पोस्ट्स

MB NEWS:श्री.शनैश्वर जन्मोत्सव सोहळ्या निमित्त भव्य शोभायात्रा संपन्न

इमेज
  श्री.शनैश्वर जन्मोत्सव सोहळ्या निमित्त भव्य शोभायात्रा संपन्न रविवारी डॉ. फत्तेपुरकर यांचे पक्षघात जनजागृती व मोफत आरोग्य शिबीरासह रक्तदान शिबीर परळी वैजनाथ दि.१३ (प्रतिनिधी)          भजनाच्या तालावर पावली खेळत चालणाऱ्या, एकाच रंगाच्या आकर्षक साड्या घालून सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या तसेच मंगल कलश मस्तकी धारण केलेल्या, हाती भगवा निशाण फडकावत मुखी गुरुराज माऊलीचा गजर करणाऱ्या महिला भगिनी आणि पांढऱ्या शुभ्र पोशाखात दोन-दोनच्या रांगेत शिस्तीने चालणाऱ्या पुरुषांनीही श्री शनैश्वर जन्मोत्सवाच्या आणि अखंड शिवनाम सप्ताह निमित्ताने निघालेल्या शोभायात्रेची शोभा वाढवली.      येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी श्री.शनैश्वर मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जन्मोत्सव साजरा केला जातो. यंदा प्रथमच शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या शोभा यात्रेची सुरुवात मोंढा मैदानातील हनुमान मंदिरापासून झाली.  नियोजनानुसार महिला भगिनींनी भगव्या पताका, मंगल कलश, एकाच रंगाच्या साड्या, परमरहस्य ग्रंथाचे...

MB NEWS:निवडणूक विश्लेषण:कर्नाटकात भाजपचा दारुण पराभव: जाणून घ्या ही आहेत प्रमुख पाच कारणे

इमेज
  कर्नाटकात भाजपचा दारुण पराभव: जाणून घ्या ही आहेत प्रमुख पाच कारणे     हिमाचल प्रदेशपाठोपाठ कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ( Karnataka Election Result 2023) भाजपला मोठा धक्का बसला आहे. मागील वर्षभरात काँग्रेसने भाजपच्या हातून सत्ता काढून घेतलेले कर्नाटक दुसरे राज्य ठरले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांना बळ देणारा हा निकाल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. सर्व ताकद पणाला लावूनही भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या पराभवाची मुख्य पाच कारणे जाणून घेवूया..... भाजप अंतर्गत कलह कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Election Result 2023) आधीपासून भाजपमध्ये अंतर्गत कलहाला सुरूवात झाली होती. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गटबाजी निर्माण झाली. माजी मुख्यमंत्री बी. एस येडियुरप्पा, विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बीएल संतोष आणि भाजप प्रदेश नलिन कुमार कटील या चार गटामध्ये विसंवाद वाढला होता. त्याचबरोबर पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सीरवी यांच्या नेतृत्वाखाली पाचवा गट निर्माण झा...

MB NEWS:सिरसाळा येथे श्री पांडुरंग रुक्मिणी व प.पु.सद्गुरु ब्रह्मिभुत वामनानंद महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा

इमेज
  सिरसाळा येथे श्री पांडुरंग रुक्मिणी व प.पु.सद्गुरु ब्रह्मिभुत वामनानंद महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... .        प. पू. श्री गुरुवर्य माधवानंद महाराज मठाधिपती, चिन्मय मुर्ती संस्थान, उमरखेड यांच्या कृपाआशिर्वादाने प.पू. ब्रह्मिभूत वामनानंद महाराज यांच्या जन्मस्थळी सिरसाळा ता. परळी वै. येथे शनिवार दि. १३/५/२०२३ ते मंगळवार दि. १६/५/२०२३ या कालावधीत श्री पांडुरंग रुक्मिणी व प.पु.सद्गुरु ब्रह्मिभुत वामनानंद महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.         वैशाख कृ. ९ शके १९४५ शनिवार दि. १३/५/२०२३ रोजीसुरुवात पुण्यावाचन नांदीश्राद्धादी कर्म, वैशाख कृ. १० शके १९४५ रविवार दि. १४/५/२०२३देवस्थापणा, अग्नीस्थापना व सर्व देवता उपचार करणे,वैशाख कृ. ११ शके १९४५सोमवार दि. १५/५/२०२३दशविधी स्नान व प्राणप्रतिष्ठा करणे, वैशाख कृ. १२ शके १९४५ मंगळवार दि. १६/५/२०२३ सकाळी ७ ते ९ - अभिषेक, महापुजा, सकाळी ९.३० ते ११.३० वे.शा.सं.ह.भ.प. भागवताचार्य श्री अनिल महाराज जोशी माजलगाव यांचे किर्तन ...

