इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

माजी जि.प.सदस्य व आंबेडकरी चळवळीतील नेते विजयकुमार गंडले यांचे निधन

 माजी जि.प.सदस्य व आंबेडकरी चळवळीतील नेते विजयकुमार गंडले यांचे निधन




परळी प्रतिनिधी. बीड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील नेते विजयकुमार गंडले यांचे शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद  निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर उद्या भिमनगर येथील शांतीवन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

    विजयकुमार गंडले हे घाटनांदूर ग्रामपंचायत उपसरपंच होते.तसेच बीड जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.भारतीय दलित  पॅंथरच्या सामाजिक चळवळीत व  मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळावे यासाठी अनेक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला होता. फुले शाहू आंबेडकर चळवळीत सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. अशा या लढवय्या नेत्याचं शुक्रवार दि. 22 रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे दुःखद निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर उद्या  शनिवार दि. 23, रोजी सकाळी 11 वाजता भिमनगर येथील शांतीवन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.विजयकुमार गंडले हे प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत अजय कुमार गंडले यांचे ज्येष्ठ बंधू होते.

     त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, दोन भाऊ, तीन बहिणी, आप्तेष्ट असा भरगच्च परिवार आहे. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीत सर्वत्र शोककळा पसरली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या