MB NEWS-⬛ *ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळीत साकारणार राष्ट्रभक्तीचे स्फूर्तीस्थळ !* 🕳️ *_गटनेते वाल्मिक कराड यांच्या पुढाकाराने परळीमध्ये उभारला जाणार "अतिविशाल तिरंगा ध्वज" आणि "आय लव्ह परळी" सेल्फी पॉइंट - बाजीराव भैय्या धर्माधिकारी_*



⬛  *ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळीत साकारणार राष्ट्रभक्तीचे स्फूर्तीस्थळ  !*

🕳️  *_गटनेते वाल्मिक कराड यांच्या पुढाकाराने परळीमध्ये उभारला जाणार  "अतिविशाल तिरंगा ध्वज" आणि  "आय लव्ह परळी" सेल्फी पॉइंट - बाजीराव भैय्या धर्माधिकारी_*


परळी वैजनाथ, प्रतिनिधी......

        परळी वैजनाथ हे एक राष्ट्रीय महत्व असणारे शहर असुन परळी शहर आता एका वेगळ्या कारणासाठी देशाच्या नकाशावर येणार आहे. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात परळी शहर झपाट्याने विकसित शहराच्या दिशने जात आहे.परळी शहराच्या मूलभूत सोयी सुखसुविधा बाबत अनेक विद्यमान प्रकल्प  कार्यान्वित आहेतच,आता या  विकासयात्रेत परळीच्या शिरपेचात मानाचा एक तुरा खोवला जाणार आहे.शहराच्या सौन्दर्यामध्ये आणखी एक भर पडेल अशी बाब निर्माण करण्यात येत आहे. ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळीत  राष्ट्रभक्तीचे स्फूर्तीस्थळ साकारणार आहे.परळीमध्ये  45 मीटरचा "अतिविशाल तिरंगा ध्वज" आणि  " आय लव्ह परळी" सेल्फी पॉइंट उभारला जाणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष  बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिली आहे.

         अनेक ठिकाणी जसे की पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे,बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स जवळ तसेच पाम बीच रोडवरील नवी मुंबई महानगर पालिका इमारत,वारजे पुणे, लातूर येथील पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन जवळील स्टेडियम आदी ठिकाणी अतिविशाल तिरंगा ध्वज  बघायला मिळतो. अगदी तसाच 45 मीटर उंचीचा "अतिविशाल तिरंगा" परळीमध्ये वैद्यनाथ महाविद्यालय जवळील नगर परिषदेच्या चौकोणी पाणी टाकीजवळील टेकडीवर उभरण्यात येणार आहे. त्यासोबतच भव्य असा आय लव्ह परळी  ( "I Love Parli") हा सेल्फी पॉइंट देखील निर्माण होणार आहे.पालकमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या सर्वांगीण विकासाभिमुख दृष्टीकोनामूळे हे साकारले जाणार आहे. शहराच्या सौंदर्यात भर घालणार्या या उपक्रमासाठी नगर परिषदेचे गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.

        पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी जिल्हा नियोजन समिती मधून 75 लक्ष रुपये "अतिविशाल तिरंगा ध्वज" करीता मंजूर केले असून जिल्हाधिकारी यांनी नुकतीच या कामाला प्रशासकीय मान्यता देखील दिली आहे.लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होवून प्रत्यक्ष हे काम सुरु होणार आहे. परळीमध्ये अतिविशाल ध्वज प्रस्थापित व्हावा ही अंतःकरण पूर्वक भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांची होती. यामध्ये प्रामुख्याने  शहर सरचिटणीस अनंत ईगळे, नगरसेवक श्रीकृष्ण कराड,माजी नगरसेवक रवी मुळे, प्रा.शामसुंदर दासुद यांनी याबाबत विशेष पाठपुरावा केला. हे कार्य आता मार्गी लागले आहे.यासाठी नगर परिषद गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांनी याबाबत महत्वपूर्ण योगदान दिले असून नगराध्यक्षा सौ. सरोजनीताई हालगे, उपनगराध्यक्ष शकीलभाई कुरैशी, मुख्याधिकारी अरविंद मुंडे ,नगर अभियंता बेंडले  व सर्व नगर परिषद सभापती,नगरसेवक यांचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष  बाजीराव भैय्या धर्माधिकारी व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आभार व्यक्त केले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !