पोस्ट्स

MB NEWS-परळीच्या महाराष्ट्र बँकेला लागली आग ; सखोल तपासणी

इमेज
  परळीच्या महाराष्ट्र बँकेला लागली आग ; सखोल तपासणी    परळी वैजनाथ, प्रतिनिधी..        येथील मोंढा विभागातील महाराष्ट्र बँकेच्या शाखेला आग लागून धुराचे लोट दिसून येत होते. आज सकाळच्या सुमारास महाराष्ट्र बँकेच्या इमारतीतून धुराचे लोट नागरिकांना दिसून आले त्यामुळे बँक आगीच्या भक्षस्थानी सापडले आहे असे लक्षात आले. नागरिकांनी तात्काळ हि बाब परळीचे अग्निशमन दल व पोलिसांना कळवली दरम्यान आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून बँकेत काय काय जळाले आहे याची सखोल तपासणी सध्या सुरू आहे       परळी येथील स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र आर्य समाज मंदिर जवळ असलेल्या शाखेत शनिवार दि 22 रोजी सकाळी अचानक अचानक भीषण आग लागली.         आगीचे लोट दिसताच स्थानिक नागतिकांनी परळी परळी नगर परिषदेच्या अग्निशमन दलास याची कल्पना दिली असता अग्निशमन दलाने आग आटोकात आणायचे प्रयत्न सुरू केले. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली असून सदरील ठिकाण संभाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असून 1 अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.        प्रथमदर...

MB NEWS-विश्व हिंदू परिषदेच्या वतीने परळी वैद्यनाथ येथे वसुबारस/गोवत्स द्वादशी उत्साहात साजरी

इमेज
  विश्व हिंदू परिषदेच्या वतीने परळी वैद्यनाथ येथे वसुबारस/गोवत्स द्वादशी उत्साहात साजरी   परळी वैजनाथ, प्रतिनिधी... विश्व हिंदू परिषद, परळी-वैद्यनाथ तर्फे आज दि. २१/१०/२०२२ *वसुबारस अथवा गोवत्स द्वादशीचा* कार्यक्रम विविध ठिकाणी पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला. विश्व हिंदू परिषद, परळी-वैद्यनाथ सत्संग प्रमुख श्री रविंद्रजी वेताळ व मातृशक्ती प्रखंड संयोजिका सौ. अपर्णाताई वेताळ यांनी गोमातेला व वासरास साडी चोळीचा आहेर अर्पण केला. वसुबारस कार्यक्रमाचे धार्मिक महत्त्व विश्व हिंदू परिषद सत्संग प्रमुख ह. भ. प. श्री रविंद्रजी वेताळ यांनी विषद केले तर वैद्यानिक महत्त्व प्रसिद्ध फोटोग्राफर व गोप्रेमी श्री सुनीलजी फुलारी यांनी विस्तृतपणे सांगितले. जास्तीत जास्त प्रमाणात गोउत्पाद (दुध, दही, तुप, धूप, गोवरी, सेंद्रिय शेतीतील उत्पादन) वापरून सर्वसामान्य जनतेने गोसेवा व गोसंवर्धनात सहभागी व्हावे असे आवाहन विश्व हिंदू परिषद परळी-वैद्यनाथ शहर मंत्री श्री वैभवजी धोंड यांनी केले. प्रसिद्ध गोपालक श्री. सचिनजी येवतेकर यांनी गोसेवेचे अनुभव व गोमुत्र अर्काचा मानवी आरोग्यावर होणारा चां...

MB NEWS-सरकार आपलं, विश्वास ठेवा* *खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांचा विश्वास

इमेज
  प्रशासनाला सोबत घेवून केज तालुक्यात खासदार शेतकर्‍यांच्या बांधावर...विमा कंपन्यांनी मनमानी करू नये, सरकार आपलं,  विश्वास ठेवा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांचा विश्वास बीड(प्रतिनिधी)-बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार उडवला असताना जिल्ह्याच्या खा. डॉ.प्रितमताई गोपीनाथ मुंडे ह्या मात्र पडत्या पावसात शेतकर्‍यांच्या बांधावर जावून पाहणी करताना दिसतात. एवढेच नाही तर संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना धीर देण्याची मोहिमही त्यांनी हाती घेतली. काल केज तालुक्यात होळ, लाडेगाव, ढाकेफळ परिसरात नुकसानीची पहाणी करताना शेताचे तळे झाल्याचे याचि देहि, याचि डोळा त्यांना दिसले. लोकांच्या डोळ्यातील आश्रू बरंच काही बोलून जात होते. अशा संकटात खासदारांनी मात्र सरकार आपलं आहे, निश्चित मदत करील. जिल्हा प्रशासनाने पंचनाम्याच्या भानगडीत न पडता सरसकट शेतकर्‍यांना मदत करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. दरम्यान विमा कंपन्यांच्या विरोधात खासदारांचा संताप दिसुन आला. बीड जिल्ह्यात मागच्या आठ दिवसापासून परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला. सर्व तालुक्यात प्रचंड पडत असलेल्या पावसाने खरीपाच...

MB NEWS-शेतकऱ्यांना पंचनामे न करता तात्काळ मदत व विमा जाहीर करा - किसान सभा

इमेज
  शेतकऱ्यांना पंचनामे न करता तात्काळ मदत व विमा जाहीर करा - किसान सभा परळी / प्रतिनिधी परळी तालुक्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे कुठलाही भेदभाव न करता कुठलेही निकष न लावता सरसकट परळी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना तात्काळ मदत व विमा लागू करावा अशी मागणी किसान सभेच्यावतीने करण्यात आली आहे. परळी शहर व तालुक्यात मागच्या काही दिवसापासून पावसानं रुद्ररूप धारण केलं असून परळी तालुक्यामध्ये शेतकरी सोयाबीन काढणीसाठी कापूस वेचणीसाठी कामाला लागले असताना गुरुवार दि 20 रोजी अचानक पावसाने खूप मोठ्या प्रमाणात हाहाकार माजविला. ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सोयाबीन एक तर पाण्यात वाहून गेले आहे किंवा सोयाबीन मध्ये पाणी साचले आहे अनेकांचे सोयाबीन काढून ढिग तयार केलेले सुद्धा पावसाच्या पुरामध्ये वाहून गेले आहेत.यातच गाढे पिपळगाव येथील 25 वर्षीय युवकाचा पुराच्या पाण्यात वाहून जात दुर्दैवी मृत्यू झाला. अनेकांचे पशुधन पुराच्या पाण्यात वाहून गेले तर काही वीज पडून मृत्यू झाले. सध्या दिवाळीचा सण तोंडावर असताना शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आर्...

MB NEWS-पंकजाताई मुंडे पोहोचल्या बांधावर ; परळीत शेती नुकसानीची केली पाहणी

इमेज
  पंकजाताई मुंडे पोहोचल्या बांधावर ; परळीत शेती नुकसानीची केली पाहणी _तातडीने पंचनामे करून  नुकसान भरपाईसाठी प्रशासनाला केल्या सूचना_ परळी वैजनाथ ।दिनांक २१। गुरूवारी मध्यरात्री तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज सकाळीच कौठळी, तळेगाव शिवारातील शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात तातडीने पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करावा अशा सूचना त्यांनी महसूल प्रशासनाला दिल्या.    काल रात्री तालुक्यात सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, काही गावात  ढगफुटीसदृश पाऊस झाला. शेतात चहुकडे पाणीच पाणी झाल्याने उभी पिके जमीनदोस्त झाली. पिकासोबत शेतातील मातीही वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. ऐन दिवाळीत झालेल्या या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाला आहे.     पंकजाताई मुंडे यांनी आज तळेगाव, कौठळी शिवारातील शेतात जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना मदतीचा शब्द दिला. यावेळी तहसीलदार शेजूळ उपस्थित हो...

MB NEWS-सलग दुसरा दिवस: आजपण नांदेड-पनवेल रेल्वे लेट धावणार

इमेज
  सलग दुसरा दिवस: आजपण नांदेड-पनवेल रेल्वे लेट धावणार आज शुक्रवार दिनांक 21 ऑक्टोबर ला नांदेड येथून सुटणारी पनवेल एक्स्प्रेस उशिरा सुटणार असुन नांदेड-पनवेल रेल्वे आज 100 मिनिटे लेट होणार आहे. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक 20 ऑक्टोबर ला नांदेड येथून सुटणारी गाडी क्रमांक 17614 नांदेड ते पनवेल एक्स्प्रेस तिची नियमित वेळ सायंकाळी 18.20 वाजता सुटण्या ऐवजी गुरुवारी 4 तास 10 मिनिटे उशिरा म्हणजेच रात्री 22.30 वाजता सुटली सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार दि 21 रोजी देखील ही एक्सप्रेस 100 मिनिटे उशिरा नांदेड येथून सुटणार असून या गाडीची नियमित वेळ सायंकाळी 6:20 असून ती आज सायंकाळी 8 वाजता सुटणार आहे. प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

MB NEWS-77 वर्षीय शेतकऱ्याने सांगितले आपल्या आयुष्यात एवढा पाऊस बघितला नाही

इमेज
  विदारक परिस्थिती: गेल्यावर्षीचं 100 अन् यंदाचे कट्टे 150 कट्टे सोयाबीन पाण्यात ;कोंबड्या मेल्या:अख्या घरात पाणीच पाणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी ....      परतीच्या पावसाने हाकार मांडला असून शेती शेतीतील पिके रानातले घर पाळलेले पशु या सर्वच घटकांवर या पावसाने वरवंटा फिरविण्याची चित्र निर्माण झाले आहे काल परळी तालुक्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घालत उरलंसुरलं सर्व खतम करून टाकला आहे अशा परिस्थितीत प्रत्येक शेतकरी आपापली व्यथा मांडताना दिसत आहे यातच बेलंबा येथील वय वर्ष 77 असलेल्या एका शेतकऱ्याने सांगितले की आपल्या आयुष्यात आपण एवढा पाऊस पाहिलेला नाही रानातील घर जमिनीपासून तीन फूट उंचावर बांधलेले आहे या घरात असलेले गेल्या वर्षीचे व यावर्षीचे सगळे सोयाबीन पाण्यात गेले आखाड्यावर असलेल्या पाळलेल्या कोंबड्या मेल्या सगळ्या घरात पाणीच पाणी झालं अशा परिस्थितीत नेमकं करावं काय असा खिन्न प्रश्न या शेतकऱ्याने उपस्थित केला आहे.         प्रभू धर्म गिरी रा.बेलंबा यांचे घरात कालच्या पावसाचे पाणी घुसल्याने यावर्षी झालेले 150 कट्टे सोयाबीन व ...