पोस्ट्स

धनंजय मुंडेंची विनंती केंद्राकडून मान्य

इमेज
आंबा, काजू, संत्रा यांसह ज्वारीचा पीकविमा दि. 04 व 5 डिसेंम्बर या दिवसात भरता येणार धनंजय मुंडेंची विनंती केंद्राकडून मान्य मुंबई (दि. 02) - रब्बी हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत ज्वारीसह आंबा, काजू, संत्रा आदी फळपिकांचा पीकविमा येत्या चार व पाच डिसेंम्बर या दोन दिवसात भरता येणार आहे. या पिकांचा विमा भरण्याची मुदत 30 नोव्हेंबर रोजी संपली असून, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या विनंतीनंतर केंद्राकडून 4 व 5 डिसेंम्बर या दोन दिवसांसाठी पीक विमा पोर्टल पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.  रब्बी हंगामातील ज्वारी, तसेच आंबा, काजू, संत्रा आदी फळपिकांचा एक रुपयात पीकविमा भरण्यासाठी केंद्राकडून 30 नोव्हेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र विविध तांत्रिक अडचणींमुळे काही शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होता आले नव्हते. याबाबत माहिती मिळताच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी किमान दोन दिवस वरील पिकांचा विमा भरण्यासाठी पोर्टल सुरू करण्यात यावे, अशी विनंती केंद्राकडे केली होती. ही विनंती केंद्राकडून मान्य करण्यात आली आहे.  दरम्यान जे ज्वारी, आंबा, काजू, संत्रा आदी उत्पादक शेतकरी विहित वेळेत...

परळीचे सुपुत्र जिल्हा न्यायाधीश कृष्णगोपाल तोतला सेवानिवृत्त

इमेज
  परळीचे सुपुत्र जिल्हा न्यायाधीश  कृष्णगोपाल तोतला सेवानिवृत्त परळी .... प्रतिनिधी.... परळी चे सुपुत्र तथा लातूर येथील जिल्हा न्यायाधीश  कृष्णगोपाल तोतला हे तब्बल 28 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर 30 नोव्हेंबर रोजी न्यायाधीश या सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांचा लातूर येथे भव्यदिव्य असा निरोप समारंभ पार पडला. वकिली व्यवसायापासून आपल्या सेवेची सुरुवात करून 1995 मध्ये न्यायाधीश या पदावर रुजू होऊन मुंबई, संभाजीनगर, उल्हासनगर, नागपूर, नांदेड,अशा विविध ठिकाणी न्यायाधीश तसेच सहाय्यक धर्मादाय आयुक्त या पदावर आपल्या कार्याची एक आगळीवेगळी छाप टाकणारे परळीचे सुपुत्र कृष्ण गोपाल तोतला हे 30 नोव्हेंबर 2023 रोजी सेवानिवृत्त झाले.लातूर येथील न्याय मंदिराच्या भव्य अशा सभागृहामध्ये त्यांचा निरोप समारंभ पार पडला.  त्यांच्या या निरोप समारंभाच्या वेळी लातूरचे मुख्य न्यायाधीश,  वकील संघाचे सर्व पदाधिकारी, व वकील संघाचे सदस्य, आणि न्याय मंदिरातील विविध पदावर काम करणारे क्लार्क व कर्मचारी यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित होते. अत्यंत भावनिक अशा पार पडलेल्या या समारं...

दुःखद वार्ता:सौ जयश्रीताई दत्तप्पा इटके यांचे निधन

इमेज
  सौ जयश्रीताई दत्तप्पा इटके यांचे  निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी महाराष्ट्र विरर्शैव सभेचे जिल्हाध्यक्ष तथा भाजपा ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इट के गुरुजी यांच्या पत्नी सौ जयश्रीबाई  यांचे आज दिनांक शुक्रवार 1 डिसेंबर  रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यू समय त्यांचे वय 67 वर्ष होते.  परळी शहरात होणाऱ्या विविध धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा अत्यंत मनमिळावू स्वभाव म्हणून त्या प्रसिद्ध होत्या त्यांच्या पश्चात महादेव व प्रकाश ही दोन मुले सुना नातवंडे असा  परिवार आहे.सौ जयश्रीबाई इटके यांच्यावर उद्या दिनांक 2 डिसेंबर शनिवार रोजी कैलास धाम स्मशानभूमी येथे सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

प्रा.टि.पी.मुंडेंची परळीत पत्रकार परिषद : मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

इमेज
आवकाळी पावसाने उसतोड कामगारांचे प्रचंड नुकसान; प्रत्येकी 25 हजारांची अर्थिक मदत द्या-प्रा.टी.पी.मुंडे  परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....       दोन-चार दिवसापासून जी गारपीट आणि अवकाळी पाऊस चालू आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये सर्वात मोठे नुकसान ऊसतोड कामगारांचे झाले आहे. जो ऊसतोड कामगार महाराष्ट्रामध्ये गेला आहे. या गारपिटीमुळे अवकाळी पावसामुळे त्यांच्या सोबत असलेले उपजीविकेच्या सामान खराब झाले आहे. ऊसतोड कामगार व त्यांची मुले बाळे आजारी पडली आहेत.आता त्यांना त्यांची उपजीविका भागवण्यासाठी खायला अन्न नाही त्यामुळे त्यांची उपासमार होत आहे व आजारी पडलेल्यांना दवाखान्यात जाण्यासाठी पैसा नाही म्हणून सर्व साखर कारखान्यांच्या अध्यक्षांनी ताबडतोब दोन कोयत्याला (जोडीला) कारखान्यानतर्फे २५ हजाराची  आर्थिक मदत करावी अशी मागणी प्रा.टि.पी.मुंडे यांनी केली आहे.             राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी  संबंधित  सर्व साखर कारखान्यांना तातडीने आदे...

डिसेंबरच्या पहील्या आठवड्यात प्रवाश्यांच्या समस्या सुटणार

इमेज
परळी-सिरसाळा दुहेरी रस्त्यावर एका बाजूने होणार सुरळीत वाहतूक खा.प्रितमताई मुंडे यांनी दिल्या राष्ट्रीय महामार्ग विभागाला सूचना ; डिसेंबरच्या पहील्या आठवड्यात प्रवाश्यांच्या समस्या सुटणार बीड। दि. ०१ । राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 एफ या मार्गावर परळी ते सिरसाळा दरम्यान सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे वाहतूक धारकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो आहे. या परिसरातील नागरिक आणि प्रवाश्यांच्या तक्रारींची दखल घेऊन खा.प्रितमताई मुंडे यांनी दिनांक २९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदारांची बैठक घेऊन रस्त्याच्या एका बाजूने वाहतुक सुरळीत सुरू राहण्यासाठी विविध सूचना केल्या. परळी-सिरसाळा मार्गाच्या दुहेरीकरणामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे एकाचवेळी खोदकाम करण्यात आल्याने यया मार्गावरील वाहतुकीत अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. या मार्गाहुन प्रवास करणारे वाहतूकधारक आणि प्रवासी रस्त्याच्या हे दुरावस्थेमुळे त्रस्त असल्याची बाब समजताच खा.प्रितमताई मुंडे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाची बैठक बोलावली आणि रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी सुरळीत करण्यासाठी तात्काळ कार्...

श्रीविठ्ठल समानतेचा,समचरण , समदृष्टी असलेला मनमोहक अवतार आहे :दत्ता महाराज आंधळे

इमेज
  श्रीविठ्ठल समानतेचा, समचरण , समदृष्टी असलेला मनमोहक अवतार आहे :दत्ता महाराज आंधळे  पुणे(प्रतिनिधी) भगवंताच्या अनेक अवतारांचे वर्णन असले तरी समचरण व समदृष्टी असलेला देव ,केवळ भक्तांचे कैवारासाठी अवतार धारण करतो.श्रीविठ्ठलाचे  रुप सर्वांना आकर्षित करुन घेते असे प्रतिपादन संतवाड़्मयाचे संशोधक ह.भ.प.ॲड . दत्तात्रय महाराज आंधळे यांनी केले. मुळशी खोऱ्यातील संतनगरी पिरंगुट येथे काकड आरती सांगता निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे प्रतिवर्षाप्रमाणे या ही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाची प्रारंभीची कीर्तन सेवा श्री दत्तात्रेय महाराज यांनी केली.या कीर्तनास ह.भ.प.बबन महाराज,ह.भ.प. सिद्धेश्वर महाराज आळंदी,ह.भ.प.केशव महाराज भेगडे,ह.भ.प. राजेंद्र गोडांबे ,ह.भ.प गणेश महाराज बोडके,तसेच मृदंगाचार्य ह.भ.प सारंग महाराज क्षीरसागर यांनी साथ  दिली.यावेळी प्राचार्य मनोहर भालके, समाजसेवक रामचंद्र देवकर,पिरंगुट येथील श्री चांगदेव पवळे, तसेच सामाजिक व सांस्कृतिक कार्यात अग्रभागी असलेले श्री ज्ञानेश्वर पवळे,श्री तुषार पवळे, पहिल्या दिवशी चे यजमान श्री नारायण सातव, श्री दशरथ मारोती पवळे,श्री कैलास ...

■ प.पु.आचार्य अमृताश्रम स्वामी महाराजांना महाराष्ट्र शासनाचा मानाचा पुरस्कार: परळीकरांच्या वतीने ह्रदय सत्कार

इमेज
■ प.पु.आचार्य अमृताश्रम स्वामी महाराजांना महाराष्ट्र शासनाचा मानाचा पुरस्कार: परळीकरांच्या वतीने ह्रदय सत्कार परळी वैजनाथ,प्रतिनिधी..        बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र व महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील थोर विभूती,अध्यात्मिक क्षेत्राचा सन्मान नवगण राजुरी येथील प.पू.आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज (जोशीबाबा) यांना महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून किर्तन प्रबोधन या विभागातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला. त्याबद्दल परळी वैजनाथ येथे स्वामीजींचा ह्रदय सत्कार करण्यात आला.           वै.ह.भ.प. रामेश्वर महाराज गुट्टे यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित कथा किर्तन महोत्सवात प.पू.आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज (जोशीबाबा) यांची किर्तनसेवा झाली.या  महोत्सवातील संपुर्ण किर्तने व कथा याचे 'झी टॉकीज 'च्या 'मनमंदिरा' कार्यक्रमात प्रसारण होणार आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे या महोत्सवाचे चित्रिकरण झाले. महोत्सवातील समारोपीय सत्रात  ह.भ.प.श्री.अमृताश्रम स्वामी महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन झाले.      ...