MB NEWS-राज ठाकरे यांनी केले आवाहन..... यामागे कारणही तेवढच महत्त्वाचं

राज ठाकरे यांनी केले आवाहन..... यामागे कारणही तेवढच महत्त्वाचं मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी (१२ जून) सोशल मीडियावर पोस्ट करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलंय. राज ठाकरे यांनी पुण्यातील आपल्या सभेचा उल्लेख करत मनसैनिकांना त्यांच्या शस्त्रक्रियेचे आठवण करून दिली. त्यांनी आपल्या शरीरात ‘कोविड डेड सेल’ असल्यानं घरी क्वारंटाईन असल्याची माहिती देत शस्त्रक्रियेसाठी यंदा वाढदिवसानिमित्त १४ जूनला मी कोणालाही भेटू शकत नसल्याचंही नमूद केलं. • क्लिक करा व वाचा: 🟥 * अस्वस्थ कार्यकर्ता*🟥 _*प्रविण दरेकरांसमोर घोषणाबाजी करत भाजप कार्यकर्त्यांचा पक्षश्रेष्ठींपर्यंत भावना पोहचविण्याचा प्रयत्न*_ राज ठाकरे म्हणाले, “माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो, पुण्यातील सभेत मी सर्वांना सांगितलं की माझी एक शस्त्रक्रिया करायची आहे. मी जेव्हा रुग्णालयात दाखल झालो तेव्हा चाचणीनंतर डॉक्टरांनी ‘कोविडचा डेड सेल’ असल्याचं सांगितलं. ते काय आहे हे मला माहिती नाही, पण ती शस्त्रक्रिया रद्द झाली. आता मी कोविडमुळे १०-१५ दिवस घरी क्वारंटाईन आहे. या सगळ्या दरम्यान १४ जूनला माझा वाढदि...