MB NEWS:तुका कर्वे आणि हरिराम फड यांच्या छायाचित्र आणि शिल्प प्रदर्शनास प्रारंभ

परळी तालुक्यातील भूमिपुत्र छायाचित्रकारांचे नेहरू सेंटर आर्ट गॅलरी येथे प्रदर्शन तुका कर्वे आणि हरिराम फड यांच्या छायाचित्र आणि शिल्प प्रदर्शनास प्रारंभ परळी तालुक्यातील भूमिपुत्र साळुंकवाडी आणि दौंडवाडी येथील छायाचित्रकार तुका कर्वे आणि हरिराम फड यांच्या छायाचित्र आणि शिल्प प्रदर्शनाचे उद्घाटन *पदमश्री सुधारक ओलवे* - (भारतीय छायाचित्र पत्रकार,) *प्रोफेसर गणेश तरतरे* - (सर जे. जे. स्कुल ऑफ आर्ट - मुंबई,) आणि *अलका सामंत* - सॅफरॉन आर्ट गॅलरी, आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वा. नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, वरळी, मुंबई. येथे होत आहे. अत्यंत आशय पूर्ण छायाचित्रे आणि कल्पकतेने घडवलेल्या शिल्पकृती पाहण्याचा अनोखा संयोग या प्रदर्शनामुळे लाभणार आहे. ३१ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान हे प्रदर्शन पाहण्यास खुले आहे.