अभिष्टचिंतन लेख

आ. धनंजय मुंडे यांचा एकनिष्ठ लढवय्या कार्यकर्ता : सय्यद सिराज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे परळी शहराध्यक्ष सय्यद सिराज म्हणजे आ. धनंजय मुंडे यांचा एकनिष्ठ लढवय्या कार्यकर्ता आहे. गेल्या 17 वर्षापासून तो आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि जेष्ठ नेते वाल्मिक आण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम करत आहे. त्याच्या एकनिष्ठेचे आणि प्रामाणिकपणाचे फळ म्हणून त्याला युवक काँग्रेसच्या शहराध्यक्ष हे मानाचे पद देण्यात आले. सय्यद सिराज याने कधीही स्वार्थ पाहून काम केले नाही. अगदी निस्वार्थीपणे आ. धनंजय मुंडे यांच्यासाठी जेवढे जमेल तेवढे काम करतो. या पक्ष कार्यातुन आपला काही फायदा होईल अशी अपेक्षा कधी ठेवलीच नाही. आपण केलेल्या कामातुन नागरिकांना आपल्या नेत्याबद्दल आदर वाटावा आणि नेत्याच्या नजरेत आपली कायम चांगली प्रतिमा रहावी एवढीच त्याची माफक अपेक्षा ! कोणताही राजकीय वारसा नसताना सय्यद सिराज यांनी परळीच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामाजिक कामासाठी माध्यम असावे म्हणून त्यांनी सुरूवातीला शमीम बेगम सेवाभावी संस्थ...