MB NEWS:मोहन गोपाळ गायकवड यांना कामगार भूषण पुरस्कार जाहीर
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर
मोहन गोपाळ गायकवड यांना कामगार भूषण पुरस्कार जाहीर
परळी (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधत कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सन २०२१-२२ च्या गुणवंत कामगार पुरस्कारांची घोषणा केली आहे.
यात कामगार भूषण पुरस्कारासाठी टाटा मोटर्स लिमिटेड, पिंपरी पुणे येथील कर्मचारी मोहन गोपाळ गायकवाड यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.
तसेच गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारासाठी ५१ कामगारांची निवड करण्यात आली आहे.
रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड, पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय कामगार सन्मान सोहळ्याप्रसंगी या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, आमदार अश्विनी जगताप, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता वेद-सिंगल, कामगार आयुक्त सतिश देशमुख, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव विवेक कुंभार, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे, पुणे विभागाचे अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, कोकण विभागाचे अपर कामगार आयुक्त शिरीन लोखंडे, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे संचालक एम.आर.पाटील, बाष्पके संचालनालयाचे संचालक डी. पी. अंतापुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
नोकरी करत असतानाच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी मंडळातर्फे १९७९ पासून गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार देऊन गौरविले जात आहे.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडे नोंदित असलेल्या आणि आस्थापनेत कमीत कमी ५ वर्षे सेवा झालेल्या ५१ कामगारांना दरवर्षी सदर पुरस्कार देऊन गौरविले जाते. रु.२५ हजार, मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि पदक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तर गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार मिळाल्यानंतर पुढील किमान १० वर्षे विविध क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या एका कामगाराची दरवर्षी कामगार भूषण पुरस्कारासाठी निवड केली जाते. रु.५० हजार, मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि पदक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
गुणवंत पुरस्कारांची घोषणा कामगार दिनी करण्याचे निर्देश कामगार मंत्र्यांनी प्रशासनास दिले होते. त्यानुषंगाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन इतर आवश्यक प्रक्रिया तातडीने पार पाडत सदर पुरस्कार्थींची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या पुरस्काराचे वितरण मुंबई येथे लवकरच आयोजित करण्यात येणार आहे.
अर्धवेळ कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ -
तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळात कार्यरत अर्धवेळ कर्मचाऱ्यांच्या मानधनात एक हजार रुपयांची वाढ करण्याचे कामगार मंत्र्यांनी जाहीर केले. मंडळाच्या शिवण वर्ग, शिशुमंदिर, ग्रंथालय आदी उपक्रमांत कार्यरत सुमारे ३९५ अर्धवेळ कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
---‐-------------------------------------------
गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार
अंतिम निवड यादी
१. ललितादास भवानीदास देशपांडे, हिंगोली.
२. बजरंग तवनाप्पा साळुंखे, छत्रपती संभाजीनगर.
३. संगप्पा बसगोंडा करोले, पलुस.
४. राजेंद्र अर्जुन पवार, मुंबई.
५. विजयकुमार रामराव पांचाळ, पैठण.
६. प्रशांत जनार्दन भगत, वाशिम.
७. आनंदा रघुनाथ पाटील, सातारा.
८. अभय शंकर घरत, अलिबाग.
९. केशव रामचंद्र मराठे, अहमदनगर.
१०. निर्मला श्रीनिवास देऊसकर, मुंबई.
११. भारत दशरथ शिंदे , चिकलठाणा.
१२. रमेश काकासाहेब शिंदे, चिकलठाणा.
१३. प्रकाश मोतीराम हेडाऊ, भुसावळ.
१४. श्रीराम नारायण कुलकर्णी, वाळुज.
१५. संजय राजाराम गाढवे, शिरवळ खंडाळा.
१६. नारायण मंगु धनगर , शिरोली.
१७. महादेव शिवाजी खोत, पलुस.
१८. माधुरी निलेश कावरे, अकोला.
१९. मधुकर मोतीराम सुरवाडे , नागपूर.
२०. सतिशकुमार किसन कोरडे, वाळुज.
२१. दिगंबर माधवराव शिंदे , वाळुज.
२२. नवनाथ सुर्यभान बोडखे, छ.
संभाजीनगर.
२३. संजय लक्ष्मण गुरव, कोल्हापूर.
२४. राजेंद्र शेनफडू कोळी, जळगांव.
२५. प्रियदर्शनी एकनाथ भोसले, अमळनेर
२६. विश्वनाथ कृष्णा, कणकवली.
२७. सदाशिव लक्ष्मण एकसंबे , बालेवाडी.
२८. प्रेमानंद महादेवराव गडपायले, अमरावती.
२९. श्रीकांत बाबुराव कदम, पिंपरी.
३०. प्रविण गुलाबराव पाटील, धुळे.
३१. अमोल रमेश पवार, कांदिवली.
३२. मोहनदास जानरावजी चोरे, नागपूर.
३३. संदिप लक्ष्मीकांत पोलकम, पिंपरी.
३४. संदिप गजानन पिसाळ, अलिबाग.
३५. विलास राजाराम वडघुले, नासिक.
३६. परेश भुपेंद्र पारेख, पुणे.
३७. कैलास रमेश भोळे , जामनेर.
३८. शेख इरफान रशीद , नासिक.
३९. प्रविण निवृत्ती वाघमारे, पिंपरी.
४०. अनिल निवृत्ती जाधव , नासिक.
४१. राजेंद्र सुभाष माने, शिराळा.
४२. हरीभाऊ बाळाजी तांबे, सिन्नर-शिर्डी.
४३. मनोहर मोरेश्वर ब्रीद, कांदिवली.
४४. उमेश वामन जाधव, वाशी नवी मुंबई.
४५. प्रसन्न मुरलीधर पारकर, चेंबूर, मुंबई.
४६. दिगंबर साहेबराव भदाणे, धुळे.
४७. शंकर दौलतराव मांढरे , वाई.
४८. प्रकाश हरिभाऊ कवडे, शिवाजीनगर, पुणे.
४९. गणेश अशोकराव सुळे, अचलपुर.
५०. प्रफुल्ल सोमनाथ आवारे, भुसावळ.
५१. संतराम यशवंत जाधव, कोल्हापूर.
--------------------------------------------
Advt.......
Advertise
मागोवा बातम्यांचा....
● *LIVE: गीता परिवार आयोजित संस्कार शिबीर परळी वैजनाथ.* #mbnews #subscribe #share #like #comments
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा