पोस्ट्स

MB NEWS-*कै. राजकुमार मव्हाळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त खडका येथील कै.राजीव गांधी अनु.जाती जमाती निवासी आश्रम शाळेत गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप*

इमेज
  *कै. राजकुमार मव्हाळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त खडका येथील कै.राजीव गांधी अनु.जाती जमाती निवासी आश्रम शाळेत गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप*  सोनपेठ, प्रतिनिधी....          खडका येथील कै.राजकुमार मव्हाळे सेवाभावी संस्था संचलित कै राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रम शाळेत कै. राजकुमार मव्हाळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शालेय साहित्याचे व गणवेशाचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. राजकुमार मव्हाळे यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्यात आला.         कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रम शाळा खडका येथे कै. राजकुमार मव्हाळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे हे होते. यावेळी व्यासपीठावर कोषाध्यक्ष ज्ञानोबा मव्हाळे, पोलीस पाटील वैजनाथ यादव, इर्शाद कुरेशी, मुख्याध्यापक डी.एल.सोनकांबळे,राजेश मव्हाळे, वस्तिगृह अधिक्षक डी.एम.माने, इ.एन.हारगिले आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक...

MB NEWS- *लावण्य पब्लिक स्कूलने मुलांच्या सुप्तगुणांना वाव द्यावा- संपादक अनंत कुलकर्णी *लावण्य पब्लिक स्कूल मध्ये ‘ख्रिसमस डे’ उत्साहात साजरा*

इमेज
 *लावण्य पब्लिक स्कूलने मुलांच्या सुप्तगुणांना वाव द्यावा- संपादक अनंत  कुलकर्णी --------------------------- परळी वैजनाथ, (प्रतिनिधी):- लावण्य पब्लिक स्कूलच्या वतीने नेहमी विविध सण, उत्सव साजरे करण्याची परंपरा कायम राखली असून लावण्य शाळेने असे उपक्रम राबवावे व मुलांच्या सुप्तगुणांना वाव द्यावा असे प्रतिपादन सा.परळी संचारचे संपादक अनंत कुलकर्णी यांनी केले. शहरातील लावण्य पब्लिक स्कूलच्या वतीने ‘ख्रिसमस डे’ निमित्त सकाळी कार्यक्रमाचे करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात अनंत कुलकर्णी बोलत होते. यावेळी लावण्य पब्लिक स्कूलचे प्राचार्या अस्मिता गोरे, जाधव सर यांच्यासह कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. पुढे बोलताना अनंत कुलकर्णी म्हणाले, कोरोनाच्या संकटानंतर दीड वर्षानंतर शासनाने निर्बंध हटवून शाळा सुरू केल्या आहेत. यामुळे चिमुकल्यांवर चेहर्‍यावर आनंद व्यक्त आहेत. शाळेच्या माध्यमातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यावा तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करावेत असे सांगून शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले. दरम्यान, ...

MB NEWS- *सिंधुबाई व्यंकटराव कुलकर्णी यांचे निधन*

इमेज
 *सिंधुबाई  व्यंकटराव  कुलकर्णी  यांचे निधन*  लातूर (  प्रतिनिधी)  लातुर  येथील  माजी तलाठी  व्यंकटराव कुलकर्णी  यांच्या  पत्नी सिंधुबाई  कुलकर्णी  याचे अल्पशा  आजाराने दि.२४ रोजी  मध्यरात्री एक  वाजता  दुखद  निधन  झाले       लातूर शहरातील  माजी  तलाठी   व्यंकटराव कुलकर्णी  यांच्या   पत्नी  सिंधुबाई   कुलकर्णी  ह्या  अनेक दिवसापासुन   आजारी  होते.   दि २४ रोजी मध्यरात्रीच्या  एक वाजता  अल्पशा  आजाराने  दुखद  निधन झाले   त्यांच्या  पश्चात  पती एक मुलगा तीन मुली  सुना नातवंडे  असा  परिवार  आहे   शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख शिवाजी  दादा  कुलकर्णी  यांच्या   सासु होत तसेच  शाम  कुलकर्णी  (टेलर) यांच्या  मामी  होत्या   सिंधुबाई  कुलकर्णी  यांच्य...

