रकरणी अधिक तपास करताना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सय्यद अमीर सय्यद नोमान वय ३० वर्षे रा.पेठमोहल्ला, परळी वैजनाथ व अशोक रमेश गायकवाड वय २० रा.सिरसाळा या दोघांना चौकशी साठी ताब्यात घेतले.अधिक तपासात या दोन आरोपींकडून तब्बल २४  मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.ही कामगिरी सपोनि पी.बी.एकशिंगे, पोउपनि. एम.जे.विघ्ने,पोकाॅ.मिसाळ,पोना अंकुश मेंढके,जेटेवाड, सय्यद, देशमुख यांनी केली.

MB NEWS-*⭕Maharashtra Lockdown : ... तर कदाचित आपल्याला लॉकडाऊन लावावा लागेल, मुख्यमंत्री ठाकरेंचं मोठं वक्तव्य*

इमेज
 🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴 ------------------------------------------  *⭕Maharashtra Lockdown : ... तर कदाचित आपल्याला लॉकडाऊन लावावा लागेल, मुख्यमंत्री ठाकरेंचं मोठं वक्तव्य* ------------------------------------------  मुंबई :  राज्यातील ऑक्सिजन साठ्यात फार काही विशेष वाढ झालेली नाही. राज्यात कोविड रुग्णांसाठी 700 मेट्रिक टनांपर्यंत ऑक्सिजन जेव्हा लागेल तेव्हा कदाचित आपल्याला राज्यात लॉकडाऊन (Maharashtra Lockdown update) लावावा लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी म्हटलं आहे.  मुंबईतील खास बाल कोविड काळजी केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन आज उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.  उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की,  आज जनतेच्या सेवेसाठी दोन आरोग्यसेवेचे लोकार्पण झालं आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. इतर देशात, राज्यात लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढलेला आहे.  आपल्याकडे हा संसर्ग वाढणार नाही, तरी आपण तयारी सर्व गोष्टींची ठेवत आहोत, असं ते म्हणाले. ते म्हणाले की, त्याच अनुषंगाने लहान मुलांना कोविडची लागण झ...

MB NEWS-आजचा कोविड अहवाल: आज परळी तालुक्याचा आकडा ०१ तर जिल्ह्यात ११५पाॅझिटिव्ह_

इमेज
 * आजचा कोविड अहवाल: आज परळी तालुक्याचा आकडा ०१ तर जिल्ह्यात ११५पाॅझिटिव्ह_ परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         आरोग्य प्रशासनाच्या वतीने कोविड -१९ रुग्णांच्या बाबतीत दैनंदिन अहवाल जाहीर करण्यात येतो.आजच्या अहवालात परळी तालुक्यातील संख्या ०१ आहे.                    आजच्या कोविड- 19 दैनंदिन अहवालात जिल्ह्यात पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या ११५ आहे.संख्या ओसरत असतानाच परळी तालुक्याची संख्या हळूहळू झिरो पाॅझिटिव्हकडे जाताना दिसत आहे. कोरोना संसर्गाची साखळी  संपुर्णतः तुटलेली दिसून येत नाही. झिरो कोरोणा करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची नितांत आवश्यकता असून कोविड विषयक नियमांचे पालन करावे व सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर, आदी मूलभूत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

MB NEWS-धर्मापुरी येथील श्री मरळसिद्ध मल्लिकार्जुन देवस्थान येथे श्री ष. ब्र. 108 श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांचे श्रावणमास तपोनुष्ठान सुरू

इमेज
  धर्मापुरी येथील श्री मरळसिद्ध  मल्लिकार्जुन देवस्थान येथे श्री ष.  ब्र. 108 श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांचे श्रावणमास तपोनुष्ठान सुरू परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        तालुक्यातील धर्मापुरी येथील श्री मरळसिद्ध मल्लिकार्जुन देवस्थान येथे श्री श्री ष. ब्र. 108 श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठ यांचे विसावे श्रावणमास तपोनुष्ठान रविवार दिनांक 15 ऑगस्ट 2021पासून सुरू झाले आहे .या तपोनुष्ठान ची सांगता बुधवार दिनांक 8 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहे.            श्रावणमास तपोनुष्ठाना मध्ये रोज इष्टलिंग, महापूजा व तीर्थप्रसाद सकाळी 9 ते 12 दरम्यान तर दुपारी 12 ते 2 दरम्यान महाप्रसाद व दुपारी 4 ते 6च्या दरम्यान जप ,भजन व अध्यात्म चिंतन होत आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून श्रावणमास तपोनुष्ठान सुरू आहे . याचा भाविक, भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री नंदिकेश्वर महिला भजनी मंडळ व श्री नंदिकेश्वर विचारमंच सदस्य यांनी केले आहे . या अनुष्...