MB NEWS: 'कर्नाटक में नफरत की बाजार बंद हुई है,मोहब्बत की दुकान खुली है', -राहुल गांधी

इमेज
 'कर्नाटक में नफरत की बाजार बंद हुई है, मोहब्बत की दुकान खुली है', - राहुल गांधी निवडणुकीत काँग्रेसने निर्णायक बहुमताकडे वाटचाल सुरु ठेवली आहे. काँग्रेसला १३६ जागा मिळण्याची शक्यता आहे. या दणदणीत विजयावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. 'कर्नाटक में नफरत की बाजार बंद हुई है, मोहब्बत की दुकान खुली है', अशा शब्दांत राहुल गांधी यांनी पक्षाच्या विजयावर आपल्या भावना व्यक्त  केल्या आहेत. दरम्यान, कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांना माध्यमांशी बोलताना अश्रू अनावर झाले. यावेळी ते म्हणाले,”पक्षाने माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवला या विजयाचे सर्व श्रेय मी राज्यातील काँग्रेस कार्यकत्यार्त्यांना देतो. त्यांनी अपार कष्ट केले त्यामुळे राज्यात खोटेपणाचा पर्दाफाश झाला.” Advertise  

MB NEWS:सभापती निवडीनंतर राष्ट्रवादीत खळबळ: दत्ता पाटील यांचा तडकाफडकी राजीनामा

इमेज
  सभापती निवडीनंतर अंबाजोगाई राष्ट्रवादीत खळबळ: दत्ता पाटील  यांचा तडकाफडकी राजीनामा अंबाजोगाई - अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडीनंतर लागलीच दत्ता पाटील यांच्याकडून संचालक पदाचा राजीनामा दिल्याची खळबळ जनक घटना समोर आली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अंबाजोगाई बाजार समिती निवडणूक माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लढवण्यात आली होती. यात महाविकास आघाडीचे १५ उमेदवार निवडून आलेले आहेत तर भाजपचे फक्त ०३ उमेदवार निवडून आले. Click:  ■ अंबाजोगाई बाजार समितीच्या सभापती पदी ऍड राजेश्वर चव्हाण तर उपसभापती लक्ष्मण करनर यांची निवड आज शनिवार (दि.१३) रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उप सभापतीची निवड जाहीर करण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची सभापती पदी निवड होताच, सभापती पदाचे दावेदार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते दत्ता पाटील यांनी नाराज होत संचालक पदाचा राजीनामा सचिवाकडे दिला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  दत्...

MB NEWS:भाजपची मुस्कटदाबी आता देश सहन करणार नाही

इमेज
  राहुल गांधींच्या नेतृत्वापुढे कर्नाटकात मोदी-शहांचा करिष्मा पडला फिका - ॲड.माधव जाधव भाजपची मुस्कटदाबी आता देश सहन करणार नाही         परळी/प्रतिनिधी दि.१३- भाजप कडून होत असलेली सर्वसामान्य जनतेची मुस्कटदाबी आता देशात सहन केली जाणार नाही.राहुल गांधींच्या नेतृत्वापुढे मोदी-शहांचा करिश्माही फिका पडला असून भारत जोडो यात्रेमुळे कर्नाटकात काँग्रेसचा मोठा विजय झाला आहे असे प्रतिपादन किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड.माधव जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकातून केले आहे.२०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणूकितही देशात काँग्रेसची सत्ता येईल असेही ते म्हणाले आहेत.          दिवसेंदिवस वाढत जात असलेली महागाई आता सर्वसामान्य नागरिकाला आता नको आहे. देशात लोकशाही असलेलेली अवस्था पाहुन आता मतदारच उत्तर देत आहेत.कर्नाटकापासून बदलाला सुरुवात झाली आहे.जाती - धर्मामध्ये तेढ निर्माण करून भाजपाने अनेक ठिकाणी सत्ता मिळवली. काही ठिकाणी सरकारी यंत्रणांचा वापर सत्तेसाठी करण्यात आला.मात्र आता मतदारांनीच भाजपला नाकारले असून राहुल गांधींचे नेतृत्वच देशाला पुढे घेऊन जाईल.कर्ना...

MB NEWS:ऑपरेशन लोटस् ची भिती : काँग्रेस सतर्क : कोणतीही रिस्क नको

इमेज
  ऑपरेशन लोटस्  ची भिती : काँग्रेस सतर्क : कोणतीही रिस्क नको  बंगळूर, : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसने बहुमताची आघाडी आहे. सुरुवातीच्या कलानुसार काँग्रेसने ११3 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपने ७६ जागांवर आणि जेडीएसने ३० जागांवर आघाडी घेतली आहे. दरम्यान, काँग्रेसने सरकार स्थापनेच्या दिशेने हालचाली सुरु केल्या आहेत. काँग्रेसने त्यांच्या आमदारांना बंगळूरमध्ये आज येण्यास सांगितले आहे. आमदारांना बंगळूरला नेण्यासाठी राज्यातील दुर्गम भागातही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी निरीक्षकांचीही नियुक्ती करण्यात आल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. (Karnataka Election Results 2023) कर्नाटकात काँग्रेसला 'ऑपरेशन कमळ'ची धास्ती असून त्यांनी त्यांचा आमदारांना बंगळूरला आणण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था केली असल्याचे समजते. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतिंद्र सिद्धरामय्या यांनी काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळवून स्वबळावर पक्ष सत्तेवर येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. कर्नाटकच्या हितासाठी आपले वडील मुख्यमंत्री व्हायला हवेत, अशी इच्छा त्य...