MB NEWS- *हिवाळी अधिवेशनात परळी मतदारसंघातील 13 तलाठी कार्यालये, निवासस्थाने व 7 रस्त्यांच्या विकासकामांसाठी 29.13 कोटी!* *13 सज्जाच्या ठिकाणी होणार तलाठी कार्यालये; परळी मतदारसंघातील 7 महत्वाच्या रस्त्यांचे होणार पुनरुज्जीवन - धनंजय मुंडे*

इमेज
 *हिवाळी अधिवेशनात परळी मतदारसंघातील 13 तलाठी कार्यालये, निवासस्थाने व 7 रस्त्यांच्या विकासकामांसाठी 29.13 कोटी!* *13 सज्जाच्या ठिकाणी होणार तलाठी कार्यालये; परळी मतदारसंघातील 7 महत्वाच्या रस्त्यांचे होणार पुनरुज्जीवन - धनंजय मुंडे* मुंबई (दि. 23) ---- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या मागणीनुसार परळी मतदारसंघातील 13 तलाठी कार्यालये व निवासस्थानांची उभारणी व 7 महत्वाच्या रस्त्यांच्या रुंदीकरण व सुधारणा कामे यासाठी हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमधून एकूण 29.13 कोटी रुपयांच्या कामांना निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे. परळी तालुक्यातील 13 तलाठी कार्यालये व निवासस्थाने त्या-त्या सज्जाच्या ठिकाणी उभारणीच्या कामांसाठी पुरवणी मागण्यांमधून एकूण 3.18 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर परळी व माजलगाव या दोनही मतदारसंघातील महत्वाच्या लवूळ-पात्रुड-गोवर्धन-जीवणापूर या 55 किमी रस्त्याचे रुंदीकरण, सुधारणा व लहान पुलाच्या कामासाठी 4.5 कोटी रुपये त्याचप्रमाणे  खोडवा सावरगाव-दैठणा-अंतरवेली रस्त्यासाठी 3 कोटी रुपये निधी मंज...

MB NEWS-*धनंजय मुंडे यांचा यशस्वी पाठपुरावा; जिल्हा जातपडताळणी समित्यांना एकाच दिवसात मिळाले 14 अधिकारी!* *महसूल विभागाने 20 अधिकाऱ्यांना दिली पदोन्नती, त्यापैकी 14 जणांची जिल्हा जातपडताळणी समित्यांच्या अध्यक्षपदी नियुक्ती* *प्रभारी राज कमी झाल्याने जातपडताळणी प्रक्रियेचा वाढणार वेग*

इमेज
*धनंजय मुंडे यांचा यशस्वी पाठपुरावा; जिल्हा जात पडताळणी समित्यांना एकाच दिवसात मिळाले 14 अधिकारी!* *महसूल विभागाने 20 अधिकाऱ्यांना दिली पदोन्नती, त्यापैकी 14 जणांची जिल्हा जातपडताळणी समित्यांच्या अध्यक्षपदी नियुक्ती* *प्रभारी राज कमी झाल्याने जातपडताळणी प्रक्रियेचा वाढणार वेग* मुंबई (दि. 23) ---- : राज्यातील जिल्हानिहाय जात पडताळणी समित्यांना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे महसूल विभागाने दिलेल्या पदोन्नती मधून एकाच दिवशी 14 अधिकारी (अध्यक्ष) मिळाले आहेत.  महसूल विभागाने तात्पुरत्या पदोन्नतीची एकूण 20 अधिकाऱ्यांची यादी बुधवारी (दि.22) निर्गमित केली असून यामधून तब्बल 14 अधिकाऱ्यांना विविध जिल्ह्यातील जात पडताळणी समित्यांच्या अध्यक्ष पदी नियुक्ती देण्यात आली आहे. राज्यात एकूण 36 जातपडताळणी समित्या जिल्हा स्तरांवर कार्यरत असून, जवळपास 20 जिल्ह्यात प्रभारी राज असल्याने जातपडताळणी प्रक्रियेस काही प्रमाणात विलंब लागत होता. त्या 20 पैकी आता 14 ठिकाणी पूर्णवेळ अधिकारी मिळाल्याने जातपडताळणी प्रक्रियेचा वेगही वाढणार आहे. दरम्यान सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंड...

