उपजिल्हा प्रमुख अभयकुमार ठक्कर व जिल्हा समन्वयक युवासेना प्रा.अतुल दुबे यांचा उपक्रम

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त वारकऱ्यांना मेडिकल किट व अत्यावश्यक वस्तूंचे वितरण उपजिल्हा प्रमुख अभयकुमार ठक्कर व जिल्हा समन्वयक युवासेना प्रा.अतुल दुबे यांचा उपक्रम परळी (प्रतिनिधी) पंढरपूर कडे आषाढी वारीनिमित्त जाणाऱ्या वारकऱ्यांना परळी वैजनाथ येथे आल्यानंतर मेडिकल किट व दैनंदिन अत्यावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.19 जुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वर्धापन दिनानिमित्त हा विशेष उपक्रम उपजिल्हा प्रमुख अभयकुमार ठक्कर व युवासेना जिल्हा समन्वयक प्रा.अतुल दुबे यांच्या वतीने राबविण्यात आला. यावेळी परळी शहरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दिंडीचे प्रमुख संदीप शास्त्री महाराज यांचाही शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. 19 जुन रोजी शिवसेना वर्धापन दिनानिमित्त वारकऱ्यांना आरोग्य किट आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तू भेट देण्यात आल्या. संत जगमित्र मंदिर येथे हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी बोलत असताना अभयकुमार ठक्कर म्हणाले की, वारकरी पंढरपूरच्या दिशेने शेकडो किलोमीटर पायी जात असतात. पांडुरंगाच्या भक्तीची ओढ त्य...