पोस्ट्स

नागरिकांच्या सुरक्षेसाठी वैद्यनाथ कॉलेज च्या जॉगिंग ट्रॅकवर हायमास्ट बसवा - सेवकराम जाधव

इमेज
  नागरिकांच्या सुरक्षेसाठी वैद्यनाथ कॉलेज च्या जॉगिंग ट्रॅकवर हायमास्ट बसवा - सेवकराम जाधव परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शहरातील बसवेश्वर कॉलनी येथील नैसर्गिक सानिध्यात असलेला एकमेव जॉगिंग ट्रॅक आहे. नगर परिषदेने येथे तात्काळ हायमास्ट लॅम्प बसवावेत अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव यांनी केली आहे.  वैद्यनाथ महाविद्यालयाच्या या जॉगिंग ट्रॅकवर परळी शहरातील युवक - युवती दररोज विविध प्रकारचे खेळ खेळतात. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या मैदानात सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी वयोवृद्ध महिला व पुरुष मंडळी पण बहुसंख्येने येत असतात. परंतु या मैदानाच्या ठिकाणी लाईटची व्यवस्था नसल्या कारणाने  जॉगिंग ट्रॅक वर येणाऱ्या युवकांसह नागरिकांच्या होत असलेल्या गैरसोयी सोबतच सुरक्षेचा प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे. त्याकरिता नागरिकांच्या सुरक्षेसाठी बसवेश्वर कॉलनीतील वैद्यनाथ कॉलेज च्या जॉगिंग ट्रॅकवर नगर परिषदेने हायमास्ट लॅम्प तात्काळ बसवावेत. अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

अकोला जिल्ह्यातील औजार बँक घोटाळ्याची होणार सखोल चौकशी

इमेज
  नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याची क्षमता; फसवेगिरी करणाऱ्यांकडून होणार सक्त वसुली - धनंजय मुंडे अकोला जिल्ह्यातील औजार बँक घोटाळ्याची होणार सखोल चौकशी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा लवकरच नागपूर (दि. 15) - नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ही राज्य शासनाची जागतिक बँक अर्थ साहाय्यीतअत्यंत महत्त्वाची योजना असून या योजनेच्या द्वारे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ देण्याचे नियोजन शासन करत असताना या योजनेचा गैरफायदा घेऊन कोणी कोणत्याही प्रकारची फसवणूक करून शासनाचे अनुदान लाटण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर शंभर टक्के कार्यवाही करून चुकीचे अनुदान लाटलेल्यांकडून सक्त वसुली करण्यात येईल, अशी ग्वाही आज विधान परिषदेत बोलताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.  अकोला जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत औजारे व ट्रॅक्टर वाटपाच्या संदर्भात गैरव्यवहार झाल्याची तक्रार विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, आ.अमोल मिटकरी आदींनी लक्षवेधीच्या माध्यमातून केली होती, त्याच्या उत्तरादाखल श्री मुंडे बोलत होते.  अको...

शेतकरी, ग्रामस्थ तसेच अधिका-यांकडून घेतली माहिती

इमेज
  केंद्रीय पथकाकडून जिल्हयातील दुष्काळाची पाहणी शेतकरी, ग्रामस्थ तसेच अधिका-यांकडून घेतली माहिती    बीड, दि. 14 (जि. मा. का.)खरिप हंगामात झालेला कमी पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेली दुष्काळी स्थिती तसेच भुजल पातळीत झालेली घट व संभाव्य पाणी टंचाई यापार्श्वभुमीवर केंद्रीय पथकानी आज बीड जिल्हयात प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली आणि ग्रामस्थ्ा व अधिकारी यांच्याशी चर्चा करुन माहिती घेतली.         पथकाने जिल्हयातील बीड, वडवणी धारुर तसेच शिरुर कासार मधील अनेक ठिकाणी भेट दिली. केंद्रातील  कृषी सचिव प्रियरंजन यांच्या नेतृत्वात हे पथक जिल्हयात आले होते.           या पाहणी दौ-यात जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे परविक्षाधीन भा.प्र.से.अधिकारी करिश्मा नायर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर,  तहसीलदार सुहास हजारे आदिंची उपस्थिती होती.        या पथकाने बीड तालुक्यातील घोडका राजूरी तसेच वडवणीतील पोखरी, ढोरवाडी, वडवणी, चौफलदरी तांडा, मोरवड, पु...

