पोस्ट्स

MB NEWS-अशी आहे: पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची रूपरेषा

इमेज
  अशी आहे: पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची रूपरेषा *आपला दसरा..आपली परंपरा* *बुधवार 5 ऑक्टोबर 2022*   *सावरगांव घाट (ता. पाटोदा)*   सकाळी 10 वा. पर्यंत सर्वानी भगवान भक्तीगडावरील मैदानात आसनस्थ व्हावे. सकाळी 11.45 ते दुपारी 12 वा.- मा. ताईसाहेबांचे हेलिपॅडवर आगमन दुपारी 12 ते 12.10 वा.  प.पू. राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेला सुरवात दुपारी 12.20 ते 12.30 वा. - मुर्तीची प्राणप्रतिष्ठा दुपारी 12.30 वा.  सर्व मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन दुपारी 12.30 ते 12.40 राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मुर्तीला फुलांचे अर्पण दुपारी 12.45 ते 12.55 वा. - विविध मान्यवरांचे मार्गदर्शन  दुपारी 12.55 वा.  मा. ताईसाहेबांचे मार्गदर्शन  _वरील कार्यक्रमात 20 ते 30 मिनिटाच्यावर बदल होणार नाही, त्यामुळे सर्वांनी वेळेवर सुखरूप यावे._ *कृती समिती, दसरा मेळावा*

MB NEWS-म.सा.प परळी शाखेचा उपक्रम*

इमेज
  रविवारी 'कविता रंगते कोजागिरी 'त हे निमंत्रितांचे कविसंमेलन  म.सा.प परळी शाखेचा उपक्रम परळी वैजनाथ, दि. ०४/ १० / २०२२, (प्रतिनिधी)ः- मराठवाडा साहित्य परिषदेच्या येथील शाखेच्या वतीने कोजागिरीनिमित्त खास परळीकर रसिकांसाठी ' कविता रंगते कोजागिरी'त या निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे आयोजन रविवार दि. ०९ / १० / २०२२ रोजी सायं . ७ : ० ० वा. ' बन्सल क्लासेस माधवबाग ' येथे करण्यात आले आहे.  या कविसंमेलनात ज्यांच्या कवितेने रसिकमनात कायमचे घर केले असे चित्रपट कलावंत ,हास्यसम्राट , विनोदाचे बादशहा *नारायण सुमंत ( पिंपळखुंटे - माढा* )* गेय अभिव्यक्ती व हास्याचे फवारे उडवत रसिक मनावर कायम अधिराज्य करणारे *राजा धर्माधिकारी ( परतवाडा )* , '' गोड गळ्याचा व सक्षम काव्यविष्कार असलेले *सखाराम डाखोरे ( मुंबई )* , स्त्री मनाचा सक्षम हुंकार आशय व अभिव्यक्तीच्या अभिन्नतेसह आविष्कृत करणाऱ्या *प्रा.डॉ. प्रतिभा अहिरे (औरंगाबाद) , उत्कृष्ट निवेदक व आपल्या रांगड्या वाणीने रसिक मनावर अमीट छाप उमटवणारे व कवितेच्या प्रांतातही आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारे * राजेसाहेब कदम ( अ...

MB NEWS-श्री. पार्डीकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रिय अहिंसा दिन साजरा

इमेज
  श्री.पार्डीकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रिय अहिंसा दिन साजरा  सिरसाळा........ येथील श्री. पंडितगुरू पार्डीकर महाविद्यालयात दि. ०३/१०/२०२२ सोमवार रोजी इंग्रजी विभाग व एन एस एस विभागाच्या वतीने महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती *"आंतरराष्ट्रिय अहिंसा दिवस"* म्हणून साजरी करण्यात आली.  या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. पी. कदम, प्रमुख अतिथी म्हणुन प्रा. डॉ. विष्णू चव्हाण (वैद्यनाथ महाविद्यालय परळी) तसेच महाविद्यालयातील इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. अनंत जाधव, एन एस एस कार्यक्रमाधिकारी डॉ के एम नागरगोजे, डॉ जी गट्टी व प्रा विक्रम धनवे ई. मान्यवर उपस्थित होते.  या कार्यक्रमात प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या हस्ते इंग्रजी अभ्यास मंडळाचे' उदघाटन व 'Universal' या भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.  प्रसंगी बोलताना डॉ के एम नागरगोजे यांनी श्री लालबहादुर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. डॉ. विष्णू चव्हाण यांनी महात्मा गांधी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून जगभर आंतरराष्ट्रिय अहिंसा दिवस साजरा कर...

MB NEWS-माजी मंत्री आ.धनंजय मुंडेंनी अभयकुमार ठक्कर यांच्या निवासस्थानी भेट देत केले अभिष्टचिंतन

इमेज
  माजी मंत्री आ.धनंजय मुंडेंनी अभयकुमार ठक्कर यांच्या निवासस्थानी भेट देत केले अभिष्टचिंतन  *परळी/प्रतिनिधी* माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनी आज सोमवार दि.3 ऑक्टोबर रोजी शिवसेनेचे बीड जिल्हा उपप्रमुख अभयकुमार ठक्कर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी दोन्ही नेत्यांत विविध विषयांवर चर्चा झाली. आ.मुंडे यांनी श्री ठक्कर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या. आज सोमवारी सायंकाळी आ.धनंजय मुंडे यांनी शिवसेनेचे नेते अभयकुमार ठक्कर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी आ.धनंजय मुंडे यांचा श्री.ठक्कर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.  यावेळी युवा सेना जिल्हा समन्वयक प्राचार्य अतुल दुबे, युवा सेना विधानसभा प्रमुख मोहन परदेशी, शिवसेना उपशहर प्रमुख किशन बुंदेले, शिवसेना माजी शहर संघटक संजय कुकडे, शिवाजी चौक विभाग प्रमुख संजय सोमाने,  शिवसेना तळ विभाग प्रमुख श्रीनिवास सावजी,  शिवाजीनगर विभाग प्रमुख सुरेश परदेशी,भारतीय विद्यार्थी सेना उप तालुकाप्रमुख मनीष जोशी, शिवसेना लोणारवाडी सर्कल प्रमुख बबन ढेंबरे, जय महाराष्ट्र प्रतिष्ठानच...

