पोस्ट्स

इमेज
  मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे यांची निवड परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  परळी येथे 11 फेब्रुवारी 2024 रोजी होणाऱ्या 6 व्या  मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी  कै. रामभाऊ (आण्णा) खाडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तर नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे यांची निवड करण्यात आली असल्याची  माहिती संयोजक रानबा गायकवाड व स्वागत समितीच्या वतीने देण्यात आली आहे.       परळी येथे 11 फेब्रुवारी 2024 रोजी साप्ताहिक शिक्षण मार्ग आयोजित मराठवाडा विभागीय पातळीवरील शिक्षक साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.यापूर्वी पाच शिक्षक साहित्य संमेलने यशस्वीपणे पार पडली आहेत. सहाव्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक तथा बीड जिल्हा शिक्षक संघटनेचे  अध्यक्ष ए.तु. कराड आहेत. तर स्वागत अध्यक्ष पदाची धुरा प्रदीप खाडे हे सांभाळणार आहेत ते  कै. रामभाऊ आण्णा खाडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तर नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव आहेत. बीड जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात प...
इमेज
  अयोध्यासाठी धावणार मराठवाड्यातून तीन विशेष आस्था रेल्वे परळीवैजनाथ/ प्रतिनिधी अयोध्या येथे श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर मराठवाड्यातून भाविकांना अयोध्येला जाण्यासाठी तीन रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वे विभागाने घेतला आहे. 22 जानेवारी रोजी आयोध्या येथे श्री रामलल्ला मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने ठिकठिकाणी उत्सव साजरा केला जात आहे.  मराठवाड्यातील भाविकांना अयोध्या येथे जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेता यावे, या उद्देशाने दक्षिण मध्य रेल्वे विभागाने विविध ठिकाणाहून आस्था रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाड्यातून तीन रेल्वे सेवा उपलब्ध झाली आहे. 14 फेब्रुवारी नांदेड येथून नांदेड- आयोध्या (07636) ही विशेष रेल्वे औरंगाबाद मार्गे धावणार आहे. नांदेड, पूर्णा, परभणी, जालना, छत्रपती संभाजी नगर, अंकाई, मनमाड, भुसावळ मार्गे ही रेल्वे  अयोध्या येथे पोहचेल. तसेच परतीच्या प्रवासात 16 फेब्रुवारी रोजी अयोध्या येथून निघणार आहे. 18 फेब्रुवारी रोजी सिकंदराबाद - अयोध्या (07297) ही रेल्वे नांदेड, पूर्णा, हिंग...

आकर्षक विद्युत रोषणाई व मंदिरात सजावट

इमेज
अयोध्येत श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा : परळीच्या काळाराम मंदिरात उत्सवाची जोरदार तयारी आकर्षक विद्युत रोषणाई व मंदिरात सजावट  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...         येत्या २२ जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिरात रामप्रभुंचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असुन या पावनपर्वाच्या अनुषंगाने परळीच्या काळाराम मंदिरात व्याख्यान व धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने उत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. विद्युत रोषणाई, पुष्प सजावट, रांगोळ्या, महाप्रसाद अशी जय्यत तयारी करण्यात आली आहे.        मित्ती पौष शु.१२ शके १९४५ सोमवार, दि. २२/ ०१/२०२४ रोजी  अयोध्येत श्रीराम मंदिरात रामप्रभुंचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे.त्यानिमित्त श्री काळाराम मंदिर संस्थान, स्व. माणिक बाजीराव धर्माधिकारी सभागृह, अंबेवेस, परळी वैजनाथ, जि.बीड. येथे 'एक दिवस श्रीरामासाठी.. रामरक्षा देशासाठी' या विषयावर सकाळी ११:०० वा. सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा.डॉ. श्याम महाराज नेरकर (एम.ए., नेट., पी.एच.डी.) (कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय, परळी वै.) यांचे व्याख्यान होईल.दु...

राज्याच्या 5% निधी बीड जिल्ह्यात! मंगळवार पासून होणार लाभाचे वितरण

इमेज
  कृषीमंत्री धनंजय मुंडेंमुळे कृषी अभियांत्रिकीकरण योजनेतील 314 लाभार्थींना 2 कोटी रुपये निधी मंजूर राज्याच्या 5% निधी बीड जिल्ह्यात! मंगळवार पासून होणार लाभाचे वितरण बीड (दि. 20) - राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे कृषी यांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत बीड जिल्ह्यातील ट्रॅक्टर व अन्य औजारांच्या प्रलंबित 314 लाभार्थींच्या सुमारे 2 कोटी रुपये निधीस मंजुरी मिळाली असून, डीबीटी द्वारे हा निधी बीड जिल्हा कृषी विभागास प्राप्त झाला आहे.  जिल्ह्यातील ट्रॅक्टरच्या 94 तर अन्य ट्रॅक्टर चलीत औजारांच्या 220 मागण्या अशा एकूण 314 लाभार्थींच्या सुमारे 2 कोटी रुपये निधीचे वितरण मंगळवार पासून थेट लाभार्थींना करण्यात येणार आहे.  कृषी अभियांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत ट्रॅक्टर सह रोटावेटर, पलटी नांगर, मळणी यंत्र, पेरणी यंत्र, कडबा कुटी, पाचट कुटी, मोगडा आदी औजारांसाठी अनुदान देण्यात येते. या योजनेतून मंजूर अनुदानाच्या सुमारे 5% अनुदान यावर्षी एकट्या बीड जिल्ह्यात प्राप्त झाले आहे. मंडळ कृषी अधिकारी कार्यालय व तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे संपर्क करून...

मुंडे बंधु-भगिनींसह हजारो रामभक्त होणार सहभागी

इमेज
  पंचम ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र परळी वैजनाथ २१ जानेवारी रोजी  शोभायात्रा मुंडे बंधु-भगिनींसह हजारो रामभक्त होणार सहभागी परळी वैजनाथ (प्रतिनिधी) कलियुगातील तब्बल साडे पाचशे वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र अयोध्येत मूर्त स्वरूपात विराजमान होत आहेत. या अनुषंगाने पंचम ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र परळी वैजनाथ लोकोत्सव समितिच्या वतीने भव्य शोभा यात्रा रविवार दि. २१ जानेवारी रोजी सकाळी  ९:३० वाजता प्रभू वैद्यनाथ मंदिरा परिसरातून निघणार आहे. या सोहळ्यात तब्बल तीस हजार रामभक्त सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्व भारतीयांच्या आस्थेचा विषय असलेल्या रामायणामधील अयोध्येतील श्रीराम मंदिरात तब्बल साडे पाचशे वर्षांनी प्रभू श्रीरामांची न्याय व्यवस्थेच्या आदेशानुसार प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यानिमित्ताने देशभरात एकप्रकारे दिवाळी सारखे वातावरण तयार होत आहे. या निमित्ताने प्रत्येक रामभक्त आपल्या घरांवर तसेच व्यापारी बांधव आपल्या घरासह दुकानांवर भगवे झेंडे लावून तसेच विद्युत रोषणाई (लायटिंग) करून आनंदोत्सव द्विगुणीत करू शकता. शोभायात्रेत सहभागी होताना शक्यतो भगवे, केशरी, लाल व...

गेवराईत मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत :

इमेज
  गेवराईत मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत : पन्नास जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी गेवराई...... मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे जात असताना गेवराई येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी 51 जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच त्यांच्या स्वागतासाठी ठीक ठिकाणी कमानी उभारण्यात आल्या होत्या यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे दिनांक 20 जानेवारी रोजी सराटी अंतरवाली इथून मुंबईकडे जात असताना त्यांचे गेवराई तालुक्यात सायंकाळी पाच वाजता आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी सकाळ पासून च बच्चे कंपनी पासून वृध्दा पर्यंत मराठा समन्वय रस्त्याच्या दुतर्फा ला उभे होते  ठिकठिकाणी  कमानी उभारण्यात आल्या होत्या.. तसेच मराठा बांधवांनसाठी पाण्याची सोय देखील करण्यात आली होती .गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्यांचे आगमन झाले यावेळी 50 जेसीबी च्या माध्यमातून त्यांच्यावर पुष्पवष्टी करण्यात आली. महाराजांची आरती झाली व त्यांचे स्वागत करण्यात आले. ...

सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक चेतन सौंदळे यांच्या पाठपुराव्यास यश

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एफ.एम.आकाशवाणी केंद्र अंबाजोगाईचे ऑनलाईन उदघाटन सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक चेतन सौंदळे यांच्या पाठपुराव्यास यश परळी वैजनाथ/प्रतिनिधी परळी-अंबाजोगाई परीसरातील नागरिकांकरिता आकाशवाणी केंद्र निर्मितीचे स्वप्न भारत देशाचे पंतप्रधान  श्री.नरेन्द्रजी मोदी यांच्या शुभहस्ते शुक्रवार दि.19 जाने.2024 रोजी ऑनलाईन उद्घघाटनाद्वारे करण्यात आले.यावेळी केंद्रीय सुचना आणि प्रसारण मंत्री ना.अनुराग ठाकूर,राज्यमंत्री डॉ.एल.मुरूगन यांची प्रमुख उपस्थिती होती.  अंबाजोगाई येथील 10 किलोवॅट क्षमतेच्या आकाशवाणी एफ एम प्रसारण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी आमदार सौ.नमिताताई मुंदडा,अपर पोलीस अधिक्षक चेतना तिडके,पुणे आकाशवाणी केंद्राचे उपसंचालक श्री.अनिलकुमार पाटील,सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक चेतन सौंदळे व मान्यवरांची उपस्थिती होती.   अंबाजोगाई तालुक्यातील पिंपळा(धा.) येथील भारत सरकारच्यावतीने बंद करण्यात आलेल्या उच्च शक्ती दुरदर्शन प्रक्षेपण केंद्राच्या जागेत आकाशवाणी केंद्र निर्मितीसाठी राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष तथा सा...