इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

यापुढे तीव्र आंदोलन......!

 जातीय विष पेरण्याचे काम बंद करा:ब्राह्मण समाजाचा शांततेत इशारा 

  बीड(प्रतिनिधी)सामाजिक ऐक्य जपण्यासाठी ब्राह्मण समाज वर्षानुवर्ष सलोखा ठेवून काम करत आहे. एखादा ब्राह्मण व्यक्ती कुठे बरळला  तर संपुर्ण समाजाला दोषी धरायचे,या समाजा विषयी इतर जाती,धर्मांमध्ये विष पेरायचे. इतिहासातील कुठले तरी संदर्भ उकरुन आजच्या निरपराध ब्राह्मण समाजाला गुन्हेगार समजायचे. असे जे कट कारस्थान काही राजकिय लोक करत आहेत ते बंद करावे यासाठी बीड शहरातील ब्राह्मण समाजाच्या नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अत्यंत शांततेमध्ये  सत्याग्रह आंदोलन केले. या आंदोलनात कोणत्याही व्यक्तीचा,पक्षाचा निषेध करण्यात आला नाही. आमचा विरोध व्यक्तीला नसून प्रवृत्तीला आहे अशी भूमिका या प्रसंगी समाजाच्या वतीने मांडण्यात आली.हे पहिले आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात आले आहे. या पुढे जर असेच जातीयवादी विष कुणी पेरण्याचा प्रयत्न केला तर मग तो ब्राह्मण समाजातील असो वा इतर कोणत्या समाजातील. त्याच्या विरुध्द बीडमध्ये या पेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

          या सत्याग्रह आंदोलनाला ब्राह्मण समाजाच्या नागरिकांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला.  पहिल्यांदाच बीडमध्ये ब्राह्मण समाजाच्या आंदोलनाला समाजाचे पत्रकार,संपादक सहभागी झाल्यामुळे या आंदोलनाने अनेक आदर्श प्रस्थापित केले. अलीकडच्या काळात काही राजकिय पक्षाच्या लोकांनी ब्राह्मण समाजाचा घोर अपमान केलेला आहे. कुचेष्टा केलेली आहे. मंत्रोच्चाराचा अपमान केला आहे. तरी सुध्दा अशा कोणत्याही व्यक्तीचा किंवा त्यांच्या पक्षाचा नामोल्लेख कालच्या आंदोलनात कोणीही केला नाही.कोणाचेही फोटो लावले गेले नाहीत.  कोणाच्याही विरुध्द घोषणाबाजी झाली नाही. कोणाच्याही विरुध्द कारवाई करण्याची मागणी किंवा तसे निवेदन देण्यात आले नाही. कोणीतरी आपल्याबद्दल वाईट बोलला म्हणून आपणही  जर वाईट बोललो तर शाब्दिक युध्द सुरु होते, वाद चिघळतो.त्यामुळे कालच्या आंदोलनात कोणीही व्यक्तीगत टिका,टिप्पणी केली नाही. जेष्ठ संपादक नामदेवराव क्षीरसागर,अशोक देशमुख, सतीश पत्की,दिलीप खिस्ती,संतोष मानूरकर, प्रफुल्ल सहस्त्रबुध्दे या सर्व पत्रकारांनी समाजहिताची भूमिका मांडताना जातीय विष पेरणार्‍या लोकांना  सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. हे पहिले आंदोलन असल्याने शांततेत करण्यात आले. या नंतर जर असेच प्रकार सुरु राहिले तर आंदोलनाची तीव्रता वाढेल असा इशारा देण्यात आला. विशेष म्हणजे ब्राह्मण समाजातील एखाद्या व्यक्तीने जर विनाकारण कुठल्या जाती,धर्माबद्दल ,महापुरुषांबद्दल,देशाबद्दल गैरउद्गार काढले तर त्याचा सुध्दा  बीडमध्ये ब्राह्मण समाजाच्या वतीने निषेध करण्यात येणार आहे. आंदोलनाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या