MB NEWS- राष्ट्रीय शेतकरी दिन विशेष लेख-*अनुप भावसार (कुसूमकर)*

इमेज
 * राष्ट्रीय शेतकरी दिन* जगात *कृषि प्रधान देश* अशी ओळख असलेल्या भारतातील शेतकर्यांची जगातील कृषीशी निगडीत असलेल्या क्षेत्रात प्रगति की अधोगती सुरू आहे? असा प्रश्न निर्माण होत आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा भारताचा राष्ट्राच्या उत्पन्नात शेतीचा वाटा हा पन्नास टक्यांच्या आसपास होता, तो आज २२ ते २५ टक्याच्या आसपास आला आहे. आज समाजातील विविध घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करते. मात्र देशाचा व जगाचा पोशिंदा अशी मोठी बिरुदावली असलेल्या शेतकरी व शेतीच्या प्रगतीसाठी, शेतीमालच्या दरवाढीसाठी, शेतकर्याची आर्थिक, सामाजिक स्थिति सुधारण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होतात का हाही संशोधनाचा विषय आहे.  आज देशात *राष्ट्रीय शेतकरी दिन* साजरा होत असताना देशभरातील शेतकरी राजाची सध्याची स्थिति, त्यांचा आर्थिक स्तर, सामाजिक पत, त्यांना समाजाकडून मिळणारी वागणूक आदि बाबीचा विचार करणे यानिमित्ताने गरजेचे आहे. सरकारे आली पुन्हा बदलली मात्र शेतकरी राजाची परस्थिती मात्र *जैसे थे* अश्याच स्वरूपाची असते.   राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या निमिताने शेतकर्याची आ...

MB NEWS- *विमा प्रश्नावर किसान सभेकडून पाठपुरावा*

इमेज
 *विमा प्रश्नावर किसान सभेकडून पाठपुरावा* परळी वै.ता.22 प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वेळोवेळी आवाज उठवणाऱ्या अखिल भारतीय किसान सभेच्या जिल्हा कमिटीच्या शिष्टमंडळाने बुधवार दि. २२ रोजी, खरीप २०१८, खरीप २०२० व खरीप २०२१ बाबत कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांची भेट घेतली व तब्बल २ तासाहून अधिक वेळ पीक विमा धोरण, त्यातील तांत्रिक व इतर अडचणींवर उहापोह केला. २०१८ साली बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामाचा पीक विमा ओरिएंटल विमा कंपनीने मंजूर केला होता परंतु वाटप केला नव्हता, त्याप्रश्नावर किसान सभेने पुणे येथे संबंधित विमा कंपनी कार्यालयासमोर २०१९ मध्ये ७ दिवस ठिय्या आंदोलन केले होते व शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम वर्ग करून घेतली होती. परंतु काही विमा धारकांचा विमा भरतेवेळी तांत्रिक चुका झाल्याने सुमारे 5 हजार शेतकऱ्यांना कंपनीने विमा नाकारला होता त्यांना तात्काळ विमा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने व किसान सभे तर्फे कॉ.एड. अजय बुरांडे यांनी कृषी आयुक्तांना केली. आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत, ओरिएंटल कम्पनी व किसान सभेची लवकरच बैठक लावून प्रश्न निका...