पोस्ट्स

मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे गावकऱ्यांचे आवाहन

इमेज
  ● मांंडवा येथे उद्या प्रसिद्ध काळभैरव यात्रोत्सव मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे गावकऱ्यांचे आवाहन परळी-वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मांडवा येथे मार्गशिष पोर्णिमेला काळभैरवाची मोठी यात्रा भरते. या यात्रेला दरवर्षी मराठावाड्यासह आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी. परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. आंध्रप्रदेशातील लभान समाजातील भाविक काळभैरवाला आपले कुलदैवत मानत असल्याने  मोठ्या प्रमाणात हे भाविक यात्रोत्सवास आवर्जून उपस्थित राहतात.मांंडवा येथे उद्या (दि.२६)  प्रसिद्ध काळभैरव यात्रोत्सव असुन मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन मांडवा गावकऱ्यांनी केले आहे.       प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही ग्रामस्थांच्या वतीने भव्य यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या मंगळवार दि.२६ रोजी सकाळी ८ ते १० श्री रामकथेची सांगता तद्नंतर भव्य यात्रोत्सव व पारंपरिक पालखी मिरवणूक आणि मंदिर प्रदक्षिणा होईल व दु. १ ते ३ वाजता ह.भ.प विठ्ठल महाराज उखळीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने यात्रोत्सवाचा समारोप होईल. या कार्यक्रमासाठी विविध श्रेञातील मान्यवर व साधूसंतांच...

विक्रीकर निरीक्षक परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या नरेंद्र जोशी व लक्ष्मण गुट्टे यांचा हृदय सत्कार

इमेज
  स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश मिळवून प्रशासनात परळीचा टक्का वाढला पाहिजे- सौ.उषा किरणकुमार गित्ते  विक्रीकर निरीक्षक परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या नरेंद्र जोशी व लक्ष्मण गुट्टे यांचा हृदय सत्कार परळी वैजनाथ, प्रतिनिधी..  एमपीएससी च्या वतीने घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत राज्यात सर्वप्रथम येण्याचा मान पटकावलेल्या परळीच्या नरेंद्र मनोहर जोशी व विक्रीकर निरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या नंदनज येथील लक्ष्मण गुट्टे या यशस्वीतांचा  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या वतीने हृद्य सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना अध्यक्षा सौ. उषा किरणकुमार गित्ते यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासनात परळीचा टक्का वाढला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.           विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटी संचलित किरण गित्ते आयएएस अ‍ॅकडमीच्या वतीने एमपीएससी परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या नरेंद्र मनोहर जोशी व लक्ष्मण दिनकरराव  गुट्टे नंदनज यांच्या सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते.विवेकानंद युथ वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ.उषाताई किरणकुम...

प्रेमरुपी कौतुकाचा वर्षांव अन् भारावलेला सोहळा !*

इमेज
  सकल ब्राह्मण समाजाकडून झालेल्या कौतुकाने मिळाली प्रचंड उर्जा - एमपीएससी स्टेटटाॅपर नरेंद्र जोशी एमपीएससी परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या  नरेंद्र जोशीचा शानदार कौतुक सोहळा प्रेमरुपी कौतुकाचा  वर्षांव अन् भारावलेला सोहळा ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....        एमपीएससी परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या नरेंद्र मनोहरदेव जोशीचा सकल ब्राह्मण समाजाकडून शानदार व आत्मिय भारावलेल्या वातावरणातील सोहळ्यात ह्रदय सत्कार करण्यात आला. परळीत लहानाचा मोठा झालेला व संघर्षातून यशोशिखर सर केलेल्या परळीच्या या भूमिपुत्राने परळीकरांची प्रशासकीय क्षेत्रात मान उंचावली आहे.तो परळीकरांचा अभिमान बनला असल्याच्या भावना या सोहळ्यात व्यक्त करण्यात आल्या.सकल ब्राह्मण समाजाकडून झालेल्या कौतुकाने आपल्याला  प्रचंड उर्जा मिळाली असल्याचे नरेंद्र जोशी यांनी यावेळी सांगितले.             ब्राह्मण बहुद्देशीय सभेचे विश्वस्थ वे.शा.सं. मनोहर जोशी यांचे चिरंजीव नरेंद्र मनोहर जोशी यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या ( एमपीएससी) वतीने घेण्यात येणाऱ्या विक्रीकर ...

आमरण उपोषणाची तारीख ठरली

इमेज
  मनोज जरांगेची बीडमधून मोठी घोषणा, आरक्षण आंदोलनाचं वादळ मुंबईत धडकणार बीड : आंदोलक यांची बीडमध्ये इशारा सभा सुरु आहे. या सभेपूर्वी त्यांची विराट रॅली पार पडली. यानंतर बीडच्या सभेला संबोधित करताना यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला. मनोज जरांगे यांनी भुजबळ यांचा येवल्याचा येडपट असा उल्लेख केला. शांत असलेल्या मराठ्यांना डाग लागला असल्याचंही जरांगे म्हणाले. Click: ● *एमपीएससी परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या नरेंद्र जोशीचा उद्या सकल ब्राह्मण समाजाकडून कौतुक सोहळा* मनोज जरांगे काय म्हणाले? बीड जिल्ह्यातील मराठ्यांचा महाप्रलय जमला आहे. आपण विराट ताकदीनं जमला आहात त्यामुळं मराठा समाजाच्या चरणी नतमस्तक होतो, असं जरांगे म्हणाले. गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आलेल्या बांधवांना जय शिवराय म्हणत मनोज जरांगेंनी अभिवादन केली. मराठा समाजानं शांतता काय असते ते पुन्हा सिद्ध केलं आहे. आपल्याला डाग लावला गेलाय, शांततेनं आंदोलन करणाऱ्या मराठ्यांना डाग लावला आहे. कोणी म्हणतं आमची घरं जाळलं, आमचं हॉटेल जाळलं पण तुम्हीच तुमची ह...

मी घडलो ते आई वडिलांचा त्याग व शिक्षणामुळे : नरेंद्र जोशी

इमेज
  कर्तृत्ववान नरेंद्र मनोहरदेव जोशींचा शिक्षणप्रेमी परळीकरांनी केला भव्य हृद्य सत्कार मी घडलो ते आई वडिलांचा त्याग व शिक्षणामुळे : नरेंद्र जोशी परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शहरातील गणेशपार भागातील नरेंद्र मनोहरदेव जोशी यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या विक्री कर निरीक्षकांच्या (STI) परीक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम येण्याचा तसेच दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक परीक्षेत महाराष्ट्र राज्यात द्वितीय येण्याचा बहुमान पटकावला आहे.  नरेंद्रचे आणि संपूर्ण जोशी कुटुंबियांचे कौतुक करण्यासाठी शनिवार दि. 23/12/2023 रोजी येथील राणी लक्ष्मीबाई टाॅवर चौक येथे परळीकरांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी नरेंद्रचा परळीकरांनी भव्य हृद्य सत्कार केला.  कर्तृत्ववान भूमिपुत्रांसाठी नेहमी एकत्र येणारे सुजाण परळीकर आजही लिंग, जात, धर्म, पक्ष भेद विसरून पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश मिळवणाऱ्या नरेंद्र जोशींसाठी एकत्र आल्याचे चित्र सर्वांनी अनुभवले. Click: ● *एमपीएससी परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या नरेंद्र जोशीचा उद्या सकल ब्राह्मण समाजाकडून कौतुक सोहळा* टॉवर ते साव...

एमपीएससी परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या नरेंद्र जोशीचा उद्या सकल ब्राह्मण समाजाकडून कौतुक सोहळा

इमेज
  एमपीएससी परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या नरेंद्र जोशीचा उद्या सकल ब्राह्मण समाजाकडून कौतुक सोहळा परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....        एमपीएससी परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या रविवारी  नरेंद्र जोशीचा सकल ब्राह्मण समाजाकडून कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.       ब्राह्मण बहुद्देशीय सभेचे विश्वस्थ वे.शा.सं. मनोहर जोशी यांचे चिरंजीव नरेंद्र मनोहर जोशी यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने घेण्यात येणाऱ्या विक्री कर निरीक्षकांच्या (STI) परीक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम येण्याचा तसेच दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक परीक्षेत महाराष्ट्र राज्यात द्वितीय येण्याचा बहुमान पटकावला आहे.यादैदिप्यमान यशाबद्दल  सकल ब्राह्मण समाजाकडून रविवार दि. २४ डिसेंबर सकाळी ११:०० वाजता स्व.मनोहरपंत बडवे सभागृह विठ्ठल रुक्मिणी मंदिर,देशपांडे गल्ली येथे चि.नरेंद्र मनोहर जोशी यांचा 'कौतुक सोहळा' आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास सकल ब्रह्मवृंद, आप्तेष्ट,स्नेही यांनी मोठ्या संख्येने उपस्थित र...

माजी जि.प.सदस्य व आंबेडकरी चळवळीतील नेते विजयकुमार गंडले यांचे निधन

इमेज
  माजी जि.प.सदस्य व आंबेडकरी चळवळीतील नेते विजयकुमार गंडले यांचे निधन परळी प्रतिनिधी. बीड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील नेते विजयकुमार गंडले यांचे शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद  निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर उद्या भिमनगर येथील शांतीवन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.     विजयकुमार गंडले हे घाटनांदूर ग्रामपंचायत उपसरपंच होते.तसेच बीड जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.भारतीय दलित  पॅंथरच्या सामाजिक चळवळीत व  मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळावे यासाठी अनेक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला होता. फुले शाहू आंबेडकर चळवळीत सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. अशा या लढवय्या नेत्याचं शुक्रवार दि. 22 रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे दुःखद निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर उद्या  शनिवार दि. 23, रोजी सकाळी 11 वाजता भिमनगर येथील शांतीवन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.विजयकुमार गंडले ह...