पोस्ट्स

MB NEWS-परळीत साडेचार लाखांचा गुटखा पकडला

इमेज
  परळीत साडेचार लाखांचा वाहनासह गुटखा पकडला परळी (प्रतिनीधी)  परळी शहरातील विद्यानगर भागात विक्रीसाठी आणलेला गुटख्याने भरलेला छोटा हत्ती टेंम्पो अप्पर पोलिस अधिक्षक कविता नेरकर यांच्या पथकाने पकडुन 4 लाख 59 हजार 803 रुपयांचा गुटखा वाहनासह जप्त केला असुन याप्रकरणी दोघाविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  परळी शहरातील विद्यानगर भागात एका वाहनातून विक्रीसाठी गुटखा आणण्यात आल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे अप्पर पोलिस अधिक्षक कविता नेरकर यांना मिळताच सोमवार दि.12 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता अनिल दौंड,उपनिरीक्षक सिंगाडे मॅडम,चॉंद मेंडके, पोना.देवकते, पोशि. राऊत, खंदारे व इतर दोन खाजगी व्यक्तींनी छापा टाकला असता महिंद्रा जितो टेम्पो मध्ये राजनिवास पान मसाला,बाबा पानमसाला,रत्ना सुगंधीत तंबाखू ,विमल पानमसाला, आर.एम. डी. गुटखा, बाबा तंबाखू असा 59803 रुपयांचा गुटखा व गुटखा विक्रीसाठी आणलेले वाहन असा एकुण 4 लाख 59 हजार 803 रुपयांचा गुटखा जप्त करत दोघाविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात कलम 328,272,273 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MB NEWS-थेट वैष्णोदेवी हून परळीत येणार महाज्योत

इमेज
  चलो बुलावा आया है...माता ने बुलाया है थेट वैष्णोदेवी हून परळीत येणार महाज्योत नाथ प्रतिष्ठाण व राधा मोहन साथी प्रतिष्ठाणचा नवरात्र विशेष उपक्रम परळी/प्रतिनिधी नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आ.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाण, न.प.गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शाखाली व चंदुलाल बियाणी अध्यक्ष असलेल्या  राधा मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने माँ वैष्णोदेवी देखावा सादर करण्यात येत असून या निमित्ताने जम्मू काश्मीर स्थित वैष्णोदेवी मंदिरातून महाज्योत परळीत आणण्यात येत आहे. उद्या दि.14 सप्टेंबर रोजी श्री वैद्यनाथ प्रभूंचे दर्शन घेवून विशेष वाहन वैष्णोदेवीच्या दिशेने जाणार आहे.  गणेशोत्सवानिमित्त परळीकरांचे आकर्षण ठरलेल्या अष्टविनायक दर्शन देखाव्यानंतर नवरात्रोत्सवानिमित्त माँ वैष्णोदेवी दर्शन देखावा साकारला जाणार आहे. औद्योगिक वसाहत येथे 31 ऑगस्टला माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते देखावा उभारणीचे काम सुरू झालेले असून सध्या हे काम प्रगतीपथावर आहे.  नवरात्र उत्सवात 700 फुट अंतराच्या भुयार, डोंगरदर्‍या व वैष्णोदेवी मार्गावर असलेला हुबेहुब देखा...

MB NEWS-लम्पीमुळे पशुधनाची हानी झाल्यासपशुपालकास भरपाई देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

इमेज
  लम्पीमुळे पशुधनाची हानी झाल्यासपशुपालकास भरपाई देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय मुंबई दि.१२ : - लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भावाने पशूचा मृत्यू होऊन हानी झाल्यास अशा पशुधनाच्या पालकांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. नुकसान भरपाईसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. मंत्रिमंडळाच्या याच बैठकीत पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्याबाबत देखील मान्यता देण्यात आली.   राज्यातील पशुधनाला लम्पी चर्मरोगाचा वेगाने प्रादुर्भाव वेगाने होत असल्याने त्यावर उपाययोजना करण्यासाठी आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. यावेळी ज्या शेतकरी किंवा पशुपालकांचे पशुधन या आजारामुळे मृत्यू पावले आहेत त्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणामधील निकषानुसार राज्य शासनाच्या निधीतून भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी संबधित जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स...

MB NEWS-गणेशपार दुर्गोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी बाळकृष्ण फुले तर कार्याध्यक्षपदी शिवाजी देशमुख

इमेज
  गणेशपार दुर्गोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी बाळकृष्ण फुले तर कार्याध्यक्षपदी शिवाजी देशमुख  परळी (प्रतिनीधी)  परळी शहरातील गणेशपार दुर्गोत्सव मंडळाची कार्यकारीणी मुख्य मार्गदर्शक वैजनाथ बागवाले यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात येवुन अध्यक्षपदी बाळकृष्ण फुले तर  कार्याध्यक्षपदी शिवाजी देशमुख यांची निवड करण्यात आली.    परळी शहरातील जुना भाग असलेल्या गणेशपार भागात हिंदु सण सार्वजनिकरित्या साजरे करण्यासाठी या भागातील भक्तांनी पुढाकार घेत सन 1987 साली गणेशपार दुर्गोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरु केली कोरोना काळ वगळता मागील 35 वर्षात अखंडपणे दुर्गोत्सव साजरा केला जातो.गणेशपार भागातील सर्व भक्त यात सहभागी होतात.यावर्षीची कार्यकारीणी निवडण्यासाठी गणेशपार मंदिरात व्यापक बैठक पार पडली.या बैठकीत निवडण्यात आलेल्या उर्वरीत कार्यकारीणीत सचिवपदी: श्रीकांत पाथरकर तसेच सहसचिव: दिनेश लोंढे  उपाध्यक्ष: सचिन स्वामी  उपाध्यक्ष:चारुदत्त करमाळकर  उपाध्यक्ष: संजय गावडे  उपाध्यक्ष: शर्वकुमार चौधरी कोषाध्यक्ष: विष्णुदास भंडारी,सह कोषाध्यक्ष: श्रीकांत वाघमारे मुख्...

