MB NEWS:वैद्यनाथ कॉलेजमध्ये महाराष्ट्र दिनानिमत्त प्राचार्य जे. व्हि. जगतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

 वैद्यनाथ कॉलेजमध्ये महाराष्ट्र दिनानिमत्त प्राचार्य जे. व्हि. जगतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण



 परळी, प्रतिनिधी.....  महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1मे रोजी 1960 रोजी करण्यात आली. त्याकरिता महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्यासाठी विविध भागात चळवळी घडून आल्या. या चळवळीमध्ये अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिले त्यातूनच महाराष्ट्र राज्य निर्माण झाले, त्याचबरोबर शेतकरी, कष्टकरी कामगार वर्गानी या चळवळीत सहभाग घेतल्यामुळे हा दिवस कामगार दिन साजरा म्हणून देखील केला जातो. तेव्हापासून या दिवसाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. म्हणूनच महाराष्ट्रात विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयात हा दिवस साजरा केला जातो.  जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रीय ध्वजारोहण महाविद्यालयाचे प्राचार्य,डॉ. जे व्हि जगतकर यांच्या शुभ हस्ते करण्यात करण्यात आले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्त्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!