पोस्ट्स

MB NEWS-विभागीय कामगार काव्यवाचन स्पर्धेला मोठा प्रतिसाद ऑनलाइन काव्यवाचन स्पर्धेचे निकाल जाहिर;परळीतील दोन कवींना पारितोषिक

इमेज
  विभागीय कामगार काव्यवाचन स्पर्धेला मोठा प्रतिसाद ऑनलाइन काव्यवाचन स्पर्धेचे निकाल जाहिर;परळीतील दोन कवींना पारितोषिक   परळी दि. ६ ऑक्टोबर..... महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने मराठवाड्यातील कामगार कवींसाठी ऑनलाईन कामगार काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन ५ ऑक्टोबर २१ रोजी करण्यात आले होते. औरंगाबाद, लातूर व नांदेड या गटातून ३६ कवींच्या प्रवेशिका आल्या होत्या. पैकी  ३२ कामगार कवींनी कवितांचे सादरीकरण केले.  या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला असून  एकाहून एक सरस सुंदर कविता कामगार कवींनी  सादर केल्या.  कामगार कवींच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने मराठवाड्यातील कामगार कवींची काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आली. मराठवाडा विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील यांनी स्पर्धेसाठी विशेष प्रयत्न केले.  या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रूपये २ हजार, द्वितीय पारितोषिक १ हजार पाचशे, तृतीय पारितोषिक १ हजार आणि उत्तेजनार्थ पारितोषिक ५०० रुपये आहे.   या स्पर्धेत प्रथम पारितोषिक विजय कुमार पांचाळ औरंगाबाद, तृती...

MB NEWS-राज्यातील समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व समकक्ष पदांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय - धनंजय मुंडे*

इमेज
 * राज्यातील समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व समकक्ष पदांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय - धनंजय मुंडे*  *राज्यातील 50 महाविद्यालयातील 562 शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांना होणार लाभ; आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्तावास मिळाली मंजुरी* मुंबई (दि. 06) ---- : राज्यातील अकृषिक विद्यापीठांशी संलग्न असलेल्या 50 समाजकार्य महाविद्यालयांतील शिक्षक व समकक्ष पदांवरील कर्मचाऱ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अनुषंगाने 7 वा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रस्तावास आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकारांशी बोलताना दिली आहे.  या निर्णयाचा राज्यातील 50 महाविद्यालयातील शिक्षक व समकक्ष पदांवरील 562 कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.  एकूण अनुदानित 50 महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राचार्य, ग्रंथपाल असे 562 कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्वांना 7 व्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेण्या 1 जानेवारी 2016 पासून लागू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. याबाबत महाविद्यालयातील कर्म...

MB NEWS- *नवरात्रोत्सवात प्रभु वैद्यनाथ- डोंगरतुकाई-काळरात्रीदेवी दर्शनाला जाणार्या भाविकांसाठी मोफत वाहन व्यवस्था* 🕳️ _भाविकभक्तांनी लाभ घ्यावा-बाजीराव भैय्या धर्माधिकारी

इमेज
 नवरात्रोत्सवात प्रभु वैद्यनाथ- डोंगरतुकाई-काळरात्रीदेवी दर्शनाला जाणार्या  भाविकांसाठी मोफत वाहन व्यवस्था 🕳️ _भाविकभक्तांनी लाभ घ्यावा-बाजीराव भैय्या धर्माधिकारी _ परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       नवरात्रोत्सवात प्रभु वैद्यनाथ- डोंगरतुकाई-काळरात्री देवी दर्शनाला जाणार्या परळीतीलभाविकांसाठी मोफत वाहन व्यवस्था करण्यात येणार आहे.या सुविधेचा अधिकाधिक भाविकभक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.        नवरात्रोत्सवात प्रभु वैद्यनाथ,आरोग्यभवानी डोंगरतुकाई देवी, काळरात्री देवी  दर्शनासाठी दररोज हजारोंच्या संख्येने भाविकांची मांदियाळी असते. भाविकांना दर्शनासाठी जाण्या-येण्याची सुलभ व्यवस्था व्हावी यासाठी माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी मोफत वाहन व्यवस्था  केली आहे. नवरात्रोत्सवात सकाळी ८ ते  दुपारी ४ या वेळेत मोफत वाहन व्यवस्था उपलब्ध असणार आहे.या सुविधेचा लाभ अधिकाधिक भाविकभक्तांनी घ्यावा असे ...

MB NEWS-*परळी उपजिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकपदी डॉ.अरूण गुट्टे यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार*

इमेज
  *परळी उपजिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकपदी डॉ.अरूण गुट्टे यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार* परळी,(प्रतिनिधी):- परळी उपजिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकपदीडॉ.अरूण गुट्टे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा ह्रदय  सत्कार करण्यात आला.         परळी तालुक्यातील मौजे नंदनज येथील रहिवाशी व  वैद्यकीय क्षेत्रात  मोठे कार्य असलेल्या डॉ.अरूण गुट्टे यांची  वैद्यकीय अधिक्षक म्हणून उपजिल्हा रूग्णालय परळी येथे   नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या नियुक्ती बद्दल हभप गणेश महाराज उखळीकर यांनी त्यांचा ह्रदय सत्कार केला.याप्रसंगी प्रभाकर आंधळे, दत्ताभाऊ देशमुख, विठ्ठल राव गुट्टे, नाथराव गुट्टे, डॉ.जीवनराव गुट्टे, सुनील योगीराज गुट्टे आदी उपस्थित होते.

MB NEWS-परळी उपजिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक पदी डॉ.अरूण गुट्टे यांची नियुक्ती

इमेज
  परळी उपजिल्हा रूग्णालया च्या वैद्यकीय अधिक्षक पदी डॉ.अरूण गुट्टे यांची नियुक्ती परळी,(प्रतिनिधी):- परळी उपजिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकपदी दि.4 ऑक्टोंबर 2021 रोजी नियुक्ती करण्यात आली. पालकंमत्री ना.धनंजय मुंडे यांच्या सुचनेनुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी नियुक्तीचे आदेश दिले. परळी तालुक्यातील मौजे नंदनज येथील रहिवाशी असून वैद्यकीय क्षेत्रात डॉ.अरूण गुट्टे यांचे मोठे कार्य आहे. या पुर्वीही डॉ.अरूण गुट्टे यांनी वैद्यकीय अधिक्षक म्हणून उपजिल्हा रूग्णालय परळी येथे काम पाहिले आहे. परळी उपजिल्हा रूग्णालयाला महाराष्ट्र शासनाचा डॉ.आनंदीबाई जोशी हा मानाचा पुरस्कार डॉ.अरूण गुट्टे  यांनी मिळवून दिला होता. त्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव असल्यामुळे त्यांची पुन्हा वैद्यकीय अधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

MB NEWS-श्री.भास्करराव जोशी (उखळीकर) यांचे निधन

इमेज
 श्री.भास्करराव जोशी (उखळीकर) यांचे निधन पत्रकार प्रा.रविंद्र जोशी यांना पितृशोक परळी वैजनाथ, प्रतिनिधी...          श्रीराम मंदिरचे पुजनसेवासाधक तथा उखळी बु.येथील  प्रतिष्ठीत व परिसरातील सर्वपरिचित व्यक्तीमत्व श्री. भास्करराव नरहरराव जोशी (उखळीकर) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी ते ७२ वर्षे वयाचे होते. त्यांच्या  पार्थिवावर उखळी (बु.) येथे  बुधवार दि.22 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.          श्री.भास्करराव जोशी (उखळीकर) हे अतिशय धार्मिक, मनमिळाऊ, संयमी व कुटुंबवत्सल म्हणून परिचित होते. सर्वदूर परिचय, धार्मिक, पौरोहित्य क्षेत्रात जीवनभर कार्यरत होते.त्यांचा दांडगा जनसंपर्क होता.जोशी (उखळीकर) परिवाराचा आधारवड म्हणून त्यांची ओळख आहे. परभणी समाज कल्याण विभागाचे निरीक्षक दिनकरराव जोशी, पत्रकार प्रा.रविंद्र जोशी, प्रसिद्ध भागवत कथा प्रवक्ते हभप बाळु (सुरेंद्र) महाराज उखळीकर यांचे ते वडील होत. गेल्या पंधरा दिव...

MB NEWS-वाढदिवस विशेष:शेतकर्यांच्या प्रश्नासाठी बांधावर जाऊन संघर्ष करणारे नेतृत्व राजेश गित्ते

इमेज
  शेतकर्यांच्या प्रश्नासाठी बांधावर जाऊन संघर्ष करणारे नेतृत्व राजेश गित्ते  परळी- परळी तालुका हा राजकिय जागृती असलेला तालुका म्हणुन ओळखला जातो.राज्य व राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात गाजत असलेल्या अनेक नेते घडले.स्थानिक पातळीवरील राजकारणात या नेत्यांची भुमिका महत्वपुर्ण ठरत आली आहे.अशा काही मोजक्या नेतृत्वापैकी स्वकर्तृत्वाने राजकारण,समाजकारणात अढळ स्थान निर्माण केलेले व शेतकरी,कष्टकरी यांना केंद्रबिंदू मानुन त्यांच्या प्रश्नांसाठी बांधावर उतरुन हाती घेतलेला प्रश्न मार्गी लावणारे व परळीच्या ग्रामीण भागाची ओळख निर्माण केलेले नेतृत्व म्हणजे राजेश गित्ते.  कै.प्रा.एच.पी.गित्ते यांचे शैक्षणीक क्षेत्रातील योगदान व शिस्त यामुळे गित्ते परिवार पुर्वीपासुनच परळी तालुक्यात परिचित होता.शैक्षणीक वारशाच्या या घरात जन्मलेल्या राजेश गित्ते यांच्याकडे बालपणापासुनच नेतृत्वगुण वाढत गेले.विद्यार्थीदशेत अनेक उपक्रम,आंदोलनात सहभाग नोंदवत हे युवानेतृत्व फुलत गेले.सर्वांना सोबत घेवुन चालण्याच्या त्यांच्या कार्यशैलीमुळे अगदी कमी वयात त्यांनी आपल्या बेलंबा गावचे सरपंच होण्याचा मान पटकावला.इतर सरपं...