MB NEWS:नाथ शिक्षण संस्था कार्यालयात बीड येथील संपादक मंडळाचा सत्कार

नाथ शिक्षण संस्था कार्यालयात बीड येथील संपादक मंडळाचा सत्कार परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शहरातील नाथ शिक्षण संस्थेच्या कार्यालयास बीड येथील संपादक मंडळ यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शैक्षणिक विषया संदर्भात चर्चा केली. दैनिक बीड रंणझुजारचे संपादक राजेंद्र आगवान, साय. दैनिक अभिमानचे संपादक राजेंद्र होळकर, दैनिक बीड संकेतचे संपादक नरेंद्र कांकरिया, दैनिक चंपावती पत्रचे कार्यकारी संपादक सुभाष चौरे यांनी मंगळवार दि.१४ फेब्रुवारी रोजी नाथ शिक्षण संस्थेच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे यांनी स्वागत करून शाल, श्रीफळ,पुष्पगुछ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. दरम्यान शैक्षणिक विषया व विविध प्रश्नवर चर्चा करण्यात आली. तसेच नवीन शैक्षणिक धोरण व येणाऱ्या काळतील शैक्षणिक बद्दलावर तसेच इतर अनेक प्रश्नावर चर्चा करण्यात आली. यावेळी नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडेसह आघाव सर, शेख सर, फड सर, दैनिक सोमेश्वर साथीचे संपाद...