ना. पंकजा मुंडे यांनी मयत विलास घुलेंच्या परिवाराचे स्वीकारले पालकत्व ; दुःखात आणि न्यायाच्या लढाईतही पाठिशी बीड दि. २३ -- टाकळी- कदमवाडी (ता. केज) परिसरात झालेल्या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या विलास घुले यांच्या परिवाराचे पालकत्व स्वीकारत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजा मुंडे यांनी त्यांना मदतीचा हात दिला आहे. मयत घुले यांच्या पत्नीस गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने पाच लाख रूपयांची मदत आज त्यांनी जाहीर केली आहे. विलास घुले याच्या हत्येच्या प्रकरणात झालेल्या दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध करत ना. पंकजा मुंडे यांनी पोलिस प्रशासनाला दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, पण कोवळ्या वयात काहीही संबंध नसताना त्याचा हकनाक मृत्यू झाल्यामुळे त्याचे कुटुंब उघड्यावर पडले असून त्यांचेवर अकाली संकट आले आहे. विलास यांचे बंधू रमेश यांच्याशी ना. पंकजाताईंनी संपर्क साधून आपण विलासच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले. तुमच्या दुःखात आणि न्यायाच्या लढाईत मी परिवाराच्या पाठिशी ठामपणे उभी असल्याचे सांगितले. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातू...
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
राष्ट्रसंत भगवान बाबांचे जन्मगांव स्वागतासाठी होतेयं सज्ज
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
-
भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याच्या तयारीला वेग !
राष्ट्रसंत भगवान बाबांचे जन्मगांव स्वागतासाठी होतेयं सज्ज
पंकजाताई मुंडे यांचे होणार हेलिकॉप्टरने आगमन; ग्रामस्थ करणार जोरदार स्वागत
जिल्हा प्रशासनाने दिली मेळाव्याला परवानगी
पाटोदा । दिनांक २०। राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे जन्मस्थान असलेल्या सावरगांव घाट येथील भगवान भक्तीगडावर सध्या दसरा मेळाव्याच्या तयारीने वेग घेतला आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दरवर्षी हा परंपरागत दसरा मेळावा अलोट जनसागराच्या साक्षीने मोठया उत्साहात पार पडत असतो, यंदाच्या या मेळाव्याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने मेळाव्याला परवानगी दिली आहे.
येत्या २४ तारखेला दसरा आहे, त्या अनुषंगाने 'आपला दसरा, आपली परंपरा' जपण्यासाठी संपूर्ण सावरगांव नगरी सज्ज होत असून सर्व ग्रामस्थ एकजुटीने कामाला लागले आहेत. मेळाव्याच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांच्या राज्यभरात ठिक ठिकाणी बैठका सुरू आहेत. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती ती परंपरा पुढे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी अखंडपणे सुरू ठेवली आहे. मागील पाच ते सहा वर्षांपासून संत भगवान बाबा यांचे जन्मस्थान असलेल्या सावरगांव येथे हा दसरा मेळावा होत असून त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने याठिकाणी संत भगवान बाबा यांचे भव्य दिव्य स्मारक उभारून परिसराला 'भगवान भक्तीगड' असे नांव दिलेले आहे.
तयारीला वेग ; पंकजाताईंचे होणार जोरदार स्वागत ----- भगवान भक्तीगडावरील १८ एकर परिसरात हा मेळावा होणार असून डागडूजी, परिसराची स्वच्छता आणि इतर कामांनी वेग घेतला आहे. पंकजाताई मुंडे यांच्या स्वागताची देखील ग्रामस्थांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. गुढी उभारून यंदा त्यांचे स्वागत केले जाणार आहे. मेळाव्यास राज्याच्या कानाकोपर्यातून तसेच बाहेरूनही लाखोंच्या संख्येने भाविक येतात, त्यांची गैरसोय होऊ नये याची खबरदारी घेण्यात येत आहे.
पंकजा मुंडेंच्या मार्गदर्शनाची उत्सुकता ----------- हा मेळावा म्हणजे भक्ती आणि शक्तीचा संगम मानला जातो. मेळाव्याच्या व्यासपीठावर अध्यात्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतात. संत भगवान बाबा आणि लोकनेते मुंडे साहेबांना मानणारा मोठा वर्ग दरवर्षी पंकजाताई मुंडे यांचे विचार ऐकण्यासाठी येत असतो. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील पंकजाताई मुंडे यांचे हेलिकॉप्टरने सावरगांवला आगमन होणार आहे. संत भगवान बाबांचे दर्शन घेऊन त्या मेळाव्यास संबोधित करतील.
पोलिस अधिकाऱ्यांनी घेतला सुरक्षेचा आढावा ----------- पंकजाताई मुंडे यांनी नुकतीच शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढली होती. या यात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहता व राज्यातील एकंदर राजकीय परिस्थिती पाहता पंकजाताई मुंडे काय बोलणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. त्यांचे लाखो समर्थक त्यांना ऐकण्यासाठी भगवान भक्ती गडावर मोठ्या संख्येने दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतला असून नुकतीच पोलीस अधिकाऱ्यांनी दसरा मैदानाची पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतला.
