MB NEWS-⬛ आजचे राशिभविष्य ⬛ दि.२० नोव्हेंबर २०२१

  ⬛ आजचे राशिभविष्य ⬛

     दि.२० नोव्हेंबर २०२१



मेष-खर्चावर नियंत्रण आवश्यक. आर्थिक नियोजनाचा अभाव संभवतो. वस्तू सांभाळून ठेवा. प्रतिक्रिया देताना कोणालाही वाईट वाटणार नाही, याची काळजी घ्या.

      

वृषभ-एकाग्रतेने कामे पूर्ण होतील. मनासारख्या घटना घडतील. आत्मविश्‍वास वाढेल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. अलंकार, वस्त्रे मनासारखी खरेदी कराल.


मिथुन-नको त्या गोष्टींना अवास्तव महत्त्व देऊ नका. प्रतिक्रिया सावधपणे द्या. जामीन राहू नका. आत्मचिंतनाची गरज.


कर्क-चिकाटीने व आत्मविश्‍वासाने व्यवसायात यश मिळेल. लोकांपर्यंत आपले काम पोहोचेल. लाभदायक दिवस. व्यावहारिक चातुर्याने यशस्वी व्हाल.


सिंह-अनेक दिवसांपासून चालू असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. कामाचे कौतुक होईल. वरिष्ठांची मर्जी राखाल. कुटुंबीयांसाठी वेळ द्याल. सांस्कृतिक कार्यात सहभागी व्हाल.


कन्या-आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. नियमांचे पालन करा. आळस सोडायला हवा. मनाविरुद्ध घटना घडतील. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.


तूळ-मानसिक व शारीरिक आरोग्य सांभाळा. लोक काय म्हणतील, याचा विचार न करता निर्णय घ्यावा. नको तेच विषय समोर येतील. संयम ठेवणे गरजेचे आहे.


वृश्‍चिक- कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. जोडीदाराची साथ लाभेल. आर्थिक उन्‍नती होईल.


धनु-नोकरीत पदोन्‍नतीचे योग संभवतात. आरोग्याच्या द‍ृष्टीने अनुकूल दिवस. मध्यस्थी करून संतुलन साधल्यामुळे प्रतिष्ठा वाढेल. नव्या संधी चालून येतील.


मकर-मानसिकता व द‍ृष्टिकोन सकारात्मक ठेवणे गरजेचे आहे. कामाला प्राधान्य द्या. गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. संवादाने प्रश्‍न सोडवावे लागतील.


कुंभ-नियोजित कामांत अडचणी येतील. क्रोधावर नियंत्रण ठेवा. आत्मविश्‍वास कमी होईल. निष्काळजीपणा मनःस्ताप देऊ शकतो.


मीन-कलाकार, लेखकांना प्रोत्साहन मिळू शकेल. आर्थिक प्रगती होईल. धनप्राप्तीचे योग. नव्या मित्रमंडळींची ओळख होईल. लाभदायक दिवस.          

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार