पोस्ट्स

खा.डाॅ.प्रीतम मुंडेंच्या प्रयत्नाला यश परळी-परभणी रेल्वे मार्गाचे

इमेज
खा.डाॅ.प्रीतम मुंडेंच्या प्रयत्नाला यश     परळी-परभणी रेल्वे मार्गाचे लवकरच दुहेरीकरण परळी- परभणी या मार्गाचे दुहेरीकरण करावे, या मागणीला आता यश आले आहे. लवकरच परळी- परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण होणार आहे. परळी वैजनाथ - परळी- परभणी या मार्गाचे दुहेरीकरण करावे, या मागणीला आता यश आले आहे. लवकरच परळी- परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण होणार आहे. परळी-परभणी या मार्गावरुन परभणी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अकोला, नागपूर, अमरावती व लातूर, हैदराबाद, तिरुपती, बिदर, कोल्हापूर, पंढरपूर, पुणे, मुंबई आदी ठिकाणी रेल्वे धावतात. या १६ च्यावर एक्स्प्रेस व पॅसेंजर, मालवाहतूक रेल्वेची ये-जा असते. मोठ्या प्रमाणावर प्रवासी प्रवास करतात. मात्र, या रेल्वे कधीही वेळेवर धावत नाहीत. परभणीहून येणाऱ्या रेल्वे जवळच असलेल्या वडगाव निळा येथे तासनतास सिग्नलची वाट पाहत थांबवल्या जातात. या रेल्वे स्थानकावरून परळी दिसते; पण तास -दिडतास सिग्नल मिळेपर्यंत रेल्वे येथे थांबतात. परळीहून रेल्वे निघण्याच्या अगोदरपासून ती या स्थानकावरून पुढे जाईपर्यंत रेल्वेला याच स्थानकावर थांबवले जाते. तर, गंगाखेड येथून रेल्व...

हवामान बदलावर आधारित 'शेती' या विषयावर शेतकरी-विद्यार्थी सुसंवाद कार्यक्रमास प्रतिसाद

इमेज
 हवामान बदलावर आधारित 'शेती' या विषयावर शेतकरी-विद्यार्थी सुसंवाद कार्यक्रमास  प्रतिसाद  अंबाजोगाई (प्रतिनीधी)       हवामान बदल व जागतिक तापमान वाढ हे आज अत्यंत महत्वाचे विषय असून त्यानुसार शेतीमध्ये हवामान बदलावर आधारित आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करुन पिकांचे नियोजन करणे ही आजच्या काळाची गरज आहे. हवामानात होणारा बदल जसे की हरितगृह वायू च्या उत्सर्जनात होणारी वाढ यामध्ये कार्बन डायऑक्साइड, मिथेन, क्लोरोफ्लोरो कार्बन, नायट्रस ऑक्साईड या वायुंचा समावेश होतो.ओझोन थराचा ऱ्हास, तापमान वाढीचा परिणाम म्हणून समुद्र पाणी पातळीमध्ये होणारी वाढ, पावसाचे असमान वितरण, वादळे, पुर,अतिवृष्टी, जंगलतोड, वाढते शहरीकरण, इंधनाचा अतिवापर, दुष्काळ, शेतीमध्ये असंतुलित खतांचा व औषधांचा वाढता वापर इत्यादी कारणांमुळे हवामानात होणारा बदल व त्यामुळे शेती तसेच मानवावर होणारे दुष्परिणामांचा सामना सर्वानाच करावा लागेल, तेव्हा हवामान आधारित शेती व्यवस्थापन करुन वरील समस्या काही प्रमाणात नक्कीच कमी करता येतील. दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र अंबाजोगाई मार्फत निक्रा प्रकल्प...

किसान सभा पुन्हा रस्त्यावर

इमेज
बलीप्रतिपदेच्या पूर्वदिनी बळीराजाचा आक्रोश ◆शेतकऱ्यांच्या विविध मागणीला घेऊन किसान सभा पुन्हा रस्त्यावर परळी / प्रतिनिधी सर्व प्रजेला समतेची अन् ममतेची वागणूक देणाऱ्या व प्रजेच्या सुखातच स्वतःचे सुख मानणाऱ्या महाबली बळीराजाच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून बलिप्रतिपदेच्या पूर्व दिनी दि. १३ नोव्हेंबर सोमवार रोजी सकाळी ११ वा. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी अखिल भारतीय किसान सभा बळीराजाच्या मिरवणुकीसह बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर ह.भ.प श्यामसुंदर सोन्नर महाराज यांचे बळीराजाच्या जीवनावर कीर्तन आंदोलन करण्यात येणार असून या कीर्तन आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन किसान सभेकडून करण्यात येणार आल्याची माहिती किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ.एड अजय बुरांडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. सत्ता सिंहासनावर बसलेले आधुनिक वामन सर्वपरी सर्वसामान्य रयतेला छळत आहेत, आणि बळीचा वारसा जपणारा खरा शेतकरी मात्र अस्तित्वासाठी धडपडत आहे.सत्ताधारी शेतक-यांचा पुळका दाखवून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणाबाजी करतात वास्तवात मात्र उत्पादन खर्चात दुपटीपेक्षा जास्त वाढ...

मार्गदर्शन शिबिर

इमेज
  अवयवदान हे जीवनदान -डॉ. सुनील कुलकर्णी नांदेड प्रतिनिधी (दिनांक १० नोव्हेंबर २०२३) अवयवदान जनजागृती उपक्रमा अंतर्गत दिनांक 9 नोव्हेंबर 23 रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिर मयूर विहार कॉलनीत मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  श्रीनिवासजी इनामदार (सेवानिवृत्त मुख्य अभियंता एम एस ई बी) होते तर  प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून डॉ .सुनील कुलकर्णी (अति दक्षता विभाग प्रमुख, अश्विनी हॉस्पिटल नांदेड) व  ज्योतीताई पिंपळे ( नेत्र दान समुपदेशक गुरुगोविंद सिंग जी स्मारक रुग्णालय नांदेड) व जेष्ठ नागरिक  चक्रधरजी साले हे उपस्थित होते.  कार्यक्रमाची सुरेल सुरुवात सौ.  सुरेखा गाजरे यांच्या गीताने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते  दीप प्रज्वलन व दिवाळी निमित्त धनाची देवता महालक्ष्मी चे  प्रतिमा पूजन झाले. त्यानंतर मार्गदर्शन करताना  "आपल्या संस्कृतीमधे दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.दानशुर कर्ण हे आदर्श उदाहरण आहे. अन्नदान, विद्यादान, रक्तदान, विधायक व सामाजिक कार्यासाठी संपत्तीचे दान हे तर महत्वाचे आहेच पण सर्वात श्रेष्ठ दान नेत...

युवकाची संवेदनशीलता: आपघातग्रस्तांचे वाचले प्राण

इमेज
  युवकाची संवेदनशीलता, अपघातातील व्यक्तीला दवाखान्यात उपचारासाठी केले दाखल, वाचले प्राण परळी वैजनाथ दि.०९ (प्रतिनिधी)           परळी-आंबेजोगाई रस्त्यावर कन्हेरवाडी घाटात गुरुवारी  सायंकाळी ६.३० च्या सुमारास दुचाकीच्या समोर अचानक गाय आली. व जोराची धडक बसून दुचाकीवरील दोघे पडले. येणारे जाणारे फक्त पाहुन पुढे जात होते. संवेदनशील नागरीकांनी दुचाकी बाजूला उभ्या करुन त्यांना रस्त्याच्या बाजूला घेतले पण दवाखान्यात कसे न्यायचे यावर चर्चा सुरू झाली. यात एका युवकांनी आपली दुचाकी उभी करुन तात्काळ त्यांना त्यांच्या दुचाकीवर बसवून स्वतः ती दुचाकी घेऊन दवाखाना जवळ केला. व त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. या युवकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.             परळी-आंबेजोगाई रस्त्यावरील कन्हेरवाडीच्या घाटात गुरुवारी (ता.०९) सायंकाळी ६.३० च्या सुमारास बबन श्रीखंडे व अरुण श्रीखंडे (दोघे राहणार परभणी) हे दोघे बंधू आपल्या दुचाकीवरून येडशी येथून परळी मार्गे परभणीकडे जात असताना अचानक गाय समोर आली.या गायीला जोराची धडक बसली. यात गाईचे काही नुकसान झाले नाह...

दिव्यांगांसाठी आयुष्य खर्ची घालणार - डॉ. संतोष मुंडे

इमेज
  मुंबईच्या कार्यालयात उत्स्फूर्त स्वागत: डाॅ.संतोष मुंडे यांनी "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी" अभियानाचे कामकाज घेतले समजुन मुंबईच्या कार्यालयात अनेकांनी केले स्वागत, दिव्यांगांसाठी आयुष्य खर्ची घालणार - डॉ. संतोष मुंडे मुंबई (प्रतिनिधी) दिव्यांगांच्या सेवेसाठी अभियानचे उपाध्यक्ष हे पद माझ्यासाठी खुप महत्वाचे आहे. पदाला न्याय देण्यासाठी मी वचनबद्ध असुन दिव्यांगांसाठी आयुष्य खर्ची घालणार असल्याचे प्रतिपादन "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी" अभियानाचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले. मुंबईच्या कार्यालयात अधिकारी, कर्मचारी व दिव्यांगांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.           डॉ. संतोष मुंडे यांनी आज मुंबई येथे दिव्यांग स्वतंत्र मंत्रालय मित्तल टॉवर नरिमन पॉईंट येथे  ऑफिसला भेट देऊन कामकाज समजून घेतले. यावेळी दिव्यांग विभागाचे प्रधान सचिव अभय महाजन, आयुक्त घोडके यांनी त्यांचे स्वागत करून कामकाजाचे स्वरूप व उद्दिष्टांबाबत सविस्तर माहिती दिली. सातत्याने ना. धनंजय मुंडेंच्या यांच्या नेतृत्वाखाली समाजातील ...

वसंतराव नाईक तांडा सुधार समितीच्या जिल्हाध्यक्षपदी पप्पू चव्हाण यांची नियुक्ती

इमेज
  पंकजा मुंडे यांनी दिला बंजारा समाजातील युवा कार्यकर्त्यांला न्याय वसंतराव नाईक तांडा सुधार समितीच्या जिल्हाध्यक्षपदी पप्पू  चव्हाण यांची नियुक्ती _पंकजाताईंचा विश्वास सार्थ करून दाखवू_ परळी वैजनाथ ।दिनांक ०९। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे हया नेहमीच सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या असतात, त्याचीच परिणीती पुन्हा आली. कौठळीच्या बाळासाहेब उर्फ पप्पू चव्हाण यांची वसंतराव नाईक तांडा सुधार समितीच्या जिल्हाध्यक्ष म्हणून शासनाने नियुक्ती केली आहे.  बंजारा समाजातील युवा कार्यकर्त्यांला पंकजाताईंनी न्याय दिला अशी भावना समाज बांधवांनी व्यक्त केली आहे.   वसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधार योजना व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या अंतर्गत हाती घ्यावयाची कामे जिल्हाधिकारी बीड यांच्या अध्यक्षतेखालील समितीस सुचविण्याकरिता बंजारा बहुल जिल्ह्यासाठी स्थापन करावयाच्या समितीच्या अध्यक्षपदी कौठळीचे भाजपाचे युवा कार्यकर्ते बाळासाहेब भाऊराव चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असून तसे आदेश आज शासनाच्या वतीने निर्गमित करण्यात आले.  नियुक्ती नंतर चव्हाण यांनी ...