पोस्ट्स

 बीड येथील जाहीर सभा ...... https://m.facebook.com/story.php?story_fbid=3424068671179615&id=100044193245863&mibextid=NnVzG8

महिला महाविद्यालयात आचार्य सानंदजी शास्त्री यांचे प्रतिपादन

इमेज
  भारतीय संस्कृतीत  महिलांना ब्रम्हाचा दर्जा महिला महाविद्यालयात आचार्य सानंदजी शास्त्री यांचे प्रतिपादन परळी वार्ताहर  दिनांक 26 .8 . 2023                 संस्कृत दिनानिमित्त कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयामध्ये आयोजन केलेल्या विशेष व्याख्यान सत्रात आचार्य सानंदजी शास्त्री यांनी 'संस्कृत साहित्यातील महिलांचे स्थान' या विषयावर बोलताना वेदांनी महिलांना ब्रम्हाचा दर्जा दिलेला आहे असे प्रतिपादन केले.यासंदर्भात त्यांनी 'स्त्री हि ब्रम्हा बभूविथ'असे ऋग्वेदाचे वचन उद्धृत केले. महिलांच्या उन्नती विषयक विचारांची पेरणी त्यांनी या व्याख्यानातून केली. नास्ति वेदात् परं शास्त्रं नास्ति मातुः परो गुरुः । अर्थात् वेदापेक्षा श्रेष्ठ शास्त्र नाही आणि आईपेक्षा श्रेष्ठ गुरु नाही ,असे प्रतिपादन त्यांनी केले. या व्याख्यानातून संस्कृत साहित्यात महिलेला दिलेल्या श्रेष्ठ आणि सन्माननीय स्थानाचे प्रभावी विवेचन त्यांनी केले.        समारोहात प्रारंभी दीप प्रज्वलन करण्यात आले.पाहुण्यांच्या परिचयानंतर प्रास्ताविकात महिला महाविद्याल...

श्रावणी वेदप्रचार सप्ताहात आचार्य सानंद यांचे प्रतिपादन

इमेज
  परमेश्वराशी नाते जोडल्यास शाश्वत आनंदाची प्राप्ती     श्रावणी वेदप्रचार सप्ताहात आचार्य सानंद यांचे प्रतिपादन                 *परळी वैजनाथ-* दि.२६-                  सुखाच्या शोधात भटकत असलेला  आजचा मानव भौतिक ऐश्वर्यातून सुखी बनू इच्छितोय, पण त्याची ही इच्छा भगवंताची नाते जोडल्याशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही. यासाठी मानवाने परमेश्वराच्या गुण ,कर्म व स्वभावांना ओळखून ते आत्मसात करणे आणि त्याच्याशी तादात्म्यभाव ठेवणे गरजेचे आहे. यातूनच मानवाला खऱ्या अर्थाने शाश्वत आनंद मिळू शकतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध वैदिक विद्वान आचार्य श्री सानंद शास्त्री (पानिपत, हरियाणा) यांनी केले.               येथील आर्य समाजाच्या वतीने गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या श्रावणी वेदप्रचार उत्सवात श्री सानंदजी यांची सकाळी  आध्यात्मिक व धार्मिक विषयावर तर रात्री सामाजिक व राष्ट्रीय विषयावर रात्री प्रवचने सुरू आहेत. यासाठी श्रोत्यांची मोठी गर्दी होत आहे. आजच्या आजच्या ...

यापुढे तीव्र आंदोलन......!

इमेज
  जातीय विष पेरण्याचे काम बंद करा:ब्राह्मण समाजाचा शांततेत इशारा    बीड(प्रतिनिधी)सामाजिक ऐक्य जपण्यासाठी ब्राह्मण समाज वर्षानुवर्ष सलोखा ठेवून काम करत आहे. एखादा ब्राह्मण व्यक्ती कुठे बरळला  तर संपुर्ण समाजाला दोषी धरायचे,या समाजा विषयी इतर जाती,धर्मांमध्ये विष पेरायचे. इतिहासातील कुठले तरी संदर्भ उकरुन आजच्या निरपराध ब्राह्मण समाजाला गुन्हेगार समजायचे. असे जे कट कारस्थान काही राजकिय लोक करत आहेत ते बंद करावे यासाठी बीड शहरातील ब्राह्मण समाजाच्या नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अत्यंत शांततेमध्ये  सत्याग्रह आंदोलन केले. या आंदोलनात कोणत्याही व्यक्तीचा,पक्षाचा निषेध करण्यात आला नाही. आमचा विरोध व्यक्तीला नसून प्रवृत्तीला आहे अशी भूमिका या प्रसंगी समाजाच्या वतीने मांडण्यात आली.हे पहिले आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात आले आहे. या पुढे जर असेच जातीयवादी विष कुणी पेरण्याचा प्रयत्न केला तर मग तो ब्राह्मण समाजातील असो वा इतर कोणत्या समाजातील. त्याच्या विरुध्द बीडमध्ये या पेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.         ...

