MB NEWS-परळी तालुका पेन्शनर्स असो.व स्टेट बँक ऑफ इंडिया च्या वतीने शनिवारी ‘पेन्शनर्स डे’ चे आयोजन

परळी तालुका पेन्शनर्स असो.व स्टेट बँक ऑफ इंडिया च्या वतीने शनिवारी ‘पेन्शनर्स डे’ चे आयोजन परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः- परळी तालुका पेन्शनर्स असोसिएशन आणि स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गांधी मार्केट परळीच्या वतीने शनिवार, दि.17 डिसेंबर 2022 रोजी ‘पेन्शनर्स डे’ चे आयोजन करण्यात आले. तरी सर्व सभासद, पेन्शनर्स बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन परळी तालुका पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष रंगनाथ मुंडे यांनी केले आहे. भारतीय स्टेट बँक गांधी मार्केट शाखेचे प्रबंधक श्री गंगाधर विठ्ठलराव नरावाड साहेब हे बँके मार्फत पेन्शनर्स व जेष्ठांसाठीच्या योजनांबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच पेन्शनर्स बांधवांना येणार्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न, मार्गदर्शन करणार आहेत. दिनांक 17 डिसेंबर 2022 रोजी सकाळी ठिक 10 वाजता परळी येथील आर्य समाज मंदिर सभागृह, रोडे चौक, उपजिल्हा रूग्णालयाजवळ परळी वै. येथे पेन्शनर्स डे चा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त वार्षिक सर्वसाधारण सभेचेही आयोजन केले आहे. तरी सर्व पेन्शनर्स सभासद आणि सभासद होऊ इच्छिणार्यांनी आणि जेष्ठ नागरिकांनी ही आवर्जुन ...