MB NEWS:अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पवार यांचे निधन

अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पवार यांचे निधन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पवार (वय ८२) यांचे मंगळवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पवार (वय ८२) यांचे मंगळवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मराठा समाजासाठी आयुष्य वाहणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. पवार आज मंडणगडवरून कारने मुंबईकडे निघाले असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी ११ वाजता दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मराठा समाजाप्रति समर्पित आणि कायम अग्रेसर असणारे नेते होते. मराठा महासंघाच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता. मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आणि मराठा आरक्षणासाठी सातत्याने झडपड करणारे शशिकांत पवार यांच्या निधनाने समाजाची मोठी हानी झाली आहे. कोकणातून कारने परत येत असताना...