MB NEWS-आंदोलन सुरूच राहणार : टिकैत

 आंदोलन सुरूच राहणार : टिकैत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली असली तरी आंदोलन सुरूच राहील, असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितले आहे. संसदेत ज्या दिवशी कायदे रद्द केले जातील, त्या दिवसाची आम्ही वाट पाहू, असे टिकैत यांनी खाजगी दूरचित्रवाहिणीशी बोलताना सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या घोषणेवर त्यांनी अविश्वासही दर्शविला.

तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी सरकारला ही विधेयके संसदेत सादर करावी लागतील. यावर सदनात चर्चा झाल्यानंतर सरकारकडून ती मागे घेतली जात असल्याबद्दल निवेदन करावे लागेल.

तीन कृषी कायद्यांचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयातही पोहोचला होता. गेल्या जानेवारी महिन्यात झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत कायद्याना स्थगिती दिली जात असल्याचे सांगितले होते. मात्र त्यावेळी कायद्यांतील तरतुदींचा अभ्यास करण्यासाठी एका तज्ञ समितीची स्थापना केली होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार