पोस्ट्स

मराठा आरक्षणासाठी गणेश नखाते यांनी गळफास घेऊन जीवन संपवले

इमेज
  मराठा आरक्षणासाठी गणेश नखाते यांनी गळफास घेऊन जीवन संपवले धारूर,  धारूर तालुक्यातील आवरगाव येथील  गणेश विठ्ठलराव नखाते वय वर्ष 50 यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार चाल ढकल करत आहे या ताना मधून 1 जानेवारी सोमवार रोजी दुपारी तीन वाजेला मराठा आरक्षण देत नसल्याने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून शेतामधील बोरीच्या झाडाला गळफास घेत आपले जीवन संपवले. मराठा आरक्षणासाठी कित्येक आंदोलने झाले साखळी उपोषण गावोगावी करत आहेत तरी सरकार मनावर घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने धारूर तालुक्यातील आवरगाव येथील शेतकरी गणेश विठ्ठलराव नखाते वय वर्षे 50 यांनी त्यांच्या शेतामध्ये बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्येचे मुख्य कारण हे मराठा आरक्षण असून त्यांचा मुलगा व सून उच्चशिक्षित असून त्यांना आरक्षण नसल्यामुळे नोकरी लागत नाही हे डोक्यात घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे व त्यांनी आत्महत्या करत असताना चिठ्ठी लिहून ठेवली आहे त्या चिठ्ठीत त्यांनी असे लिहिले आहे की मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसल्यापासून सरकार त्यांना तारखेवर तारीख देत असून आरक्षण देत नसल्याने मुख...

22 जानेवारीला सरकारी सुट्टी जाहीर करण्याची मागणी

इमेज
  22 जानेवारीला सरकारी सुट्टी जाहीर करण्याची मागणी अयोध्येत येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवत या दिवशी सरकारी सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे. मुंबई | 1 जानेवारी 2023 :  अयोध्येतील राम मंदिराचं येत्या 22 जानेवारीला उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवशी देशभरात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. मोदींनी सर्वांना घरोघरी दिवे लावण्याचं आवाहन केलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. राम मंदिराच्या उद्घाटन असणाऱ्या 22 जानेवारीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा, अशी मागणी अतुल भातळकर यांनी केली आहे. “राम मंदिराच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमांना सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी सार्वजनिक सुट्टी आवश्यक आहे. यासाठी खासगी आस्थापनांनासुद्धा आवश्यक ते निर्देश द्या”, असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत. “शतकानुशतकांच्या संघर्षानंतर प्रभू श्रीराम जन्मभूमी आयोध्येम...

⭕ 41 लाख रूपयांचा सोन्या नावाचा बैल

इमेज
 ⭕ 41 लाख रूपयांचा सोन्या नावाचा बैल सोलापूर कृषी प्रदर्शनात आणलेल्या सोन्या बैलाच्या नावाची चर्चा रंगली आहे.  हा बैल 41 लाख रूपयांचा असून हवालदार  चन्नाप्पा आवटी यांच्या मालकीचा आहे.  Click: ■ *सिरसाळा येथील श्रीपंडितगुरू पार्डीकर महाविद्यालयात नाट्यशास्त्र विभागाचे ११ वे नाट्य प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद* सांगलीच्या जत तालुक्यातील हा बैल आहे. हा बैल 7 फूट उंच आणि 9 फूट लांब असून बैलाला महिन्याला 50 हजारांचा खुराक लागतो.  तर या बैलाचे वजन एका टनापर्यंत आहे.  तसेच या बैलामुळे आवटी हे महिन्याला अडीच लाख रूपये कमावतात.

रासी सीड्स मार्फत मोफत फिरता दवाखान्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद

इमेज
  रासी सीड्स मार्फत मोफत फिरता दवाखान्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद सोनपेठ ,प्रतिनिधी :  रासी सीड्स कंपनी च्या वतीने उखळी खु।। गावामध्ये  मोफत आरोग्य शिबीर आयोजीत करण्यात आले. 17 सप्टेंबर रोजी परळी बीड येथे कृषी मंत्री श धनंजय मुंडे यांच्या हस्ते रासी सिड्स फिरता मोफत दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले होते. गंगाखेड-परळी तालुक्यातील विविध गावांमध्ये शेताकऱ्यांना हा फिरता दवाखाना  मोफत सेवा देत असून या मध्ये आतापर्यन्त 5 ते 6 हजार शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे व पुढेही आणखी गावांमध्ये जाऊन आरोग्य तपासणी व रोग निदान केले जाणार आहे. या मध्ये प्रमुख्याने ब्लड प्रेशर, शुगर, सर्दी, ताप खोकला व सर्व प्रकारचे आजारावर तपासणी करण्यात येत आहे. या वेळी उखळीचे कृषी विक्रेते सचिन सावंत यांनी रासी सीड्स कंपनी चे आभार व्यक्त केले व रासी कंपनी बद्दल सद्भावना व्यक्त केल्या.  या फिरत्या दवाखान्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वेळी उखळी खु। गावातील सरपंच राजेभाऊ सावंत, जि. प. सदस्य दिनकर तिथे व सुदामराव सावंत इतर प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते व रासी सीड्स कंपनीचे...

सिरसाळा येथील श्रीपंडितगुरू पार्डीकर महाविद्यालयात नाट्यशास्त्र विभागाचे ११ वे नाट्य प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
  सिरसाळा येथील श्रीपंडितगुरू  पार्डीकर महाविद्यालयात नाट्यशास्त्र विभागाचे ११ वे नाट्य प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद  सिरसाळा (प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व श्री पंडितगुरू पार्डिकर महाविद्यालय  नाट्यशास्त्र विभाग, सिरसाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ११ वे नाट्य प्रशिक्षण शिबीर दि. २९/१२/२०२३ शुक्रवार रोजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये नुकतेच संपन्न झाले.          सदरील कार्यक्रमाचे उध्दघाटन बीड येथील के. एस. के. महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभागातील प्रा . डॉ. दुष्यंता रामटेके यांच्या हस्ते करण्यात आले. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री पंडितगुरू पार्डिकर महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मा. आ. व्यंकटराव कदम हे होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर शिवछत्रपती महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. जी. एन. वळेकर, बलभीम महाविद्यालय, बीड येथील नाट्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. केशव भागवत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. के. पाटील, ...

अंबाजोगाईच्या आर्यन वाकडे ची महाराष्ट्र संघात निवड

इमेज
  अंबाजोगाईच्या आर्यन  वाकडे ची महाराष्ट्र संघात निवड अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाई क्रिकेट अकॅडमी च्या आर्यन वाकडे ची महाराष्ट्र संघात निवड झाली असून तो आता राष्ट्रीय पातळीवर खेळणार आहे. शिरपूर या ठिकाणी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा 26 ते 29 डिसेंबर या कालावधीत संपन्न झाल्या. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून खेळाडूं आले होते. या खेळाडूं मधून महाराष्ट्र चा क्रिकेट संघ निवडण्यात आला पुढील राष्ट्रीय स्पर्धा पटना या ठिकाणी होणार आहेत शालेय नॅशनल स्पर्धा 13 जानेवारी 2024 पासुन होत आहेत.या स्पर्धेत आर्यन संजय वाकडे यांची स्कूल नॅशनल गेम्स साठी निवड झाली.तर वेंकटेश राजेन्द्र जगताप यांची राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती.  आर्यन हा उजव्या हाताने गोलंदाजी करतो तर उजव्या हाताने फलंदाजी करतो आर्यन  आणि वेंकटेश ला प्रशिक्षक मोहित परमार, स्वप्नील कोकाटे,माही परमार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आर्यन व वेंकटेश अंबाजोगाई क्रिकेट अकॅडमी मध्ये नियमित सराव करत असतात.आर्यन, व वेंकटश हे श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे   विध्यार्थी आहेत ,आर्यन ला...

दुखःद वार्ता : भावपूर्ण श्रद्धांजली

इमेज
  दुखःद वार्ता : सेवानिवृत न.प.कर्मचारी रामचंद्र धर्माधिकारी यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी          येथील जुन्या गावभागातील सर्वपरिचित व्यक्तिमत्व व नगरपरिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी रामचंद्र पंडितराव धर्माधिकारी यांचे आज दि. 29 रोजी वृद्धपकाळाने निधन झाले .मृत्यू समयी ते 86 वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.     रामचंद्र पंडितराव धर्माधिकारी हे सरकारवाडा अंबेवेस भागातील सर्व परिचित व्यक्तिमत्व होते.नगर परिषद परळी वैजनाथ चे ते सेवानिवृत्त कर्मचारी होते. दीनदयाळ बँकेचे शाखाव्यवस्थापक मुरलीधर धर्माधिकारी, बँक कर्मचारी अनिल धर्माधिकारी यांचे ते वडील होत. वृद्धापकाळाने आज दि. 29 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने धर्माधिकारी कुंटुंबावर कोसळलेल्या या दुःखात........... दै.परिवार सहभागी आहे. उद्या अंत्यविधी      दरम्यान, रामचंद्र पंडितराव धर्माधिकारी  यांच्या पार्थिवावर उद्या शनिवार, दि.30.12. 2023 रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सकाळी 10:00 वा राहते घर गोप...