पोस्ट्स

MB NEWS-*पिक विम्यासाठी तहसीलदारांना किसान सभा देणार निवेदन कॉ. अजय बुरांडे* परळी वै.ता.१५ प्रतिनिधी २०२० चा पिक विमा तात्काळ मिळावा या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने बीड जिल्हयातील सर्व तहसीलदारांना सोमवारी (ता.१७) निवेदन देण्यात येणार आहे. मागील पंधरा दिवसा पासुन पिक विम्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांकडुन तक्रार अर्ज घेण्याची मोहीम किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. त्यास मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहीती किसान सभेचे कॉ. अजय बुरांडे यांनी दिली आहे. विमा कंपनी व शासनाच्या दारात किसान सभेच्या वतीने मागील सहा महिन्या पासुन २०२० चा पिक विमा मिळावा यासाठी विविध मार्गानी आंदोलने केली आहेत. काही तांत्रीक बाबी पुढे करूण शेतकऱ्यांची नुकसान होउनही विमा कंपनीने बीड जिल्हयातील सुमारे लाखो शेतकऱ्यांना विम्या पासुन वंचित ठेवलेल आहे. २०१८ च्या पिक विम्या पासुन ५ हजार शेतकरी पासुन वंचित आहेत. २०२१ चा विमा देताना शेतकऱ्यांमध्ये संदिग्धता निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या बीड जिल्हयातील कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावात जाउन सर्व शेतकऱ्यांकडुन विम्याची माहीती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. या मोहीमेस शेतकऱ्यांमधुन प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. जिल्हयातील तहसील कार्यालया समोर सोमवारी (ता.१७) मोर्चा काढण्यात येणार होते. परंतु कोरोणाचे रूग्न वाढत असल्याने शासनानी मोर्चा, आंदोलने करण्यावर निर्बंध घातले असल्याने कोरोना नियमाचे पालन करित केवळ प्रातीनिधीक स्वरूपात निवेदन देण्यात येणार आहे. गाव पातळीवर प्रत्येक शेतकऱ्यांची माहीती गोळा करण्याची मोहीम मात्र सुरूच राहणार आहे. निर्बंधामध्ये शिथीलता आल्यावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहीती महाराष्ट्र राज्य किसान सभेचे कॉ. अजय बुरांडे, कॉ. दत्ता डाके, कॉ. पांडुरंग राठो, कॉ. मुरलीधर नागरगोजे, कॉ.मोहन लांब, कॉ. काशिनाथ सिरसाट कॉ. जगदिश फरताडे, कॉ. सुदाम शिंदे यांनी दिली आहे.

इमेज
 *पिक विम्यासाठी तहसीलदारांना किसान सभा देणार निवेदन कॉ. अजय बुरांडे* परळी वै.ता.१५ प्रतिनिधी      २०२० चा पिक विमा तात्काळ मिळावा या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने बीड जिल्हयातील सर्व तहसीलदारांना सोमवारी (ता.१७) निवेदन देण्यात येणार आहे. मागील पंधरा दिवसा पासुन पिक विम्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांकडुन तक्रार अर्ज घेण्याची मोहीम किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. त्यास मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहीती किसान सभेचे कॉ. अजय बुरांडे यांनी दिली आहे.       विमा कंपनी व शासनाच्या दारात किसान सभेच्या वतीने मागील सहा महिन्या पासुन २०२० चा पिक विमा मिळावा यासाठी विविध मार्गानी आंदोलने केली आहेत. काही तांत्रीक बाबी पुढे करूण शेतकऱ्यांची नुकसान होउनही विमा कंपनीने बीड जिल्हयातील सुमारे लाखो शेतकऱ्यांना विम्या पासुन वंचित ठेवलेल आहे. २०१८ च्या पिक विम्या पासुन ५ हजार शेतकरी पासुन वंचित आहेत. २०२१ चा विमा देताना शेतकऱ्यांमध्ये संदिग्धता निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या बीड जिल्हयातील कार्यकर्त्यांनी प्रत्येक...

MB NEWS- *मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात परळी मतदारसंघात रस्ते विकासाची गंगा* *रविवारी ना. मुंडे करणार 9 महत्वाच्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन*

इमेज
 *मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात परळी मतदारसंघात रस्ते विकासाची गंगा* *रविवारी ना. मुंडे करणार 9 महत्वाच्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन*  परळी (दि. 15) ---- : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून परळी मतदारसंघात पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्यात येत असून मतदारसंघातील 9 महत्वाच्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन धनंजय मुंडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी (ता. 15) कोविडविषयक निर्बंधांचे पालन करून व मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.  परळी मतदारसंघातील भिलेगाव ते कावळ्याची वाडी, भिलेगाव फाटा येथे सकाळी 9 वा., जयगाव ते पांढरी तांडा, जयगाव येथे सकाळी 10वा., राज्य मार्ग 211 ते बोरखेड रस्ता, बोरखेड येथे सकाळी 11 वा., राज्य मार्ग 211 ते तेलसमुख रस्ता, तेलसमुख येथे दु. 12 वा., राज्य मार्ग 16 ते कौडगाव साबळा, कौडगाव साबळा येथे दुपारी 1 वा. , राज्य मार्ग 16 ते देशमुख टाकळी, देशमुख टाकळी येथे दुपारी 2 वा., संगम ते लोणारवाडी व इजिमा 137 ते वाण टाकळी तांडा, संगम येथे दुपारी 3 वा., राज्य मार्ग 233 ते कासारवाडी रस्त...

MB NEWS-बदललेले वातावरण, कोरोनाचा भयगंड अन् मोठ्या प्रमाणावर व्हायरल इन्फेक्शन

इमेज
बदललेले वातावरण, कोरोनाचा भयगंड अन् मोठ्या प्रमाणावर व्हायरल इन्फेक्शन    परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       गेल्या काही दिवसांपासून दिवसभर ढगाळ वातावरण पसरले आहे. त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर व्हायरल इन्फेक्शन झाले आहे.बदललेले वातावरण, कोरोनाचा भयगंड अन् मोठ्या प्रमाणावर व्हायरल इन्फेक्शन यामुळे नागरीक हैराण झाले आहेत.रुग्णालयांमध्ये गर्दी वाढली असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.         यावर्षी थंडी प्रमाण निश्‍चितच लक्षणीय आहे. मोठ्या प्रमाणावरचा पाऊस, त्याचबरोबर इतरत्रचा वातावरणातील बदलसुध्दा कारणीभूत ठरला आहे. त्यामुळे थंडीची लाट कायम आहे. गेल्या चार दिवसांपासून वातावरण पूर्णतः बदलले आहे. विशेषतः दोन दिवसांपासून सूर्यदर्शनच नाही. दिवसभर ढगाळ वातावरण कायम आहे. त्याचा परिणाम हवेत कमालीचा गारवा आहे. थंड वारे आणि या गारव्यामुळेच जनजीवन विस्कळीत झाले आहे. वातावरणातील मोठ्या प्रमाणावरच्या या बदलाने व्हायरल इन्फेक्शनसुध्दा होत आहे. गारव्याने, थंड हवेने सर्वदूर सर्दी, खोकला, अंगदुखी अशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर येवू लागल्या आहेत. कोरोनाच्या पार...

MB NEWS-⬛ 10 रुपयाचे नाणी न स्विकारणार्‍याविरुध्द कारवाई करा ! 🔸 दहा रुपयांसह कोणतीच नाणी बंद झाली नाहीत! अफवांवर विश्वास ठेउ नये - बँकांचा खुलासा

इमेज
  ⬛ 10 रुपयाचे नाणी न स्विकारणार्‍याविरुध्द कारवाई करा ! 🔸 दहा रुपयांसह कोणतीच नाणी बंद झाली नाहीत! अफवांवर विश्वास ठेउ नये - बँकांचा खुलासा परळी वैजनाथ / प्रतिनिधी. .............     चलनातील कोणतीही नाणी बंद झालेली नाहीत किंवा बंदही होणार नाहीत. या बाबतीत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेउ नये. पाच, दहा रुपयांची नाणी चलनातच राहणार आहेत असा खुलासा राष्ट्रीयीकृत बँकांनी केला आहे.          सध्या बाजारात दहा रुपयांची नाणी चालणार नसल्याची अफवा जोरदार पसरली गेली व त्यामुळे ही नाणी स्विकारली जात नसल्याचे दिसते.या अफवेने नागरिकांनी आपल्या जवळील दहा रुपयांची नाणी बँकांमध्ये जमा करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. तसेच अनेक छोट्या व्यापाऱ्यांनी ही नाणी घेण्याचे बंद केले आहे. नागरिकांनी ही  नाणी स्विकारायला नकार द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे बाजारपेठेत दहाची नाणी चलनातून बंद जवळपास बंद झाली आहेत.               दरम्यान या बाबत आमच्या प्रतिनिधीने स्टेट बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता ही निव्वळ अफवा...