MB NEWS-मराठवाडा प्रदेशासाठी स्वतंत्र रेल्वे झोन मंजूर करून विकासाचा अनुशेष भरून काढा : रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांना निवेदन

इमेज
  मराठवाडा प्रदेशासाठी स्वतंत्र रेल्वे झोन मंजूर करून विकासाचा अनुशेष भरून काढा : रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांना निवेदन *औरंगाबाद (प्रतिनिधी)* मराठवाडा हा अत्यंत मागासलेला प्रदेश स्वात़ंत्र्यापूर्वी हैद्राबादस्थित निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता. स्वातंत्र्यानंतर आणि हैद्राबाद-मराठवाडा मुक्ती संग्रामा नंतर भाषावार प्रांतरचना झाली तेव्हा हा प्रदेश महाराष्ट्रात बिनशर्त सामील झाला होता परंतु या प्रदेशाच्या विकासाचा अनुशेष मात्र अद्याप भरून निघाला नाही त्यामुळे मराठवाडा प्रदेशासाठी स्वतंत्र रेल्वे झोन मंजूर करून विकासाचा अनुशेष भरून काढावा,अशा आग्रही मागणीचे निवेदन परळी रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी,सरचिटणीस जी.एस. सौंदळे गुरुजी यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते सचिन सौंदळे यांनी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांना औरंगाबाद येथे त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिले. या निवेदनात पुढे म्हटले आहे की,आपणास कळविण्यात अत्यंत खेद होतो की,स्वातंत्र्यानंतरची ७५ वर्षे इतका प्रदीर्घ कालावधी उलटून गेली तरीही लातूररोड ते लातूर दरम्यानच्या केवळ ३३ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाखेरी...

MB NEWS-दसरा मेळावा:खा.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वात निघणार गोपीनाथगड ते भगवान भक्तीगड रॅली

इमेज
  दसरा मेळावा: खा.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वात निघणार गोपीनाथगड ते भगवान भक्तीगड रॅली   परळी । दि. ०३ । राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जन्मभूमी भगवान भक्तीगड, सावरगाव घाट येथे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी गोपीनाथगड येथून अभूतपूर्व दसरा मेळावा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, बीडच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वात रॅली होणार असून मोठ्या संख्येने मुंडे प्रेमींचा सहभाग रॅलीत असणार आहे. बुधवारी सकाळी सहा वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात होणार असून दरवर्षीप्रमाणे यंदाही गोपीनाथगड, सिरसाळा, दिंदृड, तेलगाव, वडवणी, घाटसावळी, बीड, वंजारवाडी मार्गे नायगाव, तांबवा राजुरी, चुंबळी फाटा, वांजरा फाटा, कुसळंब भगवान भक्तीगड सावरगाव घाट अशी रॅली निघणार आहे. खासदार प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या रॅलीच्या माध्यमातून गोपीनाथगडाच्या भक्तीचे आणि भगवान बाबांच्या शक्तीचे भव्यदिव्य स्वरूप ‘याचि देही याचि डोळा' अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांचा सहभाग रॅलीत असणार आहे. ••••

MB NEWS-अश्विनी वैष्णव यांचा सकारात्मक प्रतिसाद ; विभागाला दिल्या तोडगा काढण्याच्या सूचना

इमेज
 प्र आष्टी-मुंबई रेल्वेसेवेसाठी खा.प्रितमताई मुंडे यांनी घेतली केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट अश्विनी वैष्णव यांचा सकारात्मक प्रतिसाद ; विभागाला दिल्या तोडगा काढण्याच्या सूचना  बीड । दि. ०३ । नगर-बीड-परळी रेल्वे मार्गातील नगर ते आष्टी हा साठ किमीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आष्टी रेल्वेस्थानकावर नगर-आष्टी डेमु रेल्वे सेवेची सुरुवात करण्यात आली आहे. या मार्गावरील रेल्वेसेवेचा विस्तार करून आष्टी ते मुंबई पर्यंत प्रवासी रेल्वे सुरू करण्यात यावी अशी पुनःश्च मागणी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी भेट घेतली.बीड जिल्ह्यासाठी रेल्वेची सेवा मुंबई पर्यंत सुरू होणे जेवढे फायदेशीर आहे तेवढेच रेल्वे विभागासाठी देखील फलदायी ठरणार आहे. बीडकरांच्या हिताचा आणि रेल्वेच्या फायद्याचा सारासार विचार करून आष्टीपासून मुंबई पर्यंत प्रवासी रेल्वेवाहतूक सुरू करण्यात यावी, रेल्वे हा बीड जिल्ह्यातील प्रत्येकासाठी  जिव्हाळ्याचा विषय आहे ...