पोस्ट्स

इमेज
  शोभायात्रा: महर्षी दयानंदांच्या जयघोषाने परळी शहर दुमदुमले     परळी वैजनाथ,दि.३-             थोर समाजसुधारक व आर्य समाजाचे संस्थापक महर्षी स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शहरात महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा व आर्य समाज परळीच्या संयुक्त विद्यमाने येथील नंदागौळ मार्गावरील श्रद्धानंद गुरुकुल आश्रमात राज्यस्तरीय आर्य महासंमेलनास कालपासून उत्साहात सुरुवात झाली. यानिमित्त परळी शहरातून आज (दि.३) भव्य स्वरूपात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. कालपासून येथील नंदागौळ मार्गावरील श्रद्धानंद गुरुकुल आश्रमात राज्यातील विविध ठिकाणाहून आर्य समाजाचे प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत.         सकाळी विविध यजमानांच्या उपस्थितीत यज्ञ संपन्न झाला.नंतर शहरातील शिवाजी चौकातून शोभायात्रा निघाली. यात शहरातील चौका - चौकात विविध शाळांचे विद्यार्थ्यांनी लेझीम, योगासने विविध कला प्रदर्शन इत्यादींचे सादरीकरण केले. या शोभायात्रेत सर्वात पुढे घोडेस्वार, नंतर शाळांचे विद्यार्थी, गुरुकुलाचे ब्रह्मचारी, राज्यात...

ज्योतिर्लिंग स्थानाबाबत पुन्हा खोडसाळपणा: राहुल गांधीच्या वृत्तांकनात झारखंडच्या वैद्यनाथ धामचा ज्योतिर्लिंग म्हणून उल्लेख

इमेज
  ज्योतिर्लिंग स्थानाबाबत पुन्हा  खोडसाळपणा: राहुल गांधीच्या वृत्तांकनात झारखंडच्या वैद्यनाथ धामचा ज्योतिर्लिंग म्हणून उल्लेख परळी वैजनाथ, प्रतिनिधी....           काँग्रेस नेते राहुल गांधी हे झारखंड येथील वैद्यनाथ धाम येथे दर्शनासाठी गेले होते. राष्ट्रीय वृत्तवाहिन्या यांनी वैद्यनाथ धाम चा उल्लेख बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असा केला परंतु यामध्ये महाराष्ट्रातील मराठी मीडियाने सुद्धा कोणतीही कसर न ठेवता व कुठलाही विवेक जागृत न ठेवता सरळ सरळ ज्योतिर्लिंग म्हणून झारखंड येथील वैजनाथ धामचाच उल्लेख करून वृत्तांकन केल्याने परळीतील शिवभक्त व तमाम महाराष्ट्रातील शिवभक्तांमध्ये या मीडियाचा तीव्र शब्दात निषेध केला जात आहे.          बारा ज्योतिर्लिंगाचा उल्लेख करत असताना अनेक वेळा जाणीवपूर्वक महाराष्ट्रातील पंचम ज्योतिर्लिंग स्थान असलेल्या परळी वैजनाथ चा उल्लेख टाळला जातो. हा मुद्दा वारंवार पुढे येत असतो. सर्व शास्त्रसंमत व धर्मशास्त्रसंमत त्याचबरोबर सर्व ऐतिहासिक पुरावे, सर्व शंकराचार्य व साध...

मोठी बातमी! लालकृष्ण आडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून घोषणा

इमेज
  मोठी बातमी! लालकृष्ण आडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून घोषणा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे.         पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्टवर लिहिलंय की, मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. मी त्यांच्याशी संवाद साधला असून या पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.आमच्या काळातील सर्वांत प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेल्या आडवाणी यांचं भारताच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान आहे. संघटनेच्या तळापासून त्यांनी कामाला सुरुवात केली आणि उपपंतप्रधान पदापर्यंत मजल मारत देशाची सेवा करण्याचे काम केले. केंद्रीय गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी संसदेत उपस्थित केलेले मुद्दे, त्यांची भाषणे आमच्यासाठी दिशादर्शक आणि समृद्ध असा अनुभव देणारी ठरली आहेत. ग...

श्री सरस्वती विद्यालय, परळी वै, च्या माजी विद्यार्थ्यांचा ४१ वर्षांनंतरचा स्नेह मिलन सोहळा उत्सहात

इमेज
  श्री सरस्वती विद्यालय, परळी वै, च्या माजी विद्यार्थ्यांचा ४१ वर्षांनंतरचा स्नेह मिलन सोहळा उत्सहात परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... दि. २७ जानेवारी २०२४ रोजी स्नेह मिलनाच्या पुर्व संध्येला सायंकाळी सर्व वर्ग मित्र मैत्रिणींच्या ४१ वर्षानंतर भेटीचा योग जुळवून आणला त्यावेळी प्रत्येकाच्या चेहन्यावर एक आनंद दिसून येत होता, कांही वर्ग मैत्रिणीना आश्रू आनवर होत होते, जवळपास ६०-७० वर्ग मित्र मैत्रिणीची यावेळी भेट झाली, प्रत्येकांनी आपला परिचय देवून सायंकाळी भोजन करून दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या स्नेह मिलनाच्या कार्यक्रमाची चर्चा केली. दिनांक २८ जानेवारी रोजी श्री सरस्वती विद्यालय परळी वैजनाथ शाळेतील सन १९८२-८३ या दहावी वर्गाच्या विद्यार्थ्यांचा ४१ वर्षानंतर स्नेह मिलनाचा सोहळा अक्षता मंगल कार्यालय येथे पार पडला. या स्नेह मिलन सोहळयास सर्व दुरवर असलेली वर्ग मित्र मैत्रीणी एकत्र आले. पहिल्या सत्रामध्ये सकाळी जिजामाता उद्यान येथे जाऊन फोटो सेशन करून शाळेमध्ये जाऊन तिथे जुन्या आठवणींना उजाळा देत उपस्थित सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी आठवणीनां उजाळा दिला. शाळेमध्ये शिक्षकांनी वर्...

