MB NEWS-परळी मतदारसंघात पंकजाताई मुंडेंचा करिश्मा ;साठ टक्के ग्रामपंचायतीवर भाजपची सरशी

परळी मतदारसंघात पंकजाताई मुंडेंचा करिश्मा ;साठ टक्के ग्रामपंचायतीवर भाजपची सरशी सिरसाळा, नागापूर, घाटनांदुर, बर्दापूरसह मोठया ग्रा.प. वर वर्चस्व ;प्रतिष्ठेची कौठळीही घेतली ताब्यात यशःश्री निवासस्थानी विजयी उमेदवारांचा गुलाल उधळून जल्लोष परळी वैजनाथ।दिनांक २०। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा करिश्मा सोसायट्यांच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा ग्रामपंचायत निवडणुकीत पहावयास मिळाला. मतदारसंघातील सिरसाळा, नागापूर, घाटनांदुर, बर्दापूर सह सुमारे ६० टक्के ग्रामपंचायतीवर पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलची सरशी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेच्या केलेली कौठळीची ग्रामपंचायतही पंकजाताईंच्या ताब्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. परळी तालुक्यातील ७६ आणि मतदारसंघातील अंबाजोगाई तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान झाले होते. परळी तालुक्यातील लिंबुटा, मांडेखेल, माळहिवरा/ गोपाळपूर आणि तळेगाव या ग्रा.पं. यापूर्वीच बिनविरोध आल्या आहेत. आज झालेल्या मतमोजणीनंतर लागेलेले निकाल लक्षात घेता पंकजाताई मुं...