
परळीकरांचा दणका : डाॅ.संतोष मुंडेंचे पार्सल पडले भारी ; सुनील शेट्टीने मागितली शेतकऱ्यांची माफी टोमॅटोच्या किंमती गगनात भिडल्या असताना अभिनेता सुनील शेट्टीने सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली होती.पण त्यावर आता शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे त्याने त्यांची माफी मागितली आहे. सुनील शेट्टीची सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा होत आहे, काही दिवसांपूर्वीच सूनीलने टोमॅटो आणि त्यांच्या वाढत्या किमतीवर विधान केले होते. सुनील शेट्टीने नुकतेच टोमॅटोबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले आहे. जेव्हा अभिनेत्याने टोमॅटोच्या वाढत्या किंमतीवर आपले मत व्यक्त केले तेव्हा सोशल मीडियावर त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. याच कारणामुळे सुनील शेट्टीला सतत ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. आता ट्रोलिंगला कंटाळलेल्या अभिनेत्याने आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. टोमॅटोच्या वाढलेल्या किंमतीवर आपले मत व्यक्त करताना सुनील शेट्टी म्हणाला होता की, य...