पोस्ट्स

यशस्विनी : अभिनंदनीय

इमेज
  निवड: डॉ.पूजा सूर्यवंशी एमपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात पशुधन विकास अधिकारी  अंबाजोगाई.... अंबाजोगाई येथील डॉ.पूजा विजयकुमार सूर्यवंशी यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात पशुधन विकास अधिकारी वर्ग -१ या पदासाठी निवड झाली. डॉ. पूजा सूर्यवंशी यांनी पदवीचे शिक्षण पशुैद्यकीय व पशुविद्यान विद्यापीठ, परभणी येथून पूर्ण केले असून पद्युत्तर शिक्षण अनुवांशिक व प्रजनन विभागात, राष्ट्रीय अनुसंधान संस्थान, कर्नाल हरियाणा येथून नुकतेच पूर्ण केले. या यशाबद्दल तिचे वडील विजयकुमार नारायणराव सूर्यवंशी व आई भाग्यश्री सूर्यवंशी यांना आकाश ठेंगणे झाले. मोठी बहीण प्रियंका आणि लहान भाऊ प्रवीण यांनी कौतुक केले. तसेच भाऊजी ,मामा आणि सर्व कुटुंबीय व नातेवाईकांनी अभिनंदन केले.

तेली समाज दांडिया महोत्सवात झाली जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे यांच्या हस्ते आरती

इमेज
  तेली समाज दांडिया महोत्सवात झाली जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे यांच्या हस्ते आरती   परळी वैजनाथ दि.२० (प्रतिनिधी)           येथील तेली समाजाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त सार्वजनिक दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवारी (ता.२०) राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते अजय मुंडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी संयोजकांच्या वतीने त्यांचा शाल, पुष्पहार,श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.     येथील प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री.शनी मंदिरात तेली समाजाच्या वतीने गेल्या वर्षापासून सार्वजनिक दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा या दांडिया महोत्सवाचे दुसरे वर्षे आहे. शुक्रवारी सायंकाळी जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. यावेळी संयोजक युवानेते पवन फुटके,शिवशंकर जठार, अतुल बेंडे यांच्या वतीने अजयजी मुंडे यांचे शाल,पुष्पहार, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. दांडियाच्या पाचव्या दिवशी महिलांसाठी राजस्थानी लुक दांडिया या विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी महिलांस...

परळी तालुकास्तरीय कलाविष्कार २०२३ स्पर्धा :प्रथम क्रमांक आलेले स्पर्धक/संघ जिल्हास्तरावर जाणार

इमेज
  परळी तालुकास्तरीय कलाविष्कार २०२३ स्पर्धा :प्रथम क्रमांक आलेले स्पर्धक/संघ जिल्हास्तरावर जाणार परळी /प्रतिनीधी ग्रामीण भागातील जि.प.शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी बीड जिल्हा परिषदेच्या वतीने कलाविष्कार २०२३ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून पहिला तालुकास्तरीय टप्पा गटशिक्षणाधिकारी कार्यालय परळी वै. येथे दिनांक  १९ व २० ऑक्टोबर रोजी संपन्न झाला.यामधे एकपात्री अभिनय, समूह नृत्य, वैयक्तिक नृत्य, समूह गीत गायन, वैयक्तिक गीत गायन अशा स्पर्धांचा समावेश होता. गटशिक्षणाधिकारी श्रीराम कणाके  यांच्या मार्गदर्शनखाली ज्येष्ठ शिक्षणविस्तार अधिकारी गोविंद कराड, ज्येष्ठ शिक्षणविस्तार अधिकारी श्रीमती हिना अन्सारी, केंद्रप्रमुख कुंडलिक गुहाडे , साधनव्यक्ती अशोक कराड, विजय कचरे, परमेश्वर दहिफळे यांनी स्पर्धेचे उत्कृष्ठ नियोजन केले होते. स्पर्धेचा निकाल -  एकपात्री अभिनय प्रथम - कु. पठाण खुशी कलीम -जि.प. कें.प्रा.शाळा सिरसाळ  द्वितीय -  द्वितीय कु.शेळके आरती यशवंत  जि.प.प्रा.शा. कावळेवाडी. तृतीय - सिद्धी उमेश निलंगे संस्कार प्रा शा परळी व का...
इमेज
परळीत दिव्यांग बांधवांना गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानमुळे मिळाला लाख मोलाचा आधार! वंचितांसाठी काम करण्याचे संस्कारच समाजोपयोगी कार्यासाठी ऊर्जा देतात - खा. प्रितम मुंडे पूर्व तपासणी शिबिरातील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना  साहित्याचे मोफत वितरण परळी वैजनाथ।दिनांक २०। वंचित, पिडितांची सेवा करण्याचे संस्कार आमच्यावर आहेत, हेच संस्कार आम्हाला समाजोपयोगी काम करण्याची उर्जा देतात. तथापि, राजकारणातील व्हायरल इन्फेक्शन कमी करण्यासाठी मला 'पांढऱ्या पेशी' व्हायला आवडेल असं खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी येथे सांगितले.    केंद्र सरकारचा सामाजिक कल्याण विभाग आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुक्यातील दिव्यांग बांधवांना खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते आज सहाय्यक साधनांचे मोफत वितरण करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी आम्ही पूर्व तपासणी शिबीर आयोजित केले होते. या शिबिरातील पात्र लाभार्थ्यांना त्यांचे जीवन कष्टमुक्त करणारे सहाय्यक साधने वाटप करताना आनंद होतो आ...