MB NEWS-वाल्मिक अण्णांच्या वाढदिवसा निमित्त गोपाळ आंधळे यांची येडसी ते तुळजापूर पायी दिंडी

इमेज
  वाल्मिक अण्णांच्या वाढदिवसा  निमित्त गोपाळ आंधळे यांची येडसी ते तुळजापूर पायी दिंडी  परळी (प्रतिनिधी)नगर पालिकेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त माजी शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक सभापती गोपाळ आंधळे यांनी येडेश्वरी देवीचे दर्शन घेऊन येडसी ते कुलस्वामिनी तुळजाभवानी, तुळजापूर आशा पायी दिंडीचे आयोजन केले असून ही पायी दिंडी मा.अण्णांना निरोगी दिघायुष्य लाभावे  यासाठी आयोजित करण्यात आली आहे. परळी नगर पालिकेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांचा दि 29  जानेवारी रोजी वाढदिवस असून हा वाढदिवस  फटाके, आतिषबाजी, बॅनरबाजी यातून साजरा न करता वाल्मिक अण्णांना दीर्घायुष्य लाभो यासाठी नगर पालिकेचे शिक्षण व सांस्कृतिक सभापती गोपाळ आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी येडसी (ता.कळंब) ते तुळजापूर पायी दिंडीचे आयोजन केले आहे. ही पायी दिंडी दि.23 जानेवारी रोजी येडसी येथून निघणार असून यामध्ये गोपाळ आंधळे यांच्या सह हनुमान आगरकर यांच्या सह   शासनाने घालून दिलेल्या नियम व अटिच्या अधिन राहून सहकारी   सहभागी होणार आहेत.

MB NEWS- *डीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फीच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे व नूतनीकरण करण्यास 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ - धनंजय मुंडे*

इमेज
 *डीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फीच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे व नूतनीकरण करण्यास 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ - धनंजय मुंडे* *पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी 31 जानेवारीच्या आत अर्ज करण्याचे धनंजय मुंडेंचे आवाहन* मुंबई (दि. 13) ---- : महा डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी आदी सवलतींचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे किंवा अर्जाचे नूतनीकरण करण्यास 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केले आहे.  त्याचबरोबर 2020-21 या वर्षात अर्ज केलेले मात्र त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना देखील त्रुटींची पूर्तता करणे किंवा अर्जात दुरुस्ती करण्यासाठी 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील सुमारे 4.70 लाख विद्यार्थी दरवर्षी डीबीटी पोर्टलवरून वरील सवलतींचा लाभ घेत असतात. यावर्षी यासाठी अर्ज करणे किंवा अर्जाचे नूतनीकरण करण्यास 12 जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली होती.  काही कोर्सेसचे सीईटी चे राऊंड अजूनही सुरू आहेत, त्यामुळे दि. 12 जानेवारी ...

MB NEWS- पौळ पिंपरीत सन्मान “जिजाऊंच्या लेकींचा”

इमेज
  जिजाऊंचे मातृतीर्थ पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहिल –लक्ष्मण  पौळ  पौळ पिंपरीत सन्मान “जिजाऊंच्या लेकींचा” परळी (प्रतिनिधी) राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माँसाहेबांची जयंती तालुक्यातील मौजे पौळ पिंपरी येथे मोठ्या अभिनव पध्दतीने साजरी करण्यात आली. दि.१२ जानेवारी रोजी जयंती निमित्त विशेष अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माँसाहेब जिजाऊ चौकात हा कार्यक्रम घेण्यात आला. जिजाऊंच्या संकल्पनेतून स्वराज्य उभे राहिले, या स्वराज्याला दोन दोन कर्तृत्ववान छत्रपती मिळाले. त्यांच्या विचारांची रूजवन आणि त्यांच्या विचारांची पेरणी स्वराज्यातील प्रत्येक मावळ्यांत होती. पिंपरीत उभारण्यात आलेले मातृतीर्थ पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी असून, माँसाहेब जिजाऊंनी पेरणी केलेल्या संस्कारांची आठवन करून देत राहिल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ यांनी केले. जिजाऊ जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. तालुक्यातील मौजे पौळ पिंपरी येथे माँसाहेब जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात कोरोनाच्या काळात विशेष कामगिरी बजावलेल्य...