MB NEWS-उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आलेल्या शिवसैनिकाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आलेल्या शिवसैनिकाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू ठाणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेल्या शहापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांमधील भगवान काळे यांचे ‘मातोश्री’ निवसस्थानाबाहेर निधन झाले. वाशाळा गावातील पदाधिकाऱ्यांना ते आपल्या गाडीतून मातोश्रीवर दाखल झाले होते. बैठक सुरू असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. काळे यांना कलानगर येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला. Click &Read: *रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; 1659 जागांवर परीक्षा न देता मिळणार नोकरी* शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड पुकारल्यामुळे मोठे भगदाड पडले आहे. बंडखोरांविरोधात शिवसैनिक कमालीचे संतापले आहे. मातोश्रीवर येऊन शिवसैनिक पाठिंबा दर्शवत आहे. आज एका शिवसैनिकाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. भगवान काळे असं या शिवसैनिकाचं नाव आहे भगवान काळे हे शहापूर तालुक्यातील रहिवासी आहेत. मागील काही दिवसांपासून शिवसैनिकांची मातोश्री आणि शिवसेनाभवनावर बैठका ...