टपाल खात्याच्या वतीने टपाल ग्रामीण जीवन बिमा योजनेतील वारसाला धनादेश वाटप

इमेज
  टपाल खात्याच्या वतीने टपाल ग्रामीण जीवन बिमा योजनेतील वारसाला धनादेश वाटप         बीड, दि. 14 (जि. मा. का.) बीड: शहाजानपूर रुई येथील रहिवाशी कै. प्रमिला श्रीराम घुमरे यांचा हृदय विकाराचा झटक्यामुळे दि. 3 मे 2021 रोजी मृत्यू झाला होता. त्यांनी पोस्टाचा ग्रामीण टपाल जीवन बिमा दि. 12 मार्च 2020 रोजी घेतला होता.त्यांच्या पश्चात वारसदार म्हणून त्यांचे पती श्रीराम अशोक घुमरे यांना टपाल जीवन बिमा योजनेतून रु.११०८५२५/- रुपयांचे धनादेश अधीक्षक डाकघर, बीड विभाग बीड डी.आर.शिवणीकर, अधीक्षक डाकघर बीड विभाग,बीड यांच्या हस्ते हेड पोस्ट ऑफिस येथे दि. 11 डिसेंबर 2023 रोजी वाटप करण्यात आला.          डाक जीवन विमा व ग्रामीण डाक जीवन विमा योजना कर्मचारी व शेतकऱ्यांच्या हितासाठी चागली आहे.या योजनेत हफ्ता कमी व लाभ जास्त मिळतो. ग्रामीण भागातील व्यापारी, शेतकरी यांना दहा लाखाचा तर सरकारी कर्मचारी,डॉक्टर, इंजिनिअर, NSE/ BSE यांचे कर्मचारी यांना देखील पन्नास लाखा पर्यंत चा विमा घेता येतो. तरी सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान डी.आर.शिवणीकर डाकघर बीड वि...

समस्या व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ

इमेज
सोमवार दि. 18 डिसेंबर रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन          बीड, दि. 14 (जि. मा. का.) जिल्हा लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो या लोकशाही दिनामध्ये शासन आदेशान्वये महिला व बाल विकास विभागाने, समस्या व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळण्यासाठी त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या हेतूने जिल्हा तसेच तालुकास्तरावर महिलांसाठी विशेष लोकशाही दिन पाळण्यात येतो.        तालुकास्तरावर प्रत्येक तहसिल कार्यालयात महिन्याचे चौथ्या सोमवार आणि जिल्हाधिकारी कार्यालयात दर महिन्याच्या तिस-या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यासाठी दि. 18 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 ते 12.00 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या महिला लोकशाही दिनात तक्रार दाखल करु इच्छिणा-या महिलांनी आपली तक्रार दोन प्रतित महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय बीड येथे दाखल करण्याचे आवाहन केले आहे.

अबॅकसच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत अनघा नावंदेची उत्तुंग भरारी

इमेज
  अबॅकसच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत अनघा नावंदेची उत्तुंग भरारी परळी -  सोलापूर येथे घेण्यात आलेल्या अबॅकसच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत Level-1 मध्ये  येथील संस्कार प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कु. अनघा लक्ष्मी सूर्यकांत नावंदे हिने चॅम्पियन पारितोषिक प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या घवघवीत यशाबद्दल पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव दीपक तांदळे  शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी तांदळे , शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.              "शाळेत मागील तीन वर्षापासून इयत्ता पहिली पासून अबॅकसचे मोफत प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, कल्पनाशक्ती, तार्किक क्षमता, स्मरणशक्ती, निर्णय क्षमता इत्यादी मध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे."        - दीपक तांदळे परळी

अभिनंदनीय: राज्यस्तरीय स्केटींग स्पर्धेसाठी भार्गवीची निवड

इमेज
  विभागीय स्केटींग स्पर्धेत कु. भार्गवी कराडला 3 सुवर्ण पदक राज्यस्तरीय स्केटींग स्पर्धेसाठी भार्गवीची निवड  छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याची नामवंत खेळाडू कु. भार्गवी नामदेव कराड हिची क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत विभागीय कार्यालय अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित विभागीय स्केटींग स्पर्धेमध्ये तब्बल 3 सुवर्ण पदक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये निवड झाली. कु.भार्गवी हीने आजवर अनेक स्केटींग स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी करत गौरवास्पद यश मिळविले आहे. ज्ञानदा इंग्लिशन स्कूलमध्ये इयत्ता नववी वर्गात शिकणाऱ्या भार्गवी हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्केटींग स्पर्धेमध्ये आपल्या भारताचे प्रतिनिधीत्व करण्याचा मानस केला आहे. तीचा हा मानस पूर्ण करण्यासाठी भार्गवी दिवसरात्र मेहनत घेत आहे. अगदी कमी वयात भार्गवीने मिळविलेले यश कौतूकास्पद असून आगामी काळात देखील अशा प्रकारचे यश ती नक्कीच मिळवेल आणि यासाठी आमचे आशिर्वाद तीच्या सोबत असल्याचे भार्गवीच्या आई-वडील यावेळी सांगितले. हे सुवर्ण यश मिळविण्यासाठी ज्ञानदा शाळेचे मुख्याध्यापक, क्रिडा शिक्षक, भाटकर स्केटींग अकॅड...