पोस्ट्स

MB NEWS-कार्तिकीवारी: परळी आगारातून मागणीनुसार विशेष यात्रा बस

इमेज
  कार्तिकीवारी: परळी आगारातून मागणीनुसार विशेष यात्रा बस कार्तिक एकादशी यात्रे निमित्त परळी आगारामार्फत नियमितपणे 3 विशेष बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. कार्तिक एकादशी उत्सव दरम्यान श्री विठ्ठला च्या दर्शना करिता मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरच्या दिशेने प्रवास करतात. प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी परळी आगाराने परळी येथून पंढरपूर साठी विशेष बस गाड्या सोडण्यात येणार आहेत.       हसकाळ,दुपार व संध्याकाळ या समयी परळी आगारामार्फत या विशेष बस सोडण्यात येणार असून ग्रामीण भागातून देखील प्रवाशी संख्या जास्त असल्यास थेट पंढरपूर दर्शन घडवून त्यांना परत गावी सोडण्यासाठी देखील मागणीनुसार एस.टी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●● कार्तिकीवारी निमित्ताने परळी आगारामार्फत दररोज 3 विशेष यात्रा बस सेवा सुरू करण्यात येणार असून ग्रामीण भागात देखील प्रवाशी संख्या जास्त असल्यास मागणीनुसार गावात एस.टी बस देऊन पंढरपूर दर्शन घडवून त्यांना परत गावी सोडण्यात येणार आहे.ग्रामीण भागातील भाविकांची याबाबत परळी आगाराशी संपर्क करावा ★ प्रवीण भोंडवे ★ आगार प्रमुख परळी वै

MB NEWS-कार्तिकीवारी:परळी मार्गे पंढरीला दोन विशेष रेल्वे पण रिझर्व्हेशन आवश्यक

इमेज
  कार्तिकीवारी:परळी मार्गे पंढरीला दोन विशेष रेल्वे पण रिझर्व्हेशन आवश्यक              कार्तिक एकादशी यात्रे निमित्त आदिलाबाद आणि नांदेड येथून पंढरपूर करिता पूर्णपणे आरक्षित विशेष गाड्या दक्षिण मध्य रेल्वेने सुरू केली आहे. कार्तिक एकादशी उत्सव दरम्यान श्री विठ्ठला च्या दर्शना करिता मराठवाड्यातून मोठ्या संख्येने यात्रेकरू प्रवास करतात. प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रेल्वेने आदिलाबाद आणि नांदेड येथून पंढरपूर साठी विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहे. गाडी क्र 07502 ही आदिलाबाद ते पंढरपूर गुरुवार दि 3 नोव्हेंबर रोजी धावणार आहे.आदिलाबाद येथीन ही गाडी दुपारी 2 ला सुटणार असून परळी येथे ही विशेष गाडीची वेळ सायंकाळी 10:20 असणार आहे.दुसरी विशेष रेल्वे गाडी क्र 07503 नांदेड ते पंढरपूर ही सोमवार दि 7 रोजी धावणार असून या गाडीची परळी येथे येण्याची वेळ सायंकाळी 10:50 असणार आहे.परतीचा प्रवास पंढरपूर-आदिलाबाद ही 4 नोव्हेंबर तर पंढरपूर-नांदेड ही 8 नोव्हेंबर रोजी करणार आहे. या गाडीस 10 सकैंड सीटिंग ( 2s), 08 स्लीपर क्लास, 01 द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, 02 एस. एल. आर...

MB NEWS-थंडीचा जोर वाढला:तुरीच्या फुलोऱ्याला आला बहर

इमेज
  थंडीचा जोर वाढला:तुरीच्या फुलोऱ्याला आला बहर ! खरीपात शेतकऱ्यांना बसला फटका पण रब्बी हंगामात अच्छे दिन येण्याची चिन्हं प रळी वैजनाथ, प्रतिनिधी.....           आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी थंडीने चांगलाच जोर पकडला आहे. त्यामुळे सध्या फुलोऱ्यात असलेली तूर चांगलीच बहरणार आहे.   शेतकरी चार वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाची झळ सोसत आहेत. पण, यंदा रब्बी पिकांना निसर्गाने साथ दिली आहे. चांगला पाऊस झाल्याने तुरीची वाढ झपाट्याने होत आहे. सध्या तुरीचे पीक फुलोऱ्यात आहे.गेल्या काही दिवसांत ढगाळ वातावरणाने तुरीवर किडीचा प्रादुर्भाव दिसून येत होता. पण, शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करून कीडनाशक फवारणी करून किडीचा बंदोबस्त केला आहे.सध्या थंडीने जोर धरला असून त्यामुळे तुरीची वाढ चांगली होऊन फुलधारणा चांगल्या प्रकारे होत आहे.. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे खरिपाचे पीक गेले पण रब्बी हंगामांत शेतकऱ्यांना अच्छे दिन येण्याची चिन्हं आहेत .

MB NEWS- 🏵️ Photo of the day: समरांगणीचा शिवसुर्य उगवला....!

