MB NEWS-सलग दुसरा दिवस: आजपण नांदेड-पनवेल रेल्वे लेट धावणार

 सलग दुसरा दिवस: आजपण नांदेड-पनवेल रेल्वे लेट धावणार






आज शुक्रवार दिनांक 21 ऑक्टोबर ला नांदेड येथून सुटणारी पनवेल एक्स्प्रेस उशिरा सुटणार असुन नांदेड-पनवेल रेल्वे आज 100 मिनिटे लेट होणार आहे. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

गुरुवार दिनांक 20 ऑक्टोबर ला नांदेड येथून सुटणारी गाडी क्रमांक 17614 नांदेड ते पनवेल एक्स्प्रेस तिची नियमित वेळ सायंकाळी 18.20 वाजता सुटण्या ऐवजी गुरुवारी 4 तास 10 मिनिटे उशिरा म्हणजेच रात्री 22.30 वाजता सुटली सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार दि 21 रोजी देखील ही एक्सप्रेस 100 मिनिटे उशिरा नांदेड येथून सुटणार असून या गाडीची नियमित वेळ सायंकाळी 6:20 असून ती आज सायंकाळी 8 वाजता सुटणार आहे. प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार