पोस्ट्स

गंगथडीचा नायक ते मराठायोद्धा, मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा, मनोज जरांगे यांचा संघर्षमय प्रवास

इमेज
  गंगथडीचा नायक ते मराठायोद्धा, मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा, मनोज जरांगे यांचा संघर्षमय प्रवास मुंबई :  मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वात मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक नवी मुंबईत दाखल झाले आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचे ते चेहरा बनले आहेत. जालन्यातील आंतरवाली सराटीत ३१ ऑगस्टला कुणबी नोंदीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाला आणि मनोज जरांगे यांचं नाव मोठ्या पातळीवर प्रकाशझोतात आलं. मनोज जरांगे यांनी सातत्यानं विषय लावून धरत त्यांच्या मागण्या मान्य करुन घेतल्या आहेत. गेल्या पाच महिन्यात मनोज जरांगे यांची ओळख गंगथडीचा नायक ते मराठा योद्धा असा प्रवास झाला आहे. गंगथडीचा नायक ते मराठा योद्धा असा प्रवास मनोज जरांगे पंधरा वर्षांपासून मराठा आरक्षण आणि शेतकरी प्रश्नांवरील छोटी मोठी आंदोलनं त्यांच्या शिवबा संघटनेच्या माध्यमातून करत होते. मराठा आरक्षण आंदोलन जालन्यातील आंतरवाली सराटीत होत असलं तरी मनोज जरांगे यांचं मूळ गाव बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मातोरी हे आहेत. मनोज जरांगे यांना मानणारा मोठा वर्ग अंबड, घनसावंग आणि गेवराई तालुक्यात आहे. या भागातून गोदावरी नदी वाहते. याल...

महाराष्ट्र ठरला सहा पद्मभूषण तर सहा पद्मश्रींचा मानकरी

इमेज
  महाराष्ट्राला १२ पद्म पुरस्कार जाहीर महाराष्ट्र ठरला सहा पद्मभूषण तर सहा पद्मश्रींचा मानकरी • दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ नेते राम नाईक, संगीतकार प्यारेलाल यांच्यासह सहा जणांना पद्मभूषण पुरस्कार • सामाजिक कार्यकर्ते शंकर बाबा  पापळकर ,  मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे ,  नेत्रतज्ञ मनोहर डोळे  सह सहा मान्यवरांना  पद्मश्री   पुरस्कार नवी दिल्ली, 25 :  सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा आज रात्री उशीरा  करण्यात आली.  प्रसिध्द साहित्यिक होर्मुसजी कामा यांना (साहित्य व शिक्षण-पत्रकारिता) क्षेत्रात, अश्विन मेहता यांना (वैधक), ज्येष्ठ नेते राम नाईक यांना (सार्वजनिक सेवा), दिग्दर्शक राजदत्त आणि प्यारेलाल शर्मा यांना (कला) तर कुंदन व्यास यांना (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता) क्षेत्रात पद्म भूषण यांच्यासह महाराष्ट्रातील अन्य सहा मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणा-या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. ...

प्रा.डॉ.सिद्धार्थ तायडे यांचा विशेष लेख>>>>>>समाजप्रबोधनकार : भीमयुगकार रानबा गायकवाड

इमेज
  समाजप्रबोधनकार : भीमयुगकार रानबा  गायकवाड २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.  भारतीय संविधान अंगीकृत आणि अधिनियमीत करून स्वीकृत केलेला मंगलमय दिन!याच दिवसाचा आणखी एक विलक्षण योग म्हणजे  समाजप्रबोधनकार साहित्यिक संपादक रानबा गायकवाड यांचा जन्मदिवस.सर्वप्रथम त्यांना जन्मोत्सव निमित्ताने सम्यक मंगलकामना! विश्वरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून आपण लेखणी हाती घेतली .कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पावलांनी पुनीत झालेल्या  रयत शिक्षण संस्था सातारा परिसरात  आपल्या आयुष्याची बांधणी केली.आपण पत्रकारिता क्षेत्राला जरी सेवा दिली असली तरी आपण आपल्यातील साहित्यिक-रंगकर्मी सतत जागा ठेवला. अनेक नाटकांमध्ये आपण अभिनय करुन आपल्यातल्या नटाची साक्ष दिली अनेक नाटकांचे अत्यंत सकस आणि अर्थपूर्ण असे नाटयलेखनही केले आहे. आपल्या सशक्त लेखणीतून साकारलेली आणि प्रतिभावंत  सर्जनशील दिग्दर्शक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी दिग्दर्शित केलेली 'भीमयुग' ही नाट्यकृती म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीदर्शी विचारांचा न...

विद्या कुलकर्णी यांना राष्ट्रपती पदक जाहीर

इमेज
  विद्या कुलकर्णी यांना राष्ट्रपती पदक जाहीर सीबीआय च्या जॅाईंट डायरेक्टर विद्या जयंत कुलकर्णी IPS यांना आज उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले. मूळ सोलापूर जिल्ह्यातील तिऱ्हे या छोट्याशा गावातील असलेल्या विद्या कुलकर्णी तसेच पंढरपूर हे आजोळ असलेल्या १९९८ बॅचच्या तामिळनाडू केडर च्या आयपीएस आहेत. तिऱ्हे  च्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेऊन नंतर सांगली वालचंद या प्रतिष्ठित महाविद्यालयातून बीई ( कॉम्प्युटर ) चे शिक्षण घेतले आहे. सध्या त्या सीबीआय च्या जॅाईंट डायरेक्टर ( साऊथ झोन ) पदावर दिल्ली येथे कार्यरत आहेत. धुळे येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता सौ. वर्षा घुगरी यांच्या त्या लहान भगिनी आहेत.

शिस्तबध्द ग्रंथदिंडीने परळीकरांचे लक्ष वेधले!

इमेज
  परळीत कोष्टी समाजाच्या वतीने आयोजित श्री रामलिंग चौंडेश्वरी देवी उत्सवाची थाटात सांगता बाल कीर्तनकार ह.भ.प.गौरी हरेगावकर यांचे कीर्तन;  परळी/संतोष जुजगर-  होमहवण, ग्रंथदिंडी, काल्याचे किर्तन व महाप्रसादाने गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या श्री रामलिंग चौंडेश्वरी देवी देवांग पुराण पारायण  सोहळा मोठ्या थाटा- माटात पार पडला. कोष्टी समाजाने आयोजित केलेल्या  कार्यक्रमांचा परळी व पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घेतला. शिस्तबध्द पध्दतीने निघालेल्या ग्रंथदिंडीकडे परळीकरांचे लक्ष वेधले. लहान मुलांच्या हातातील भगवे पताके , रामलिंग चौंडेश्वरी मातेचा व  रामकुष्ण हरी  चा जयघोषाने परळीनगरी दणाणली होती. टाळ- मृदंग  यामुळे सर्वजण मंञमुग्ध झाले होते.           शहरातील गुरूकृपानगर येथील श्री हनुमान मंदिर येथे दि.25 जानेवारी रोजी रोजी श्री रामलिंग चौंडेश्वरी देवांग पुराण पारायण व मान्यवरांच्या उपस्थीत ग्रथंपुजा करून प्रारंभ करण्यात आला होता. या वेळी मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थीती लाभत होती. पारायण व्यासपीठ प्रमुख म्हणून सौ. सोनाली ...

आरोग्य हॉस्पिटल व अ‍ॅडव्हान्स्ड लॅप्रोस्कोपी सेंटरचा २६ जानेवारीला शुभारंभ

इमेज
 ना.धनंजय मुंडे,खा.डाॅ.प्रितम मुंडे यांच्या उपस्थितीत आरोग्य हॉस्पिटल व अ‍ॅडव्हान्स्ड लॅप्रोस्कोपी सेंटरचा २६ जानेवारीला शुभारंभ परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... जनरल व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. संतोष रघुनाथ मुंडे व स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ. प्रज्ञा मुंडे (ढाकणे) यांच्या आरोग्य हॉस्पिटल व अ‍ॅडव्हान्स्ड लॅप्रोस्कोपी सेंटरचा ना.धनंजय मुंडे,खा.डाॅ.प्रितम मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवार, २६ जानेवारी २०२४  सायं.६ वा.होणार आहे.       आरोग्य हॉस्पिटल व अ‍ॅडव्हान्स्ड लॅप्रोस्कोपी सेंटरचा नाथ रोड, कृष्णा टॉकीजच्या बाजुला, नेहरू चौक (तळ), परळी वैजनाथ येथे शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. अशोक बडे (जिल्हा शल्य चिकित्सक, बीड.), डॉ. उल्हास गंडाळ( जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.), डॉ. लक्ष्मण मोरे (तालुका आरोग्य अधिकारी, परळी वै.), डॉ. अरूण गुट्टे (वैद्यकीय अधिक्षक, परळी वै.), डॉ. राजेश दरडे (वैष्णवी हॉस्पिटल, लातूर), डॉ. प्रदिप हुशे (जालना हॉस्पिटल, जालना), डॉ. शालिनी कराड (कराड हॉस्पिटल, परळी वै.), डॉ. बालासाहेब कराड (कराड ह...

अभिष्टचिंतन लेख:परळीच्या वैभवात भर घालणारे साहित्यिक रानबा गायकवाड

इमेज
  परळीच्या वैभवात भर घालणारे साहित्यिक रानबा गायकवाड              26 जानेवारी हा दिवस भारतीय इतिहासातला सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. ज्या दिवशी भारताला स्वतःचे सार्वभौमत्व असलेले प्रजासत्ताक राज्य मिळाले. लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य. लोकशाहीच्या मार्गाने जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश म्हणून ओळख निर्माण करणारी, जगातील सर्वात सुंदर लिहिली गेलेली राज्यघटना संविधान निर्माते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला अर्पण केली.  त्या दिवसापासून भारतीय समाज रचनेचा गाडा हा राज्यघटनेच्या मार्फत सुरू झाला. तो ऐतिहासिक दिवस म्हणजे 26 जानेवारी होय.     कायद्यापुढे सर्व समान आहेत. स्वातंत्र्य, बंधूता, समता या महान विचारांची जपणूक करणारी, प्रत्येक भारतीयाला भारत देशा प्रति प्रेम प्रदान करणारी, भारत देशामधील प्रत्येक जाती-धर्माच्या माणसाला स्वतंत्रता बहाल करणारी, प्रत्येक भारतीयाला देश प्रेम शिकवणारी, देशाप्रती देश भावना चेतावणारी राज्यघटना भारताला बाबासाहेबांनी दिली.  या राज्यघटनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेला दिवस ...