पोस्ट्स

MB NEWS- *सात्विकभाव हा आदर्श जीवनप्रणालीचा पाया - ह.भ.प.बाळकृष्ण महाराज वसंतगडकर*

इमेज
 *सात्विकभाव हा  आदर्श जीवनप्रणालीचा पाया - ह.भ.प.बाळकृष्ण महाराज वसंतगडकर*  परळी वैजनाथ ।प्रतिनिधी.......           गीता -भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे असे संतप्रमाण आहे. त्या अनुषंगाने विचार करता संतसंग जीवनाचे परिवर्तन घडवून आणणारा असतो. यासाठी अध्यात्मिक बैठक गरजेची असुन  सात्विकभाव व अध्यात्मिक संगती आदर्श जीवनाची पायाभरणी करणारी असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. बाळकृष्ण महाराज वसंतगडकर(सातारा)   यांनी केले.          परळी तालुक्यातील नंदनज येथील बाबुराव पंढरीनाथ आघाव व जिल्हा परिषद सदस्य प्रा.मधुकर आघाव यांच्या मातोश्री सौ.पंचफुलाबाई पंढरीनाथ आघाव यांच्या गोडजेवणाच्या कार्यक्रमानिमित्त दि. 19  नोव्हेंबर रोजी किर्तन महोत्सव झाला. दुपारी 1 ते 3 वा.  बाळकृष्ण दादा वसंतगडकर (सातारा)  यांचे किर्तन झाले. याप्रसंगी त्यांनी विविध दृष्टांत व अमोघ वाणीतून तत्त्वचिंतन मांडले.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या "स्वगत सच्चिदानंद मिळोनी, शुध्द सत्वगुणे विणली रे, षड्गुण गोंडे रत्नजडीत तुज, श्यामसुंद...

MB NEWS-⬛ *ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळीत साकारणार राष्ट्रभक्तीचे स्फूर्तीस्थळ !* 🕳️ *_गटनेते वाल्मिक कराड यांच्या पुढाकाराने परळीमध्ये उभारला जाणार "अतिविशाल तिरंगा ध्वज" आणि "आय लव्ह परळी" सेल्फी पॉइंट - बाजीराव भैय्या धर्माधिकारी_*

इमेज
⬛  *ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळीत साकारणार राष्ट्रभक्तीचे स्फूर्तीस्थळ  !* 🕳️  *_गटनेते वाल्मिक कराड यांच्या पुढाकाराने परळीमध्ये उभारला जाणार  "अतिविशाल तिरंगा ध्वज" आणि  "आय लव्ह परळी" सेल्फी पॉइंट - बाजीराव भैय्या धर्माधिकारी_* परळी वैजनाथ, प्रतिनिधी......         परळी वैजनाथ हे एक राष्ट्रीय महत्व असणारे शहर असुन परळी शहर आता एका वेगळ्या कारणासाठी देशाच्या नकाशावर येणार आहे. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात परळी शहर झपाट्याने विकसित शहराच्या दिशने जात आहे.परळी शहराच्या मूलभूत सोयी सुखसुविधा बाबत अनेक विद्यमान प्रकल्प  कार्यान्वित आहेतच,आता या  विकासयात्रेत परळीच्या शिरपेचात मानाचा एक तुरा खोवला जाणार आहे.शहराच्या सौन्दर्यामध्ये आणखी एक भर पडेल अशी बाब निर्माण करण्यात येत आहे. ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळीत  राष्ट्रभक्तीचे स्फूर्तीस्थळ साकारणार आहे.परळीमध्ये  45 मीटरचा "अतिविशाल तिरंगा ध्वज" आणि  " आय लव्ह परळी" सेल्फी ...

MB NEWS-राजेश गिते यांच्या लोकनेता संपर्क कार्यालयात ॲड. दत्तात्रय महाराज आंधळे यांचा सत्कार

इमेज
  राजेश गिते यांच्या लोकनेता संपर्क कार्यालयात ॲड. दत्तात्रय महाराज आंधळे यांचा सत्कार परळी वैजनाथ, प्रतिनिधी... राजेश गिते यांच्या लोकनेता संपर्क कार्यालयात संतवाड्;मयाचे संशोधन कार्याबद्यल तसेच संतजगमित्र नागा चरित्र लिखाण केले म्हणून ॲड दत्तात्रय महाराज आंधळे यांना पिरंगुट ,पुणे यांचे तर्फे संतजगमित्र पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल महाराजांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी  भाजपा नेते राजेश गिते,नंदनंज सरपंच अनिल गुट्टे,लोणारवाडी सरपंच नवनाथ मुंडे,मिरवट सरपंच धुराजी साबळे मिरवट उपसरपंच रामेश्वर महाराज इंगळे, गणेश मुंडे, प्रविण गुट्टे,आदि उपस्थित होते.

MB NEWS- *नि:संशय परळी वैजनाथ हेच बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग; काशीच्या विद्वतसभेत मुद्द्याची पुनर्मांडणी करणार !* 💢 *_संकेश्वरपिठाधिश शंकराचार्यांसह संत-महंतांची परळीतील धर्मसभेत ग्वाही_* 💢

इमेज
 *नि:संशय परळी वैजनाथ हेच बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग; काशीच्या विद्वतसभेत मुद्द्याची पुनर्मांडणी करणार !* 💢  *_संकेश्वरपिठाधिश शंकराचार्यांसह संत-महंतांची परळीतील धर्मसभेत ग्वाही_* 💢 परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......      भगवंत कणाकणात भरलेला आहे.मात्र काही स्थानांच्या बाबतीत विनाकारण भाविक भक्तांना विक्षेप दर्शवला जातो.बारा ज्योतिर्लिंग स्थानाबाबत काही भागात वेगवेगळे मतप्रवाह व मान्यता असल्याचे दिसते. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थान हे नि:संशय परळी वैजनाथ हेच आहे. आद्य शंकराचार्यांपासुन ते आजपर्यंत सर्वांनी हेच स्थान दिग्दर्शित केलेले आहे.त्यामुळे हा कोणाच्या मान्यतेचा विषयच नाही तरीपण या मुद्यावरून होणारा संभ्रम दुर करण्यासाठी काशीच्या विद्वतसभेत या मुद्द्याची पुनर्मांडणी करणार असल्याची ग्वाही संकेश्वरपिठाधिश शंकराचार्य प.प.अभिनव विद्यानृसिंह स्वामी व अन्य संत-महंतांनी परळीतील धर्मसभेत दिली.      संकेश्वर पिठाचे शंकराचार्य जगद्गुरू प.प.अभिनव विद्यानृसिंह स्वामी महाराज, दंडीस्वामी प.पु. अमृताश्रम स्वामी महाराज, हिमाचल प्रदेश येथील प.पु.ज...

MB NEWS-नंदागौळचे भुमीपुत्र डॉ.सुनील गित्ते यांची राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण व संशोधन संस्था मुंबई येथे संचालक पदावर नियुक्ती

इमेज
  नंदागौळचे भुमीपुत्र डॉ.सुनील गित्ते यांची राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण व संशोधन संस्था मुंबई येथे संचालक पदावर नियुक्ती  नंदागौळकरांच्या वतीने  डॉ.सुनील गित्तेचा सत्कार  संपन्न  परळी(प्रतींनिधी) परळी तालुक्यातील नंदागौळ येथील डॉ.सुनील विलासराव गित्ते हे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून नियुक्त झालेले अधिकारी असून त्यांनी यापूर्वी छतीसगड राज्यात आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक तसेच निर्माण भवन , नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य विभागात सहाय्यक महानिदेशक म्हणून प्रभावीपणे काम केलेले आहे , या कार्याची दखल घेत केंद्रशासनाने त्यांची मुंबई येथे राष्ट्रीय राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण व संशोधन संस्थेत संचालक या पदावर नुकतीच नेमणूक करण्यात आली असून , त्यांची निवड झाल्यामुळे नंदागौळसह बीड जिल्ह्याचा एक भूमीपुत्र एका महत्वाचा पदावर आल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला असून , त्यांचा सत्कार नंदागौळचे सरपंच सुंदर गित्ते यांनी ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन केला , यावेळी त्यांचे बंधु प्राध्यापक चंद्रकांत गित्ते , महाराष्ट्र राज्य संगणकपरिचाल...

MB NEWS-⬛ आजचे राशिभविष्य ⬛ दि.२० नोव्हेंबर २०२१

इमेज
  ⬛ आजचे राशिभविष्य ⬛      दि.२० नोव्हेंबर २०२१ मेष-खर्चावर नियंत्रण आवश्यक. आर्थिक नियोजनाचा अभाव संभवतो. वस्तू सांभाळून ठेवा. प्रतिक्रिया देताना कोणालाही वाईट वाटणार नाही, याची काळजी घ्या.        वृषभ-एकाग्रतेने कामे पूर्ण होतील. मनासारख्या घटना घडतील. आत्मविश्‍वास वाढेल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. अलंकार, वस्त्रे मनासारखी खरेदी कराल. मिथुन-नको त्या गोष्टींना अवास्तव महत्त्व देऊ नका. प्रतिक्रिया सावधपणे द्या. जामीन राहू नका. आत्मचिंतनाची गरज. कर्क-चिकाटीने व आत्मविश्‍वासाने व्यवसायात यश मिळेल. लोकांपर्यंत आपले काम पोहोचेल. लाभदायक दिवस. व्यावहारिक चातुर्याने यशस्वी व्हाल. सिंह-अनेक दिवसांपासून चालू असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. कामाचे कौतुक होईल. वरिष्ठांची मर्जी राखाल. कुटुंबीयांसाठी वेळ द्याल. सांस्कृतिक कार्यात सहभागी व्हाल. कन्या-आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. नियमांचे पालन करा. आळस सोडायला हवा. मनाविरुद्ध घटना घडतील. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तूळ-मानसिक व शारीरिक आरोग्य सांभाळा. लोक काय म्हणतील, याचा विचार न करता निर्णय घ्यावा. नको त...

MB NEWS-आंदोलन सुरूच राहणार : टिकैत

इमेज
  आंदोलन सुरूच राहणार : टिकैत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली असली तरी आंदोलन सुरूच राहील, असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितले आहे. संसदेत ज्या दिवशी कायदे रद्द केले जातील, त्या दिवसाची आम्ही वाट पाहू, असे टिकैत यांनी खाजगी दूरचित्रवाहिणीशी बोलताना सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या घोषणेवर त्यांनी अविश्वासही दर्शविला. तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी सरकारला ही विधेयके संसदेत सादर करावी लागतील. यावर सदनात चर्चा झाल्यानंतर सरकारकडून ती मागे घेतली जात असल्याबद्दल निवेदन करावे लागेल. तीन कृषी कायद्यांचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयातही पोहोचला होता. गेल्या जानेवारी महिन्यात झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत कायद्याना स्थगिती दिली जात असल्याचे सांगितले होते. मात्र त्यावेळी कायद्यांतील तरतुदींचा अभ्यास करण्यासाठी एका तज्ञ समितीची स्थापना केली होती.