कंत्राटी भरतीचे मूळ जनक काँग्रेस - धनंजय मुंडेंनी तारखा आणि कंत्राटी भरतीचे दिले दाखले

इमेज
  कंत्राटी भरतीचा निर्णय उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातीलच - धनंजय मुंडे कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केल्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत धनंजय मुंडेंनी सांगितला कंत्राटी भरती प्रक्रियेचा एकूण प्रवास! कंत्राटी भरतीचे मूळ जनक काँग्रेस - धनंजय मुंडेंनी तारखा आणि कंत्राटी भरतीचे दिले दाखले नाशिक (दि. 20) - कंत्राटी भरतीच्या निर्णयावरून विरोधकांनी उठवलेला गोंधळ आज राज्य सरकारने बंद केला असून राज्य सरकारने कंत्राटी भरतीचा निर्णय पूर्णपणे रद्द केला आहे. यापुढे होणाऱ्या सर्व विभागातील भरती प्रक्रिया या 'सरकारी भरती' अशाच असतील अशी माहिती आज राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली असून त्यांनी कंत्राटी भरती प्रक्रियेचा निर्णय रद्द केल्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळातील असून, त्यांचे पाप आमच्या माथी मारण्याचा प्रयत्न असफल झाल्याचे, धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.  सर्वात आधी कंत्राटी भरती प्रक्रियेचा जन्म 2003 मध्ये झाला, त्यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार होते....

राष्ट्रसंत भगवान बाबांचे जन्मगांव स्वागतासाठी होतेयं सज्ज

इमेज
भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याच्या तयारीला वेग ! राष्ट्रसंत भगवान बाबांचे जन्मगांव स्वागतासाठी होतेयं सज्ज पंकजाताई मुंडे यांचे होणार हेलिकॉप्टरने आगमन; ग्रामस्थ करणार जोरदार स्वागत जिल्हा प्रशासनाने दिली मेळाव्याला परवानगी पाटोदा । दिनांक २०। राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे जन्मस्थान असलेल्या सावरगांव घाट येथील भगवान भक्तीगडावर सध्या दसरा मेळाव्याच्या तयारीने वेग घेतला आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दरवर्षी हा परंपरागत दसरा मेळावा अलोट जनसागराच्या साक्षीने मोठया उत्साहात पार पडत असतो, यंदाच्या या मेळाव्याकडे  उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने मेळाव्याला परवानगी दिली आहे.   येत्या २४ तारखेला दसरा आहे, त्या अनुषंगाने 'आपला दसरा, आपली परंपरा' जपण्यासाठी संपूर्ण सावरगांव नगरी सज्ज होत असून सर्व ग्रामस्थ एकजुटीने कामाला लागले आहेत. मेळाव्याच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांच्या राज्यभरात ठिक ठिकाणी बैठका सुरू आहेत. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती ती परंपरा पुढे भाजपच्या राष्ट्रीय सचि...

तेली समाजाने आयोजित केलेल्या दांडिया महोत्सव उपक्रम स्तुत्य-चंदुलाल बियाणी

इमेज
तेली समाजाने आयोजित केलेल्या दांडिया महोत्सव उपक्रम स्तुत्य-चंदुलाल बियाणी परळी वैजनाथ दि.१९ (प्रतिनिधी)            महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी शहरात विविध उपक्रम राबवणे आवश्यक असून दांडिया सारख्या उपक्रमांची आवश्यकता असून तेली समाजाने सार्वजनिक दांडिया महोत्सवाचे केलेले आयोजन स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन चंदुलाल बियाणी यांनी केले.         येथील वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री.शनी मंदिरात तेली समाजाच्या वतीने गेल्या वर्षी पासून दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा या उपक्रमाचे दुसरे वर्षे आहे. या दांडिया महोत्सवात गुरुवारी (दि.१९) मराठवाडा साथीचे मुख्य संपादक तथा बन्सलचे मुख्य प्रवर्तक चंदुलाल बियाणी यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना चंदुलाल बियाणी यांनी सांगितले की, महिलांच्या सुप्त गुणांचा विकास होण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे गरजेचे असते. तेली समाजाच्या वतीने सार्वजनिक दांडिया महोत्सवाचे जे आयोजन केले आहे. हा स्तुत्य उपक्रम असून अशाच पध्दतीने विविध ...