MB NEWS- प्रा.रविंद्र जोशी यांचा विशेष ब्लॉग>>>>सर्वांना आपली वाटणारी- "चिमणी" ऐन पन्नाशीत उडाली भुर्रऽऽऽ

इमेज
  परळीत स्थायिक झालेली - इटालियन कुळातील - सर्वांना आपली वाटणारी- "चिमणी" ऐन पन्नाशीत उडाली भुर्रऽऽऽ प रळी वैजनाथ /प्रा.रविंद्र जोशी.....         काही वस्तू, काही व्यक्ती ,काही इमारती, काही जागा ,काही प्राणी, काही पक्षी, काही पदार्थ ,काही कला, काही परंपरा, काही रस्ते, काही चौक, या त्या भागाच्या- त्या त्या गावाच्या- त्या त्या परिसराच्या प्रतिनिधिक प्रतीक बनलेल्या असतात.        परळी व परिसराचे एक ऊर्जावान प्रतीक म्हणून ज्योतिर्लिंग प्रभू वैजनाथ मंदिरानंतर परळी औष्णिक विद्युत केंद्राची ओळख आहे. परंतु परळी औष्णिक विद्युत केंद्र म्हणजे नेमके कोणते चित्र डोळ्यासमोर येणार तर सर्वांच्याच मनामनात आणि डोळ्यात साठवलेले प्रतीक म्हणजे थर्मलच्या धूर निघणाऱ्या तीन चिमण्या. आज या तीन चिमण्यांपैकी एक चिमणी आपल्यातून भूर उडून निघून गेली.       खरंतर ही निर्जीव वस्तू परंतु प्रत्येक परळीकर आला आणि परळीच्या पंचक्रोशीत राहणाऱ्या प्रत्येकाला एक प्रकारची हुरहुर वाटली आणि मन काही काळासाठी का होईना विषन्न झालं प्रत्येकाची भावना आणि प्रतिक्रिया ही शो...

MB NEWS-कोरोना काळातील कार्य: थर्मलचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांचा राज्यपालांनी केला सन्मान

इमेज
  कोरोना काळातील कार्य: थर्मलचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांचा राज्यपालांनी केला सन्मान परळी वैजनाथ:औष्णिक केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांचा राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते मुंबई येथील राजभवन येथे सन्मान करण्यात आला. कोरोना काळात औष्णिक विद्युत केंद्रात ऑक्सिजन प्लांट अतिशय तातडीने उभारण्यात मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांचा सिंहाचा वाटा होता. ऑक्सिजन प्लांटमुळे हजारो नागरिकांचे कोरोना काळात प्राण वाचले होते. आव्हाड यांनी केलेल्या सेवेबद्दल त्यांचा मुंबईतील राजभवन येथे कोरोना वारियर्स हा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी सन्मान केला. कोरोना काळात संपूर्ण राज्यासह बीड जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला होता. याच काळात औ.वि केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी परळी औष्णिक विद्युत केंद्रात ऑक्सीजन प्लांट तातडीने कार्यान्वित करून कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात प्लांट च्या माध्यमातून उपलब्ध करून दिला होता. याची दखल घेत राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते मुंबई येथील राजभवन येथ...

MB NEWS-केंद्रीयमंत्री ना.नितीन गडकरी यांची घोषणा

इमेज
  चेतन सौंदळेंचा पाठपुरावा: श्री.संत मन्मथ-शिवलिंग पालखी मार्ग नामकरण होणार  केंद्रीयमंत्री ना.नितीन गडकरी यांची घोषणा    वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या संजीवन समाधी मंदीर बांधकाम भूमीपुजन सोहळयानिमित्त शनिवार दि.10 सप्टेंबर रोजी भारत सरकारचे केंद्रीय परीवहन,भुपृष्ठ वाहतुक मंत्री ना.नितीन गडकरी यांनी राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली व त्यांच्या प्रमुख उपस्थित सुरू झालेल्या श्री.संत मन्मथ स्वामी पालखी व दिंडी जाणा-या अहमदपुर-किनगांव-पुस-अंबाजोगाई-केज-नेकनुर-मांजरसुंभा-श्रीसंत मन्मथ स्वामी,कपीलधार मार्गास श्रीसंत मन्मथ-शिवलिंग पालखी मार्ग नामकरणाची घोषणा करून राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या संजीवन समाधी मंदीर बांधकाम व सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्यावतीने सर्वोत्परी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.       कार्तिक पोर्णिमेच्या औचित्यावर बीड जिल्हयातील कपीलधार,मांजरसुंभा येथे श्री.संत मन्मथ स्वामींच्या दर्शनासाठी लाखो भाविक राज्य व परराज्यातून येतात.     ...