MB NEWS-"त्या" शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

सहकारी शिक्षकाने शिवीगाळ करून मारहाण केली: आपमान सहन न झाल्याने केली शाळेतच आत्महत्या "त्या" शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी एकावर गुन्हा दाखल सोनपेठ, प्रतिनिधी.... गंगाखेड ते परभणी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रुमणा पाटीवर शिवीगाळ करून मारहाण केल्याने अपमानित झालेले शिक्षक विठ्ठलराव अनंतराव रत्नपारखी यांनी धारासुर तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सकाळी दहा वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत सोनपेठ पोलीस ठाण्यात दिनांक 26 डिसेंबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी धारासुर तांडा येथील जिल्हा परिषद शिक्षक राठोड यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. धारासुर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मयत रत्नपारखी यांना सोमवारी सकाळी आरोपी शिक्षक राठोड यांनी फोन करून धारासुर शाळेवर येण्यास सांगितले. तेव्हा मयत शिक्षक रत्नपारखी यांनी मी पंचायत समितीत नोकरीवर आहे शाळेत येऊ शकत नाही असे आ...