इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

रासी सीड्स मार्फत मोफत फिरता दवाखान्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद

 रासी सीड्स मार्फत मोफत फिरता दवाखान्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद



सोनपेठ ,प्रतिनिधी :  रासी सीड्स कंपनी च्या वतीने उखळी खु।। गावामध्ये  मोफत आरोग्य शिबीर आयोजीत करण्यात आले. 17 सप्टेंबर रोजी परळी बीड येथे कृषी मंत्री श धनंजय मुंडे यांच्या हस्ते रासी सिड्स फिरता मोफत दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले होते. गंगाखेड-परळी तालुक्यातील विविध गावांमध्ये शेताकऱ्यांना हा फिरता दवाखाना  मोफत सेवा देत असून या मध्ये आतापर्यन्त 5 ते 6 हजार शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे व पुढेही आणखी गावांमध्ये जाऊन आरोग्य तपासणी व रोग निदान केले जाणार आहे. या मध्ये प्रमुख्याने ब्लड प्रेशर, शुगर, सर्दी, ताप खोकला व सर्व प्रकारचे आजारावर तपासणी करण्यात येत आहे. या वेळी उखळीचे कृषी विक्रेते सचिन सावंत यांनी रासी सीड्स कंपनी चे आभार व्यक्त केले व रासी कंपनी बद्दल सद्भावना व्यक्त केल्या.  या फिरत्या दवाखान्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वेळी उखळी खु। गावातील सरपंच राजेभाऊ सावंत, जि. प. सदस्य दिनकर तिथे व सुदामराव सावंत इतर प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते व रासी सीड्स कंपनीचे विभागीय अधिकारी ज्ञानेश्वर महाजन, रासी जिल्हा प्रतिनिधी बळीराम वीर, धिरज पाटील तसेच तालुका प्रतिनिधी विठ्ठल सोळंके यावेळी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या