जिल्ह्याची अस्मिता, सन्मान व विकासाची नांदी ठरणारी सभा

इमेज
  जिल्ह्याची अस्मिता, सन्मान व विकासाची नांदी ठरणाऱ्या बीडच्या जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा -बाजीराव भैय्या धर्माधिकारी परळी वैजनाथ(दि. 26) - रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बीड शहरात होत असलेली सभा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास करण्याच्या उत्तरदायित्वाची सभा आहे.या सभेचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार नियोजन करण्यात आले आहे.अजितदादांसह सर्वच मंत्र्यांच्या व मान्यवरांच्या स्वागतासाठी बीड जिल्हा उत्सुक आहे.या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.       बीड येथे रविवारी दि.27 रोजी दुपारी 3 वा. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खा.प्रफुल पटेल, खा.सुनील तटकरे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, महिला व बालविकास मंत्र...

मंत्री छगन भुजबळ व हसन मुश्रीफ यांचा बीड जिल्हा दौरा

इमेज
  अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा बीड जिल्हा दौरा           बीड, दि. 25 (जि. मा. का.) :-  अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.            रविवार दि. 27 ऑगस्ट 2023 रोजी मोटारीने बीडकडे प्रयाण, दुपारी 12.45 वाजता शासकीय विश्रामगृह बीड येथे आगमन व राखीव. सांयकाळी 5.00 वाजता स्थळ  छत्रपती श्री संभाजी महाराज क्रीडांगण (मल्टीपर्पज ग्राऊड) बीड येथे राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी जाहिर सभेस उपस्थिती. सोईनुसार मोटारीने औरंगाबादकडे  प्रयाण. वैद्यकीय,शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांचा बीड जिल्हा दौरा           बीड, दि. 25 (जि. मा. का.) :-  वैद्यकीय,शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.            रविवार दि. 27 ऑगस्ट 2023 रोजी उस्मानाबाद येथून दुपारी 1.00 वाजता  मोटारीने बीडकडे प्रयाण, दुपारी 3.00 वाजता सनराई...

मृद, वनस्पती पाणी व उती तपासणी

इमेज
 मृद, वनस्पती पाणी व उती तपासणी प्रयोगशाळा      बीड, दि. 25 (जि. मा. का.) :-   जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र दहा लाख 68 हजार 67 हेक्टर आहे जिल्ह्याचे लागवडी खालील क्षेत्र 8 लाख 76 हजार हेक्टर आहे. यातील खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र 7 लाख 85 हजार हेक्टर तर रब्बी हंगामाची सरासरी क्षेत्र 3 लाख 78 हजार हेक्टर आहे. उन्हाळी हंगाम क्षेत्र 32 हजार हेक्टर व सिंचना खालील क्षेत्र 12 हजार  हेक्टर असून 20 हजार हेक्टरवर फळबाग लागवड आहे. कृषी व्यवस्थापनामध्ये मृदा आरोग्य हा महत्त्वाचा घटक आहे. त्याचबरोबर पिकांची अनपेक्षित वाढ हा महत्त्वाचा भाग आहे. शेती पिकांच्या आणि फळ पिकांच्या चांगल्या वाढीसाठी तसेच अधिक उत्पादनासाठी खतांचा समतोल आणि कार्यक्षम वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी माती तपासणी सोबतच वनस्पतीची पाने व उती तपासणी करावी आणि त्यानुसार दिलेल्या शिफारशीनुसार खतांचा वापर करण्यात यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड यांनी केले आहे.       जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळेमध्ये नव्याने वनस्पती पाणी व उती तपासणी प्रयोगशाळा स्थापन झालेली ...