इमेज
 🏵️ Photo of the day:  समरांगणीचा शिवसुर्य उगवला....!         'शिवरायाचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप" असे वर्णन असलेल्या या शिवसुर्याचे क्षणाक्षणाला स्मरण करणे हे सदैव प्रेरणादायीच. शिवरायांच्या तेजाला साक्षात सुर्याच्या तेजाचीच उपमा समर्पक ठरते. छायाचित्र: सुनील फुलारी, परळी वैजनाथ.                    शिवरायांच्या या ओजस्वी, तेजस्वी रुपाचे अनेकांनी अनेक प्रकारे वर्णन केलेलेच आहे.एका कविने या शिवसुर्याचे यथार्थ वर्णन आपल्या काव्य प्रतिभेतून केलेले आहे." सह्याद्रीच्या डोंगरावर, समरांगणीचा शिवसुर्य उगवला,अन्यायाच्या काळोखाला भेदित, तो जाणता राजा जाहला " या काव्यपंक्ती यथार्थ ठरवणारे छायाचित्र टिपले आहे परळीतील हरहुन्नरी प्रेस फोटोग्राफर सुनील फुलारी यांनी.          प्रेस फोटोग्राफर सुनील फुलारी हे नेहमीच अतिशय सृजनशील छायाचित्रण करत असतात. आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून एक गहण कलाकृती छायाचित्राच्या रूपातून देण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. मग परळी शहरातील विविध उपक्रम अस...

MB NEWS-न्यू हायस्कुल १० वी सन २००० बॅच चे स्नेहमिलन उत्साहात

इमेज
  हरवलेले हे दिवस येतील पुन्हा, जगलो आज आणि उद्या हाच दिवस जुना...अशी अनुभुती  न्यू हायस्कुल १० वी सन २००० बॅच चे स्नेहमिलन उत्साहात            हरवलेले हे दिवस येतील पुन्हा, जगलो आज आणि उद्या हाच दिवस जुना,    नशिबानेच एकदा पुन्हा कुठेतरी भेटू ,आठवणीला एकदा एकत्र मिळुन वेचु.         पक्तींची आठवण करून देणारे सोनेरी क्षण रविवार ३० ऑक्टोबर २०२२ रोजी येथे थर्मल कॉलनी मधील न्यू हायस्कुल शाळेमध्ये माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी अनुभवला; १९९९ ते २००० सालच्या बॅचच्या मुला-मुलींनी एकत्र येत रविवारी शाळेत स्नेहमिलन सोहळयाचे आयोजन केले होते. गावातील विद्यार्थी तसेच अनेक विद्यार्थी बाहेर गावाकडुन आपल्या शाळेसाठी, गुरूजनांसाठी मित्र-मैत्रिणीसाठी एकत्र आलेले होते. कार्यक्रमाची सुरूवात दिप प्रज्वलन व प्रतिमा पुजनाने केली. त्यानंतर शाळेची घंटा वाजवुन सर्व विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत म्हटले. त्यानंतर प्रार्थना घेतली व सर्व शिक्षकांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे पुष्पगुच्छ, शॉल, श्रीफळ व स्...

MB NEWS-परळीच्या परचुंडीनंतर आता भूगर्भातील गुढ आवाजाने बीड,पाटोदा हादरले !

इमेज
  परळीच्या परचुंडीनंतर आता भूगर्भातील गुढ आवाजाने बीड,पाटोदा हादरले ! बीड — काही दिवसांपूर्वीच परळी तालुक्यातील परचुंडी या गावात भूगर्भातून येणाऱ्या गुढ आवाजाने नागरिक भयभीत झाली असून याचा अधिक तपास व्हायच्या अगोदरच बीड शहर व परिसर त्याचप्रमाणे पाटोद्यातील काही भाग अशाच गुढ आवाजाने हादरल्याचे नागरिक सांगत आहेत. मोठा आवाज भूगर्भातून येताच काही क्षण जमीन हादरल्याचा भास निर्माण झाला. ही घटना आज दुपारी 12: 43 च्या दरम्यान घडली. हा आवाज जवळपास पूर्ण बीड तालुक्यात जाणवला. त्याचप्रमाणे पाटोदा येथेही अशाच प्रकारचा जमिनीतून गुढ आवाज आल्याचे नागरिक सांगत आहेत        आज दुपारी 12: 43 च्या दरम्यान भूगर्भातून प्रचंड मोठा आवाज झाल्याने जमीन हादरली.सोबतच कच्च्या घरातील रॅक वरील भांडी देखील पडली असल्याचं सांगितलं जाऊ लागला आहे. हा आवाज इतका मोठा होता की जवळपास पाच ते सात मिनिटं आकाशातून विमान उडताना जसा आवाज होतो त्याच पद्धतीने आवाज येत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. नेमका हा आवाज कुठून व कसा आला याची अधिकृत माहिती प्रशासनाने अद्याप दिली ...

MB NEWS-जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची बीड येथे विटंबना

इमेज
 जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची बीड येथे विटंबना पुतळा विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा : वीरशैव समा परळीच्या वतीने उप जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन परळी वैजनाथ /प्रतिनिधी  बीड येथे जगद्ज्योती थोर समाज सुधारक महात्मा बसवेश्वर महाराजांच्या  पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली. या घटनेच्या निषेधार्थ आज मंगळवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी वीरशैव समाज व बस्वप्रेमी परळीच्या वतीने  उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांना निवेदन देण्यात आले. जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी परळी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड शहरात सोमवार दि. ३१ ऑक्टोंबर २०२२ रोजी  महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरातील ग्रील व कोनशिलेची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड करुन नासधूस केली आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील वीरशैव समाजात संतापाची लाट निर्माण झाली आहे. यापुर्वीही येथे असे प्रकार घडलेले आहेत यामुळे समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रकार होत आहेत. थोर समाजसुधारक जगद्ज्य...