MB NEWS:सभापती निवडीनंतर राष्ट्रवादीत खळबळ: दत्ता पाटील यांचा तडकाफडकी राजीनामा

 सभापती निवडीनंतर अंबाजोगाई राष्ट्रवादीत खळबळ: दत्ता पाटील  यांचा तडकाफडकी राजीनामा




अंबाजोगाई - अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडीनंतर लागलीच दत्ता पाटील यांच्याकडून संचालक पदाचा राजीनामा दिल्याची खळबळ जनक घटना समोर आली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अंबाजोगाई बाजार समिती निवडणूक माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लढवण्यात आली होती. यात महाविकास आघाडीचे १५ उमेदवार निवडून आलेले आहेत तर भाजपचे फक्त ०३ उमेदवार निवडून आले.




आज शनिवार (दि.१३) रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उप सभापतीची निवड जाहीर करण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची सभापती पदी निवड होताच, सभापती पदाचे दावेदार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते दत्ता पाटील यांनी नाराज होत संचालक पदाचा राजीनामा सचिवाकडे दिला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  दत्ता पाटील हे सभापती पदाचे दावेदार असताना ऐन वेळी डावलण्यात आल्याने पाटील यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. दत्ता पाटील यांच्या समर्थकांत नाराजीचा सूर उमटत आहे.

Advertise 






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार