इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS- *मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात परळी मतदारसंघात रस्ते विकासाची गंगा* *रविवारी ना. मुंडे करणार 9 महत्वाच्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन*

 *मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात परळी मतदारसंघात रस्ते विकासाची गंगा*

*रविवारी ना. मुंडे करणार 9 महत्वाच्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन* 


परळी (दि. 15) ---- : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून परळी मतदारसंघात पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्यात येत असून मतदारसंघातील 9 महत्वाच्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन धनंजय मुंडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी (ता. 15) कोविडविषयक निर्बंधांचे पालन करून व मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. 


परळी मतदारसंघातील भिलेगाव ते कावळ्याची वाडी, भिलेगाव फाटा येथे सकाळी 9 वा., जयगाव ते पांढरी तांडा, जयगाव येथे सकाळी 10वा., राज्य मार्ग 211 ते बोरखेड रस्ता, बोरखेड येथे सकाळी 11 वा., राज्य मार्ग 211 ते तेलसमुख रस्ता, तेलसमुख येथे दु. 12 वा., राज्य मार्ग 16 ते कौडगाव साबळा, कौडगाव साबळा येथे दुपारी 1 वा. , राज्य मार्ग 16 ते देशमुख टाकळी, देशमुख टाकळी येथे दुपारी 2 वा., संगम ते लोणारवाडी व इजिमा 137 ते वाण टाकळी तांडा, संगम येथे दुपारी 3 वा., राज्य मार्ग 233 ते कासारवाडी रस्ता, कासारवाडी येथे दुपारी 4 वा. आणि राज्य मार्ग 211 नागदरा रस्ता, नागदरा येथे सायंकाळी 5 वा. या रस्ते विकास कामांचे भूमीपूजन ना. मुंडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.


या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषद सदस्य आमदार संजयभाऊ दौंड, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवकन्या ताई शिरसाट तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.


दरम्यान मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत भूमिपूजन करण्यात येत असलेल्या या सर्व कामांच्या ठिकाणी रविवार दि. 16 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून या भूमीपूजन समारंभास ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते सुरुवात होणार असुन, प्रातिनिधिक स्वरूपात व शासकीय निर्बंधाना अनुसरून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम संपन्न होणार असून कोणत्याही कार्यक्रमात भाषण, सभा होणार नसून केवळ भूमीपूजन कार्यक्रम व छोटेखानी संवाद होणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या