परळीत राडा: तुंबळ हाणामारीत एक ठार परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... तुंबळ हाणामारीत परळीत राडा झाला. यामध्ये एक जण ठार झाल्याची खळबळजनक घटना परळीतील बरकत नगर भागात घडली आहे. कन्या शाळा रोड ते बरकत नगर रस्त्यावर दोन गटात हाणामारी झाली. यात एकाला जीव गमवावा लागला आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार एका समारंभात हा राडा झाल्याचे माहिती प्राप्त झाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मयत इसम व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अचानक वाद झाला हा वाद मारामारीपर्यंत पोहचला. यामध्ये एकजण ठार झाला आहे.अल्लाउद्दीन शेख रा.नागापूर असे मयत ईसमाचे नाव आहे.दरम्यान घटनास्थळी प्रचंड जमाव जमा झाला.पोलीस घटनास्थळावर पोहचले असुन परिस्थिती नियंत्रणात आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान या मारामारी मध्ये मयत झालेले इसम अल्लाउद्दीन शेख हे नागापूर येथील रहिवासी असून नागापूर येथे त्यांची पान टपरी आहे. नागापूर परिसरात ते सर्व परिचित असून या हाणामारीत त्यांना आपला जीव गमवावा लागला...
अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... अंबाजोगाई परळी रस्त्यावर घाटाच्यावर काही अंतरावर भिषण आपघात घडला असुन परळीतील तीन युवक गंभीर जखमी झाले. त्यांना अंबाजोगाईच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असताना यातील दोन युवकांची प्राणज्योत मालवल्याची प्राथमिक माहीती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.एकावर उपचार करण्यात येत आहेत. अंबाजोगाई परळी रस्त्यावर घाटाच्यावर काही अंतरावर आज सायंकाळी 6.45 वा.सुमारास मोटरसायकल व उसाची ट्रॉली यांचा भिषण आपघात घडला. मिळालेल्या प्राथमिक माहीतीनुसार परळीतील तीन युवक मोटरसायकलवरुन परळीकडे येत असताना उसाच्या ट्रॉलीवर धडकुन आपघात घडला. परळी ग्रामीण पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचुन आपघातग्रस्तांना उपचारासाठी हलवण्यात मदतकार्य केले.या आपघात जखमी झालेल्यांमध्ये व्यंकटेश कांदे राहणार बँक कॉलनी,रोहित भराडीया राहणार पद्मावती गल्ली,शुभम धोकटे राहणार इंडस्ट्रियल एरिया परळी यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडू...
*करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय* परळी (दि. 05, प्रतिनिधी) - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या कथित करुणा शर्मा परळीत आल्या असता त्यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तुल आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तूर्तास परळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून चौकशी चालू असल्याचे समजते आहे. परळीत येऊन पत्रकार परिषद घेणार, पुरावे देणार हे दावे तूर्तास तरी फोल ठरले असून करुणा शर्माच्या गाडीत बेकायदेशीर पिस्तुल आढळल्याने त्यांच्या धनंजय मुंडे व त्यांच्या कुटुंबीयांचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान परळी शहरातील शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या असून शहर पोलीस ठाण्यासमोर दाखल झाल्या आहेत. या महिलांनी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची बदनामी तर केलीच पण आज थेट धनंजय मुंडे यांना संपवण्यासाठी डाव आखला असल्याचा आरोप करत करुणा शर्मा यांना अटक करण्याची जोरदार मागणी केली आहे. यावर आता परळी पोलीस काय भूमिका घेतात ...
धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या परळी वैजनाथ , प्रतिनिधी... शहरातील पवनराजे अर्बन निधी या अर्थपेढीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी सात वाजता उघडकीस आली आहे. सध्याच्या परिस्थितीत पतसंस्था, मल्टीस्टेट, पतपेढ्या यांच्या आर्थिक अडचणीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. बीड जिल्ह्यात काही पतसंस्था बाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. यातच आता परळी शहरातील मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या पवन राजे अर्बन निधीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे. प्रेम प्रज्ञा नगर येथील एका अपॉर्टमेंट मध्ये प्रल्हाद सावंत यांनी काही दिवसापूर्वीच घर खरेदी केले होते. या घरात अद्याप ते राहयलाही गेले नव्हते. याच घरात आज दोरीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून त्यांच्या खिशात कागदपत्रे सापडले आहेत. यातून आत्महत्येचे कारण पुढ...
केजनंतर पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला हादरवून टाकणारी अपहरणाची घटना; परळीतील प्रतिष्ठित युवा व्यापाऱ्याचे अपहरण परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा.. केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या झाल्याचा खळबळजनक प्रकार ताजा असतानाच काल (दि.9) रात्री परळी शहरातील प्रतिष्ठित युवा उद्योजक- व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या अपहरण प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया परळी शहर पोलीस ठाण्यात सुरू आहे. या खळबळजनक घटनेबाबत प्राथमिक माहिती अशी की, परळी शहरातील भाजपाचे ज्येष्ठ नेते विकासराव डुबे यांचे चिरंजीव अमोल डुबे यांचे औद्योगिक वसाहत येथे उद्योग व व्यापारीपेढी आहे. नेहमीप्रमाणे ते काल रात्री आपल्या ऑफिसमधून बाहेर मोटरसायकलवर बसत असताना अज्ञात पाच ते सहा लोकांनी येऊन त्यांना बळजबरी उचलून गाडीत टाकले व अंबाजोगाईच्या दिशेने घेऊन गेले. दरम्यान त्यांच्याकडे मोठ्या रकमेची मागणी करत ती रक्कम सुपूर्द करा, मग तुम्हाला सोडून देतो असे त्यांना सांगण्यात आले. घाबरून जाऊन ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा