MB NEWS:दुःखद वार्ता :शंकरआप्पा चौधरी यांचे निधन; आज सायंकाळी 6 वाजता होणार अंत्यविधी

दुःखद वार्ता :शंकरआप्पा चौधरी यांचे निधन; आज सायंकाळी 6 वाजता होणार अंत्यविधी परळी वैजनाथ /प्रतिनिधी वीरशैव लिंगायत समाजातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व शंकरआप्पा चौधरी यांचे आज मंगळवार दिनांक 18 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ते 87 वर्षे वयाचे होते. परळी येथील कंत्राटदार अनिल उर्फ बाळू चौधरी, छत्रपती संभाजीनगर येथील दैनिक महाराष्ट्र टाइम्स आवृत्तीचे उपसंपादक आशिष चौधरी, परळी न्यायालयाचे लिपिक अविनाश चौधरी यांचे ते वडील होत. परळी वैजनाथ येथील स्वामी विवेकानंद नगर भागातील रहिवासी तथा वीरशैव लिंगायत समाजातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व शंकर आप्पा चौधरी यांचे आज मंगळवारी दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते 87 वर्ष वयाचे होते. शंकराप्पा चौधरी हे अत्यंत मनमिळावू व सुस्वाभावी असल्याने ते सर्व परिचित होते. वीरशैव लिंगायत समाजाच्या विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमात ते नेहमी सहभागी होत असत. शंकराप्पा चौधरी यांच्या पश्चात पत्नी तसेच परळीतील कंत्राटदार अनिल उर्फ बाळूअण्णा चौधरी, छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र टाइम्स आवृत्तीचे उपसंपादक ...