MB NEWS:भगवान श्री नृसिंह जन्मोत्सव परळीत उत्साहात साजरा

भगवान श्री नृसिंह जन्मोत्सव परळीत उत्साहात साजरा आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाईने मंदिर परिसर सजले परळी वैजनाथ/संतोष जुजगर येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैजनाथ मंदिरातील पूर्व बाजूस प्राचीन भगवान श्री नरसिंह मंदिरात श्री नरसिंह जन्मोत्सव गुरुवार दिनांक 4 हे रोजी पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. श्री नरसिंह मंदिरावर आकर्षक फुलाची सजावट व विद्युत रोषणाईने मंदिर परिसर सजले आहे. प्रारंभी श्री लक्ष्मी नरसिंहदेव जन्मोत्सवानिमित्त पवमान पंचसूक्त,पुरुष सुक्त, श्रीसुक्त या मंत्राने अभिषेक करण्यात आला. डाळ व आंब्याचे पन्हे व नैवेद्य देवास दाखवून मंगलारती करण्यात आली. तसेच बटू पूजन, सुवासिनी पूजन करण्यात आले. यावेळी भाविक भक्तांची उपस्थित होती. -------------------------------------------- Advt ....... Advertise मागोवा बातम्यांचा.... ● *LIVE: गीता परिवार आयोजित संस्कार शिबीर परळी वैजनाथ.* #mbnews #subscribe #share #like #comments ● *वै.श्री.ह.भ.प.गु. उत्तम महाराज उखळीकर यांचे ६ मे रोजी द्वितीय पुण्यस्मरण ; किर्तन,प्रवचनाचे आयोजन*