सुरश्री संगीत विद्यालयाचे घवघवीत यश

इमेज
  सुरश्री संगीत विद्यालयाचे घवघवीत यश सौ. मीना सोमवंशी यांनी विद्यालयासह केंद्रात प्रथम येण्याचा पटकावला बहुमान अंबाजोगाई, प्रतिनिधी:-   अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ ,वाशी मुंबई तर्फे घेण्यात आलेल्या नोव्हेंबर-डिसेंबर 2023  परीक्षेत सौ. मीना सोमवंशी   यांनी घवघवीत यश संपादन केले. संपूर्ण भारतामध्ये व भारताबाहेरील अनेक देशांमध्ये शास्त्रीय संगीताचा प्रसार व प्रचार परीक्षेच्या माध्यमातून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ वाशी, मुंबई मार्फत केला जातो. नोव्हेंबर-डिसेंबर 2023 दरम्यान झालेल्या संगीत विशारद पूर्ण  परीक्षेत सौ.मीना सोमवंशी यांनी  सुरश्री संगीत विद्यालय आंबेजोगाई येथून फॉर्म भरून परीक्षा देऊन  सुयश प्राप्त केले आहे. बालगंधर्व संगीत महाविद्यालय अंबाजोगाई केंद्र तसेच सुरश्री संगीत विद्यालय या दोन्हीमध्ये सर्वप्रथम येण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे. संगीत विशारद पूर्ण परीक्षेसाठी सुरश्री संगीत विद्यालयाचे संस्थापक-संचालक  संगीत अलंकार प्रा. शंकर सिनगारे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.ते पंडित शिवदासजी देगलूरकर यांचे शिष्य...

गायकवाड, साबणे ,फुटके ,ढाकणे, शिंदे, जोशी, आरबुने या पत्रकारांचा मूकनायक पुरस्काराने सन्मानित

इमेज
  अस्तित्व आणि अस्मितेसाठी मूकनायक दिशादर्शक-डॉ. सिद्धार्थ तायडे मूकनायक पत्रकारितेतील एक ऐतिहासिक अध्याय-  मुख्य अभियंता डॉ. अनिल काठोये समाजासाठी पत्रकार आणि पोलीस दोघांचेही कामे  महत्त्वाचे- पो नि उस्मान शेख गायकवाड, साबणे ,फुटके ,ढाकणे, शिंदे, जोशी, आरबुने या पत्रकारांचा मूकनायक पुरस्काराने सन्मानित परळी /प्रतिनिधी        अस्तित्व आणि अस्मितेसाठी महामानव, विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले वर्तमानपत्र मूकनायक आजही दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन प्रख्यात  लेखक-दिग्दर्शक प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे  यांनी केले. ते मूकनायक दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. तर मूकनायक पत्रकारितेतील एक ऐतिहासिक अध्याय असल्याचे मत परळी औष्णिक विद्युत  केंद्राचे मुख्य अभियंता डॉ. अनिल काठोये यांनी केले. संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख म्हणाले की, समाजासाठी पत्रकार आणि पोलीस दोघांचेही कार्य अतिशय महत्त्वाचे असून ते समाजाचे मार्गदर्शक बनू शकतात. परळी तालुका व शहर पत्रकार संघाच्या वतीने दि. ३१ जानेवार...

परळीचे 'सुवर्णकाररत्न' रमेश मुंडीक यांचा सामाजिक योगदानाबद्दल धारासुर गावकऱ्यांच्या वतीने ह्रदय सत्कार

इमेज
  परळीचे 'सुवर्णकाररत्न' रमेश मुंडीक यांचा सामाजिक योगदानाबद्दल धारासुर गावकऱ्यांच्या वतीने ह्रदय सत्कार परळी वैजनाथ, प्रतिनिधी     परळी येथील सर्व परिचित सुवर्णकार व 'सुवर्णकाररत्न' पुरस्काराने सन्मानित असलेले रमेश मुंडीक यांच्या सामाजिक योगदानाबद्दल त्यांच्या मूळ गावी धारासुर येथे आयोजित वार्षिक सप्ताहात गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा हृदय सत्कार करण्यात आला.       धारासुर येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सुरू झाला असून प्रसिद्ध भागवत कथा प्रवक्ते भागवतमर्मज्ञ ह भ प बाळू महाराज उखळीकर यांच्या सुमधुर वाणीतून भागवत कथा सुरू आहे. या भव्य दिव्य सोहळ्यात परळी येथे आपल्या सामाजिक कार्यातून वेगळा ठसा उमटवलेले व 'सुवर्णकाररत्न' पुरस्काराने सन्मान झालेले रमेश मुंडे धारासुरकर यांच्या सामाजिक योगदानाबद्दल गावकऱ्यांच्या वतीने ह्रदय सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर रमेश मुंडीक यांनी गावातील विविध धार्मिक कार्यक्रमात अत्यंत आवश्यक असणाऱ्या पन्नास हजार रुपयांच्या मृदंगाच्या दोन घोड्या दान दिल्या. यावेळी रमेश मुंडीक व परिवाराच्या वतीन...