MB NEWS:अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पुन्हा अडकला 'लग्नाच्या बेडीत'!

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पुन्हा अडकला 'लग्नाच्या बेडीत'! पाकिस्तानमध्ये आश्रय घेतलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने कराचीमधील एका पाकिस्तानी महिलेशी लग्न केले आहे. यासंदर्भातील माहिती दाऊद इब्राहिमच्या भाच्याने दिली आहे. सप्टेंबर 2022 मध्ये राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) दिलेल्या माहितीत डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिचा मुलगा अली शाह याने दिली आहे. हसीना पारकरच्या मुलाची ‘एनआयए’ला माहिती दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिचा मुलगा अली शाह याने ‘एनआयए’ दिलेल्या माहितीत सांगितले आहे की, दाऊद इब्राहिम याने दुसरे लग्न केले आहे. त्याने अद्याप पहिली पत्नी मेहजाबीन शेख हिला घटस्फोट दिलेला नाही. एनआयएने धडक कारवाई करत दाऊद इब्राहिमच्या दहशतवादी नेटवर्कशी संबंधित लोकांना अटक केली होती. या प्रकरणी तपास यंत्रणेने न्यायालयात आरोपपत्रही सादर केले होते. अली शाहने ‘एनआयए’ला सांगितले आहे की, दाऊद इब्राहिमने अद्याप त्याची पहिली पत्नी मेहजाबीन शेखला घटस्फोट दिलेला नाही. दाऊदचे दुसरे लग्न म्हणजे मेहजाबीनवरून ...