MB NEWS-काकडा आरती हाच वारकरी भजनाचा पाया आहे-ह.भ.प. ॲड.दत्ता महाराज आंधळे

काकडा आरती हाच वारकरी भजनाचा पाया आहे-ह.भ.प. ॲड.दत्ता महाराज आंधळे पुणे (प्रतिनिधी)काकड आरती म्हणजे अविट गोडी देणारी असून आनंद सोहळा आहे.काकडाआरती म्हणजे वारकरी भजनाचा पाया आहे असे प्रतिपादन संतवाड्.मयाचे संशोधक ह.भ.प.ॲड दत्तात्रय महाराज आंधळे यांनी केले. संत जगमित्रनागा महाराजांची जन्मभूमी पिरंगुट येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन काकड समाप्ती निमित्ताने करण्यात आले होते.या वार्षीक सप्ताहातील पाचवे दिवशीचे कीर्तन ह.भ.प.ॲड.दत्ता महाराज आंधळे यांनी केले.संत जगमित्रनागा महाराजांच्या "हरी जागरासी जावे/माझ्या विठोबाशी पहावे //१//देवॠषी सर्व येती/नभि विमाने दाटती//२//काकड आरती दृष्टी पडे/उठाउठी पाप झडे//३//ऐसा आनंद सोहळा/जगमित्रनागा नागा पाहे डोळा//४//" या अभंगावर अप्रतिम चिंतन करून भाविकांना मंत्रमुग्ध केले.संतजगमित्र चरित्र लिखाणाची उपलब्धी म्हणजे नंदागौळ येथील विठोबाची टोंगीचे झालेले भव्यदिव्य मंदिर,पावदूका मंदिर, तसेच पिरंगुट येथील प्रशस्त शिलालेख ,दगडी शिल्प व भव्य उंच पुरा स्मृती स्तंभ होय.असे आंधळे महाराज म्हणाले. Click...